टोकवाडीत स्वच्छता अभियान !

टोकवाडीत स्वच्छता अभियान !
●राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य ●

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील टोकवाडी ग्रामपंचायतच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता हीच सेवा हा संदेशाचे पालन करून जिल्हा परिषद शाळेत स्वच्छता मोहीम सरपंच सौ.गोदावरी मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात आली. महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या विचारांची देशाला गरज असल्याचे सौ.मुंडे म्हणाल्या.

 परळी तालुक्यातील टोकवाडी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
सरपंच सौ.गोदावरी मुंडे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. सौ.मुंडे म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी आपल्या आचार व विचारातून चळवळ उभाकरुन भारताला जुलमी इंग्रजी राजवटीच्या जोखडातून बाहेर काढण्याचे काम त्यांनी केले. माजी पंतप्रधान लालबाहदूर शास्त्री यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला. मिठाचा सत्याग्रह असेल किंवा परदेशी मालाचा बहिष्कार असेल अशा अनेक माध्यमातून समाजजागृती करण्याचे काम त्यांनी केले. तसेच यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. दरम्यान स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. मी स्वत: स्वच्छतेच्या बाबतीत जागरुक राहिल आणि त्यासाठी वेळही देईल. दरवर्षी 100 तास म्हणजे प्रत्येक आठवड्यातून दोन तास श्रमदान करुन स्वच्छतेचा या संकल्पाला पुर्ण करीन. मी स्वत: घाण करणार नाही आणि दुसऱ्यालाही घाण करु देणार नाही. सर्वप्रथम मी स्वत: पासुन, माझ्या कुटुंबापासून, माझ्या गल्ली/वस्ती पासुन, माझ्या गावापासून तसेच माझ्या कार्यस्थळापासून या कामास सुरुवात करेन. मला हे मान्य आहे की, जगामधील जे देश स्वच्छ आहेत त्याचे कारण त्या ठिकाणाचे नागरिक स्वत: घाण करीत नाहीत आणि घाण करु देत नाहीत.
  .यावेळी कार्यक्रमास परळी पंचायत समितीचे उपसभापती बालाजी (पिंटू) मुंडे, सरपंच सौ.गोदावरी मुंडे, उपसरपंच तुकाराम काळे, वरद गणेश मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजाराम मुंडे, ग्रामविकास अधिकारी सुधाकर नागरगोजे, तालुका समन्वय श्री.राहुल दुबे, स्वछता गृही गीता मुंडे, ग्रामपंचायत सदस्या अलका मुंडे, बीड जिल्हा परिषद सर्व शिक्षा अभियान सदस्य तथा ग्रामपंचायत सदस्य संजय मुंडे सर,  सदस्य गणेश मुंडे, भीमा रोडे, साहेबराव रोडे, बालाजी आघाव, नामदेव मुंडे, लहुदास मुंडे, सुनील मुंडे, सौ.काळे, डॉ. संदिपान काळे, नागनाथ काळे, बबन काळे, बाळु काळे, श्रीमती आघाव तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !