युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.



बुधवारची एकादशी 'त्रीस्पृशा' एकादशी; धार्मिक दृष्ट्या दुर्मिळ योगायोग !

● गीताजयंती,एकादशी, द्वादशी, त्रयोदशी युक्त वार●

परळी वैजनाथ / रविंद्र जोशी.......
          पंचागानुसार वार, तिथी , नक्षत्र आदींसह अन्य बाबींचा धार्मिक दृष्टीने विचार केला जातो. या मध्ये अनेक वेळा अनेक तिथी वृद्धी -क्षय होतो. परंतु यातून निर्माण होणारे तिथीबदल व योग याचे अत्यंत महत्त्व समजले जाते. अशाच प्रकारे अनेक वर्षांनंतर असा धार्मिकदृष्ट्या दुर्मिळ योग आजच्या बुधवार (दि. १९) रोजी आलेल्या एकादशीबाबतही आहे. ही  एकादशी 'त्रीस्पृशा' एकादशी आहे.गीताजयंती, एकादशी, द्वादशी,त्रयोदशीयुक्त असा एकत्रितपणे हा  वार असून अनेक वर्षानंतर असा योगायोग आल्याचे पंचाग अभ्यासक व अध्यात्मिक तज्ञांनी स्पष्ट केले आहे.

         एकादशी तिथीला खुप महत्त्व आहे. दर पंधरा दिवसाला एकादशी असते. प्रत्येक एकादशीचे नाव व त्यामागे विशिष्ट धार्मिक महत्त्व सांगितलेले आहे. महाराष्ट्रात एकादशी उपवास करणाऱ्या भाविकांची संख्या खुप मोठ्या प्रमाणावर आहे. शिवभक्त असो की विष्णूभक्त असो आराध्य दैवत कोणतेही असो  भाविकांत एकादशी व्रताचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वारकरी संप्रदायात तर एकादशीला अत्यंत महत्त्व आहे. पंढरपूर ची दरमहिण्याची वारी ही प्रत्येक महिन्याला एकादशीलाच केली जाते. तसेच आषाढी -कार्तिकी वारी ही तर महाराष्ट्राची खुप मोठी अध्यात्मिक परंपराच आहे. कधी कधी दोन एकादशी तिथी असतात तेव्हा आपापल्या सांप्रदायिक परंपरेने एकादशी उपवास केला जातो.
      पंचागानुसार वार, तिथी , नक्षत्र आदींसह अन्य बाबींचा धार्मिक दृष्टीने विचार केला जातो. या मध्ये अनेक वेळा अनेक तिथी वृद्धी -क्षय होतो. याप्रमाणे यावेळी बुधवार (दि. १९) रोजी आलेल्या एकादशीबाबतही दुर्मीळ   योग असल्याचे सांगण्यात येत आहे. ही  एकादशी 'त्रीस्पृशा' एकादशी म्हणून ओळखली जाते. या मुळे या एकादशीचे अनन्यसाधारण महत्त्व असून भाविकांनी हे व्रत करावे असे प्रतिपादन अध्यात्मिक क्षेत्रातील अभ्यासकांनी केले आहे.
●●●●
का आहे 'त्रीस्पृशा' एकादशी...?
     पंचाग व हिंदु कालगणनाशास्रात एका सुर्योदयापासून दुसर्‍या सुर्योदयापर्यंत एक वार अशी वाराची गणना केली जाते. त्याप्रमाणे बुधवारात ७.३३ वा. पर्यंत एकादशी आहे. ७.३४ ते ३०.२५ वा.पर्यंत द्वादशी आहे आणि त्यानंतर सुर्योदयापर्यंत ४१ मिनीटे त्रयोदशी आहे. त्यामुळे या वाराला एकादशी, द्वादशी, त्रयोदशीयुक्त असा तीन तिथींचा स्पर्श होतो म्हणून या एकादशीला त्रीस्पृशा' एकादशी म्हणून ओळखले जाते असे वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ तज्ञ ह.भ.प. प. पु. चंद्रशेखर महाराज देगलुरकर यांनी स्पष्ट केले.
●●●●●
 गीताजयंतीचा योग......
   दरम्यान योगायोगाने याच एकादशीला श्रीमद् भगवत गीताजयंती आहे. दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध एकादशी गीताजयंती म्हणून साजरी केली जाते. यामुळे ही या एकादशीचे महत्त्व असतेच त्यातच यावर्षी  'त्रीस्पृशा' एकादशी आल्याने या एकादशीचे विशेष महत्त्व धार्मिकदृष्ट्या  मानले जात आहे.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या