इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

परळीतील पाणी प्रश्‍नाकडे धनंजय मुंडेंनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष

परळीतील पाणी प्रश्‍नाकडे धनंजय मुंडेंनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष


पुस व पट्टीवडगाव पाणी पुरवठा योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी

बीड दि.12.......... परळी वैजनाथ शहराला पाणी पुरवठा करणार्‍या वाण धरणात केवळ 17 टक्के पाणी साठा राहिल्याने परळी शहराला आगामी काळात मोठ्या पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे, त्यासाठी संपुर्ण पाणी साठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याची मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करून परळीच्या पाणी प्रश्‍नाकडे त्यांचे लक्ष वेधले. त्याचबरोबर पुस व 20 खेडी व पट्टीवडगाव व 9 खेडी पाणी पुरवठा योजनेचे वीज बील माफ करून या योजना पुन्हा सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली.

     बीड जिल्ह्याच्या दुष्काळी आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीडमध्ये आले असता ना.मुंडे यांनी परळी विधानसभा मतदार संघातील पाणी प्रश्‍नाकडे त्यांचे लक्ष वेधले. वाण धरणावर परळी शहरासह नागापूर, आस्वलांबा, दौनापूर, टोकवाडी डाबी या पाच गावांच्या पाणी पुरवठा योजना आहेत. तसेच वैद्यनाथ कारखान्याला येथुनच पाणी पुरवठा होतो. सद्या धरणात केवळ 17 टक्केच पाणी असल्याने लवकरच या पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे संपुर्ण पाणी पिण्यासाठी राखीव ठेवावे, कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील वाळणार्‍या ऊसाला अनुदान द्यावे, व इतर कारखान्यांनी तो गाळप करावा, यासाठी वाहतुक अनुदान द्यावे अशी मागणी त्यांनी केली. 

पुस, पट्टीवडगाव पाणी पुरवठा योजना सुरू करा

मतदार संघातील पुस व पट्टीवडगाव या दोन पाणी पुरवठा योजनांची थकबाकी माफ करून दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, व 31 गावांचा पाणी प्रश्‍न सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या