भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी अॅड. अरुण पाठक!*


*भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी अॅड. अरुण पाठक!*
*_परळीतील युवक कार्यकर्त्याला पक्षसंघटनेत संधी_*
 ●
परळी वै.।प्रतिनिधी
     भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीत परळीतील युवक कार्यकर्त्याला पक्षसंघटनेत संधी देण्यात आली आहे. ना. पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या अॅड. अरुण पाठक यांची भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.



     अॅड. अरुण पाठक यांनी महाविद्यालयीन जीवनापासून भाजप मध्ये सक्रिय काम केलेले आहे. भाजपा विद्यार्थी आघाडी व पक्ष संघटनेने वेळोवेळी दिलेली जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या उत्तुंग नेतृत्वांकडे पाहून प्रेरणा घेऊन राजकीय क्षेत्रात नव्या पिढीतील असंख्य युवक सक्रिय झाले त्यामध्ये परळीचे अॅड. अरुण पाठक यांनी ना. पंकजाताई मुंडे, आ.योगेश आण्णा टिळेकर, खा.डॉ.प्रीतमताई मुंडे, यांच्या  नेतृत्वाखाली पक्ष संघटनेने दिलेले काम केले आहे.

     नुकतीच त्यांची भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या बाबतचे नियुक्तीपत्र आ.योगेश आण्णा टिळेकर यांनी प्रदान केले आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या निवडीनंतर भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांची निवड केल्याबद्दल ना. पंकजाताई मुंडे,आ.योगेश आण्णा टिळेकर,खा.डॉ.प्रीतमताई मुंडे, संजय भाऊ कौड़गे , विक्रांतजी पाटील , अमोल जाधव , यांचे  आभार व्यक्त केले. तसेच  मला दिलेली संधी माझ्यासाठी खूप मोठी जिम्मेदारी असून मी ह्या संधीचं सोनं करीन अशी प्रतिक्रिया अॅड. अरुण पाठक यांनी व्यक्त केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार