परळीत नवरात्रोत्सवाची लगबग; ३० दुर्गोत्सव मंडळे ! आॅनलाईन परवाने मिळवण्याची मंडळांची घाई   

परळी वैजनाथ /प्रतिनिधी . .............
       नवरात्रोत्सव काळातील विविध परवानग्या प्राप्त करण्यासाठी  मंडळे सध्या  प्रयत्नशील आहेत. परळीत ३० दुर्गोत्सव मंडळे असणार आहेत. मात्र तूर्तास परवाना प्रक्रिया सुरू आहे. परळीतील ३०  मंडळे  या परवान्याच्या  प्रतिक्षेत आहेत. आॅनलाईन परवाने मिळवण्याची मंडळांची घाई  सुरू असल्याचे दिसून येत आहे.  

      सध्या नवरात्रोत्सवाची लगबग सुरू आहे. शहरात दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिळून २३ दुर्गोत्सव  मंडळे आहेत.तर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७ दुर्गोत्सव  मंडळे आहेत.  शहर पोलीस ठाणे व संभाजीनगर पोलीस ठाणे या हद्दीत मंडळांना ध्वनिक्षेपक, मिरवणूक आदी परवानग्या देण्यात येतील. मंडळांनी वीज जोडणीबाबतचा अधिकृत परवाना वीज वितरण कंपनीकडून घेणे बंधनकारक आहे. तसेच धर्मादाय कार्यालयाकडील नोंदणीचे अधिकृत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. त्यानंतरच पोलीसांकडील परवाना मंडळांना प्राप्त होतो. सध्या या परवानगीच्या प्रक्रियेत सर्व गणेश मंडळे आहेत. 
       पोलीसांनी दुर्गोत्सव  मंडळे व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून आवश्यक नियमावली समजावून दिलेली आहे.मिरवणुका तसेच स्थायी व्यवस्था याबाबत माहिती देण्यात आली आहे. कायदेशीर सर्व बाबींची पूर्तता करणे अपेक्षित धरण्यात आले आहे. ध्वनी मर्यादा, स्वयंसेवक व्यवस्था, मिरवणूक व्यवस्था आदी बाबत मार्गदर्शक सुचना पोलीसांकडून मंडळांना देण्यात आलेल्या आहेत. 
@@@@@
सर्व परवाने आॅनलाईनवर. .......
    दरम्यान आता सर्व परवाने हे ऑनलाईन पद्धतीने मिळवावे लागत आहेत. आॅनलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हे परवाने प्राप्त होत आहेत. पोलीस परवानाही ऑनलाईन करण्यात आला आहे. त्यासाठी mhpolice.mahapolice.gov.in  पोर्टलवर जाउन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. नागरिकांनी परवाना प्राप्त करून घेण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

@@@@@@
  नवरात्रोत्सव काळात आनंदाने व उत्साहात  सण साजरा करावा यासाठी मंडळे व नागरीकांनी सहकार्य करावे. नवरात्रोत्सव काळात शहरातील व ग्रामीण भागातील  कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन कार्यरत आहे. सर्वांनी याकामी सहकार्य करावे असे आवाहन  शहरचे पोलीस निरीक्षक देविदास शेळके ,संभाजी नगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाकांत कस्तुरे यांनी केले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार