इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक नौकरभरतीची चौकशी करण्याची मागणी*

*राज्य सरकारने न्यायालयात योग्य बाजू न मांडल्यानेच त्या विद्यार्थ्यांवर अन्याय - धनंजय मुंडे*

*सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक नौकरभरतीची चौकशी करण्याची मागणी*



मुंबई दि 4 ...... सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकासाठी MPSC तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 830 विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. न्यायालयाने या विद्यार्थ्याच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. मात्र राज्य सरकारने न्यायालयात योग्य पद्धतीने बाजू न मांडल्याने ही स्थगिती आली आहे. या नोकरभरतीत गैरव्यवहार झाला असून त्याची चौकशी करण्याची मागणी  विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

सहाययक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या नियुक्तीवरून सध्या गोंधळ सुरू आहे... अनेक विद्यार्थ्यांनी तीन- तीन वर्षे अभ्यास करून ही परीक्षा दिली.. परीक्षेचा निकालही आला..परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 830 विद्यार्थ्याच्या नियुक्तीची शिफारसही mpsc ने राज्य सरकारकडे केली. मात्र नियुक्ती होण्याआधीच  त्यावर न्यायालयाकडून स्थगिती आली. न्यायालयाच्या या स्थगितीचा. फटका बसलेली ही 24 वर्षीय वर्षा बराटे, उस्मानाबाद जिल्ह्यातील वर्षा पुण्यात नोकरीसाठी आली. नोकरी करत तिने सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकाची परीक्षा दिली. या परीक्षेत तिला यशही मिळालं.. पण आता नियुक्तीवर स्थगिती अाली... न्यायालयात राज्य सरकारने नीट भूमिका मांडली नाही, वेळेत प्रतिज्ञापत्र दिले नाही त्यामुळे आपल्यावर ही वेळ आल्याचे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.


या निर्णयामुळे 830 विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. या नोकरभरतीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत याची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुखमंत्र्यांकडे केलीय.


 MPSC तर्फे सरकारी नोकर भरतीत वारंवार गोंधळ होऊन विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. पण सरकार मात्र अजूनही याबाबत गंभीर दिसत नाही. या 830 विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपिल दाखल करावे अशी मागणी होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!