इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

अन्यायकारक व चुकीच्या भारनियमनामुळे जनता त्रस्त


अन्यायकारक व   चुकीच्या भारनियमनामुळे जनता त्रस्त  !



**_राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व्यापक जन आंदोलन उभे करणार -  बाजीराव भैय्या धर्माधिकारी_* ● 

परळी वैजनाथ |प्रतिनिधी. .....

   ऐन सणासुदीच्या तोंडावर  अन्यायकारक व    चुकीच्या भारनियमनामुळे जनता त्रस्त   झाली आहे. या प्रश्नी आता जनतेचा मोठा असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत विधान परिषद विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व्यापक जन आंदोलन उभे करणार असल्याचा इशारा माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिला आहे.
    माजी उपमुख्यमंत्री आ.अजितदादा पवार यांनी भाररनियमनमुक्ती करून दाखवली होती . अजितदादांचा भारनियमन मुक्तीचा हा वारसा या सरकारने ना चालवला ना टिकवला. आता  ग्रामीण भाग आणि महानगरेही अंधारात आहेत. लोड शेडिंगमुळे त्रस्त जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.राष्ट्रवादी काँग्रेस याप्रश्नी तीव्र आंदोलन करणार आहे.सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे राज्य अंधारात आहे. भार नियमनमुक्त महाराष्ट्र करण्याच्या पोकळ घोषणा करणार्‍या सरकारला जाब विचारावाच लागेल. 
       परळी शहरावर अन्यायकारक व चुकीच्या पद्धतीने भारनियमन लादल्यानंतर महावितरणने वीज निर्मीती करणाऱ्या परळी शहराला धक्का देण्याचा तुघलकी निर्णय घेतला आहे.  इमरजन्सी या गोंडस नावाखाली भारनियमन हा नवा प्रकार लागू करण्यात आला असून याअंतर्गत शहराचा वीज पुरवठा कोणत्याही क्षणी बंद करणे, कोणत्याही क्षणी चालू करणे असा नियम करण्यात आला आहे. वास्तविक तत्कालीन उपमुख्यमंत्री  अजितदादा पवार उर्जामंत्री असताना वीजनिर्मिती केंद्र असलेली शहरे भारनियमन मुक्त ठेवण्याचा निर्णय झालेला होता. त्यानंतर आत्तापर्यंत हा नियम पाळण्यात येत होता. आता मात्र या सरकारच्या काळात वीजनिर्मिती केंद्र असणाऱ्या परळीलाही 'इमर्जन्सीचा' फटका बसत आहे. या मुळे परळीकरात याबाबत प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
      अन्यायकारक व चुकीचे भारनियमन त्वरित बंद करावे अन्यथा  या प्रकरणी राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व्यापक जनआंदोलन उभे करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व सर्व पदाधिकारी, सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या