इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

मुख्यमंत्री दौरा: सकारात्मक पाउल... !


बीड जिल्ह्यासाठी 24 कोटींच्या निधीची तरतूद

बीड /प्रतिनिधी ........
              बीडमध्ये भीषण दुष्काळ असून त्यासाठी 24 कोटींच्या निधीची तरतूद केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच सध्या खरीप हंगामावर संकट असल्याचेही म्हटले. बीडमध्ये दुष्काळ दौर्‍यादरम्यान घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

            बीडमध्ये दुष्काळ असून अन्न्याधान्याच्या नियोजनाचे आदेश प्रशासनाला दिल्याचे त्यांनी सांगितले. जिथे जिथे पाणी नसेल तिथे चारा छावण्या सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाण्यासाठी एकूण 2162 योजना मान्य केल्या असून बीडसाठी 24 कोटींच्या निधीची तरतूद केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!