युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

_ह.भ.प.वै.दादासाहेब महाराज बोरखेडकर यांचा चौदावा पुण्यस्मरण महोत्सव_ *भागवत मर्मज्ञ ह-भ-प सुरेंद्र(बाळु) महाराज उखळीकर यांच्या सुश्राव्य वाणीतुन श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ*



_ह.भ.प.वै.दादासाहेब महाराज बोरखेडकर यांचा चौदावा पुण्यस्मरण महोत्सव_ 

*भागवत मर्मज्ञ ह-भ-प सुरेंद्र(बाळु) महाराज उखळीकर यांच्या सुश्राव्य वाणीतुन श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ* 
परळी वैजनाथ। प्रतिनिधी ...
     तालुक्यातील बोरखेड येथे महान संत ह.भ.प. वै. दादासाहेब महाराज बोरखेडकर यांचा चौदावा पुण्यस्मरण महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त भागवतमर्मज्ञ ह-भ-प सुरेंद्र(बाळु) महाराज उखळीकर यांच्या सुश्राव्य वाणीतुन श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात नामांकित कीर्तनकार यांची कीर्तन सेवा होणार आहे.


        तालुक्यातील श्रीक्षेत्र बोरखेड येथे ९ ते १६ ऑक्‍टोबर या कालावधीत पुण्यस्मरण महोत्सव होणार आहे.या महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये काकडा भजन, विष्णु सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण,गाथा भजन, दुपारी एक ते चार श्रीमद् भागवत कथा, हरिपाठ व रात्री नऊ ते अकरा मान्यवर  कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत.  या महोत्सवात ह.भ.प. आदिनाथ महाराज फपाळ, ह.भ.प. दत्ता महाराज गरड वांगीकर, ह.भ.प.डाॅ. शाम महाराज नेरकर,ह. भ. प. एकनाथ महाराज माने, ह.भ.प. १००८स्वामी मनिषानंद पुरीजी महाराज, ह.भ.प. माऊली महाराज मुडेकर, वेदांताचार्य ह.भ. प.प्रल्हाद शास्त्री महाराज दैठणकर यांची कीर्तने होणार आहेत. तर मंगळवार दि.१६ रोजी ह. भ. प .गुरुवर्य मधुसूदन महाराज दैठणकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.

           ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व  ह. भ.प. असाराम महाराज वझुरकर हे करणार आहेत. तर भागवतकथा संगीतसाथ हभप सर्जेराव महाराज सपकाळ, हभप संगीत विशारद   मनोज शिंदे, हभप संगीत विशारद अनोज देशमुख आदी करणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन ह. भ. प. सर्जेराव महाराज सपकाळ व  ह. भ. प. संदिपान दादासाहेब महाराज वानखेडे यांनी केले आहे या सप्ताहात वारकरी संप्रदायातील अनेक नामवंत किर्तनकार,  गायनाचार्य, मृदंगाचार्य, वारकरी, गुणिजन मंडळी मोठ्या संख्येने प्रमुख उपस्थित राहणार आहे. दक्षिणमुखी हनुमान मंदिर श्री क्षेत्र बोरखेड येथे होणाऱ्या या अध्यात्मिक पर्वणीचा भाविक भक्तांनी  लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळ बोरखेड यांनी केले आहे.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या