प्रा. व्ही. बी.देशपांडे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली! !!!!!


*आज "बेटा" शब्द - नि:शब्द .........!*

                                 - प्रा. रविंद्र जोशी
      एक वेगळा बाज, दिमाखदार व शाही वर्तन जे काही असेल ते धडक - बेधडक मांडण्याची नैसर्गिक वृत्ती आणि परळीत कोणीही असो त्याला चार चांगले शब्द सांगण्याचा -सुनावण्याची अधिकारवाणी असलेले प्रा. व्ही.बी.देशपांडे यांनी अखेरचा निरोप घेतला. त्यांच्या विविध क्षेत्रातील सहभागाने ते सर्वपरिचित होतेच त्याहीपेक्षा वडीलकीच्या नात्याला परिपूर्ण जपणारे व्यक्तीमत्व होते. प्रत्येकाला आपलेपणाची जाणीव करून देणारा " बेटा" हा शब्द आज त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला आठवल्याशिवाय राहणार नाही. एक प्रकारे त्यांच्या जीवनशैलीत अविभाज्य बनलेला हा शब्द होता. आदरणीय सरांच्या जाण्याने जणू  "बेटा" शब्द - नि:शब्द झाला आहे असे वाटते. सरांना भावपूर्ण श्रद्धांजली! !!!!!


          
   परळीच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील सर्वपरिचित व वैद्यनाथ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राणीशास्त्र विभाग प्रमुख निर्भिड- न्यायप्रिय  प्रा.व्ही. बी. देशपांडे यांचे वृद्धापकाळाने आज दि. २९ रोजी सकाळी ६.०० वाजता त्यांच्या राहत्या घरी दुःखत निधन झाले. ते ७५ वर्षे वयाचे होते . त्यांच्या प्रश्चात पत्नी, सुन, मुलगी, नातंडे असा परिवार आहे.
             दिवंगत प्रा. व्ही. बी.देशपांडे हे  वैद्यनाथ महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभाग प्रमुख म्हणून मे २oo४ मध्ये प्रदिर्घ सेवेतून सेवानिवृत झाले. त्यांच्या शौक्षिणक सेवा कार्यची सुरूवात वैद्यनाथ विद्यलाय येथे विज्ञानाचे शिक्षक म्हणून झाली होती.अत्यंत मनमिळाऊ, स्पष्ट ,निर्भिड, सत्यनिष्ठ मत मांडणारा त्यांचा  स्वभाव सर्व परिचित  होता. प्रा. व्ही बी देशपांडे यांची ज्ञानदान करण्याची हातोटी अत्यंत स्पष्ट सोप्या भाषेत सरळ साधी अशी  प्रसिध्द होती.विद्यार्थ्यांची वर्गात शिस्त कशी असावी यावर त्यांच्या खास शैलीतील शिकवण  अनेक विद्यार्थ्यांना जीवन परिवर्तनासाठी उपयोगी ठरली. त्यांच्या ज्ञानदान प्रक्रियेतून असंख्य विद्यार्थी आपल्या आयुष्यात मोठा पदावर विराजमान असून प्रत्येकाला त्यांचा प्रचंड आदर होता व राहील. त्यांच्या  निधनामुळे शैक्षणिक , सामाजिक क्षेत्रात न भरू येणार हानी झाली आहे.
            ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळीचे ते विद्यमान उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली परळीत ब्राह्मण सभेच्या वतीने गेल्या ४० वर्षापासून सांस्कृतिक, सामाजिक,धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात या कार्यात त्यांचा हिरीरीने सहभाग असायचा. पुर्णवाद तत्त्वज्ञानाशी ते समरुप झाले होते. अधिकाराने अनेक सामाजिक कामे त्यांनी नेत्यांना आग्रह धरुन करायला लावल्याचे पाहण्यात आहे. मुलगा पापा देशपांडे यांच्या अकाली निधनाने कुटुंबावर आलेल्या कटू प्रसंगानंतर  त्यांच्यातील धीरोदात्तपणा व कुटुंबवत्सलता दिसून आली. स्वतःच्या दुःखाला बाजुला सारत अनेकांना सावरणारा हा 'बाप' माणुस ठरला.
         त्यांच्या निधनाने देशपांडे कुटुंबियांचा आधारवड कोसळला आहे.त्याचप्रमाणे परळीच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात कधीही न भरुन निघणारी क्षती झाली आहे. त्यांच्या सामाजिक कार्याच्या तळमळीचा आदर्श घेऊन सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला "बेटा" ही हाक कायमच प्रेरणा देत राहील हे निश्चित.
  व्ही.बी.सरांना भावपूर्ण श्रद्धांजली! !!!!!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !