पेट्रोल आणि डिझेलचे भाव: _अभिनंदन कसले करता जनतेची माफी मागा- धनंजय मुंडे


*चार वर्ष लुट केल्यानंतर आता दर कमी करणे म्हणजे उशीरा सुचलेले शहाणपण-धनंजय मुंडे*

_अभिनंदन कसले करता जनतेची माफी मागा_


मुंबई दि.04.............केंद्रातील मोदी आणि राज्यातील फडणवीस सरकारमुळेच पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आता दर कमी केल्याबद्दल अभिनंदन कसले करून घेता उलट जनतेची माफी मागा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी केली आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे भावअल्पसे कमी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले. त्यावरून सरकारला धारेवर धरतांना चार वर्ष लुट केल्यानंतर आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन दर कमी करण्याचा घेतलेला हा निर्णय म्हणजे सरकारला उशीरा सुचलेले शहाणपण आहे.

 गुजरात राज्याने पेट्रोल आणि डीझेलच्या दरात कपात केली असतांना महाराष्ट्र सरकारने मात्र फक्त पेट्रोलच्या भावात कपात करून राज्यातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळणे असल्याची प्रतिक्रिया ही त्यांनी दिली आहे.

----------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार