इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

*जगद्गुरू द्वाराअचार्य अमृताश्रम स्वामी यांची गोपीनाथगडाला भेट !*



*जगद्गुरू द्वाराअचार्य अमृताश्रम स्वामी यांची  गोपीनाथगडाला भेट !*


परळी वैजनाथ। प्रतिनिधी. ...
          महाराष्ट्रातील प्रसिध्द किर्तनकार तथा अध्यात्मिक क्षेत्रातील जनमान्य व्यक्तीमत्व असलेल्या जगद्गुरू द्वाराअचार्य अमृताश्रम स्वामी यांनी गोपीनाथ गडाला सदिच्छा भेट दिली. 

 

लोकनेते गोपीनाथराव मुंडे हे अलौकिक जीवन लाभलेले व्यक्तीमत्व आहे. केवळ राजकीय क्षेत्रातच नव्हे तर सर्व क्षेत्र व सर्व स्तरात आत्मिक नाते निर्माण केलेले लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची आठवण सर्वांनाच सदोदित होत असते. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे समाधीस्थळ असलेल्या गोपीनाथ गडावर दररोज विविध ठिकाणचे व सर्व स्तरातील लोक भेट देतात. लोकनेत्याजवळ काही क्षण सहवासात घातल्याचा अनुभव व उर्जा घेऊन जातात. 

           या अनुषंगाने   महाराष्ट्रातील प्रसिध्द किर्तनकार तथा अध्यात्मिक क्षेत्रातील जनमान्य व्यक्तीमत्व असलेल्या जगद्गुरू द्वाराअचार्य अमृताश्रम स्वामी यांनी गोपीनाथ गडाला सदिच्छा भेट दिली. आपल्या अध्यात्मिक प्रसारकार्याच्या प्रवासात गंगाखेड येथील श्रीमद् भागवत कथेनिमित्त या भागात ते आले होते. विविध क्षेत्रभेटी घेत असताना त्यांनी आवर्जून गोपीनाथ गडाला भेट दिली. संपूर्ण परिसरात त्यांनी काहीकाळ निवांत वेळ देउन पहाणी केली. या वेळी त्यांच्या समवेत संत, महंत, शिष्य उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या