वैद्यनाथाच्या उत्तर पायर्यांवर रंगतदार संगीत मैफिल!
● परळीकरांचा संगीतमय दिवाळी पाडवा ●
 |
छायाचित्र व व्हिडिओ : राजेंद्र सोनी, परळी वैजनाथ . |
परळी वैजनाथ/ प्रतिनिधी दि.4 -
श्री.वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने आज दि.8 ऑक्टोबर,गुरुवार रोजी दिवाळी पाडव्यानिमित्त पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य तथा सुप्रसिद्ध गायक पं.आनंद भाटे यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. वैद्यनाथाच्या उत्तर पायर्यांवर रंगतदार संगीत मैफिल सुरु आहे. पं.भीमसेन जोशी यांचे शिष्य म्हणून सर्व परिचित असलेले प.आनंद भाटे यांच्या भक्तीगीत आणि अभंगवाणीची मेजवानी परळीकरांना दिवाळीनिमित्त भेटली आहे. विविध भक्तीगीते व भावगीते सादरीकरणात रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. उत्तर पायर्या भाविकांनी फुलून गेल्या आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा