पोस्ट्स

समाजभुषण स्व. सुवालालजी वाकेकर पुरस्कारांची घोषणा

इमेज
समाजभुषण स्व. सुवालालजी वाकेकर पुरस्कारांची घोषणा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे, उद्योगपती रमेश फिरोदीया, ज्येष्ठ साहित्यीक प्रा.डॉ.दासू वैद्य  पुरस्कारांचे मानकरी सार्वजनिक कार्यक्रमावरील निर्बंध शिथील होताच होणार कार्यक्रम परळी (प्रतिनिधी-) समाजभुषण स्व. सुवालालजी वाकेकर (ललवाणी) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मारवाडी युवा मंचच्या वतीने देण्यात येणार्या  राज्यस्तरीय पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. राज्याचे सामाजिक न्याय तथा विशेष सहाय्यमंत्री  तथा नाथ प्रतिष्ठाणचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे (राज्य भुषण), उद्योगपती रमेश फिरोदीया (समाज भुषण) व प्रसिद्ध साहित्यीक प्रा.डॉ.दासू वैद्य (साहित्य भुषण) यांना स्व. सुवालालजी वाकेकर पुस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध असून हे निर्बंध शिथील होताच कार्यक्रमाची तारिख जाहीर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून रामाणाचार्य रामराव महाराज ढोक व प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध कवि  अशोक नायगावकर उपस्थित राहणार असल्याचे मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, कार

कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी

इमेज
कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी सोनपेठ (प्रतिनिधी).....      कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे राजे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.  आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे, गणेश हांडे, राजाभाऊ निळे या मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे यांनी सांगितले की, सामाजिक न्यायाची खरोखर भुमिका घेत खर्या अर्थाने घेणारे राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांची कास धरून वाटचाल केली पाहिजे.त्यांचे विचारच सामाजिक न्याय व हक्क मिळवून देणारे असल्याचे सांगितले.   प्रास्ताविक मुख्याध्यापक सोनकांबळे यांनी केले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डी.एल.सोनकांबळे, वसतिगृह अधिक्षक डी.एम.माने, शिक्षकवृंद, कर्मचारी उपस्थित होते. ***†**************************************       

Video News: अनंत इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वोपयोगी उपक्रम

इमेज
अनंत इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वोपयोगी उपक्रम*  • *_वृक्षारोपण, वृक्षभेट, सॅनिटायझर,मास्क व अन्नधान्य किटचे वितरण_* अनंत इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वोपयोगी उपक्रम*  • *_वृक्षारोपण, वृक्षभेट, सॅनिटायझर,मास्क व अन्नधान्य किटचे वितरण_* * परळी वैजनाथ: प्रतिनिधी....      राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर सरचिटणीस अनंत इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त परळी शहरात सर्वोपयोगी उपक्रम राबवण्यात आले.अनाठायी खर्च व सवंग प्रसिद्धी च्या उपक्रमांना फाटा देत वृक्षारोपण, ५०० वृक्षभेट,  सॅनिटायझर, मास्क व अन्नधान्य किटचे वितरण करण्यात आले.        जग सध्या कोरोना महामारीच्या महाभयंकर संकटाशी सामना करत आहे.या पार्श्वभूमीवर अगदी सुरुवाती पासून कोरोना प्रतिबंधक मोहीमेत अग्रेसर राहिलेल्या व सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात पुढाकार घेणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर सरचिटणीस अनंत इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय,सामाजिक व विविध स्तरातील नागरिकांनी शुभेच्छा दिल्या. मित्र मंडळाच्या वतीने अनंत इंगळे यांच्या वाढदिवसा निमित्त परळी शहरात सर्वोपयोगी उपक्रम राबवण्यात आले. नागर

पंकजाताई मुंडे यांनी केले आवाहन....मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करा, घरात फोटोसमोर दोन दिवे लावा, पुण्यतिथीला गोपीनाथ गडावर गर्दी नको

इमेज
*लोकनेत्याच्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर पंकजाताई मुंडे यांनी केले आवाहन* *मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करा, घरात फोटोसमोर दोन दिवे लावा, पुण्यतिथीला गोपीनाथ गडावर गर्दी नको * परळी वैजनाथदि. २९---- लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीला मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करायचा आणि घरातच फोटोसमोर दोन दिवे लावून त्यांना अभिवादन करायचं, असं आवाहन  पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे. ३ जून रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम गोपीनाथ गडावरच होईल, मात्र कार्यक्रम लाईव्ह असेल, कोणीही गडावर गर्दी करु नये, अशी सूचना पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.  ३ जून हा दिवस उजाडलाच नाही पाहिजे, असं वाटत असल्याची फेसबुक पोस्ट पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.   ३ जून रोजी लोकनेते गोपीनाथराव  मुंडे यांचा सहावा पुण्यस्मरण दिवस आहे. हा दिवस ‘संघर्ष दिन’ म्हणून मुंडे समर्थक साजरा करतात. परंतु सध्या कोरोनामुळे राज्यासह बीड जिल्ह्यातही लॉकडाऊन आहे. शिवाय गर्दीच्या सर्वच कार्यक्रमावर बंदी आहे. गोपीनाथ गडावर सध्या पद्धतीने मोजक्या लोकांमध्ये गोपीनाथराव मुंडे यांची पुण्यतिथी कार्
इमेज
५८ दिवसांनंतर निघण्यासाठी सज्ज 'लालपरी' वाट पाहून पाहून थांबली ! *परळी आगारात दिवसभरात आले केवळ दोन प्रवासी* परळी वैजनाथ, प्रतिनिधी:-        कोरोनामुळे ठप्प झालेली अर्थव्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.त्याचाच एक भाग म्हणून परिवहन महामंडळाची लालपरी शुक्रवार दि.22 मे पासून धावणार यासाठी परळी आगारात  8 गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र सकाळपासून कोणीही प्रवासी बसस्थानकावर फिरकलेच नाही.दिवसभरात केवळ दोन प्रवासी आले. त्यामुळे परळी आगारातून बसच्या नियोजित फेर्या झाल्या नाहीत.          दोन महिन्यांपासून बसून असलेल्या महामंडळाच्या बसेस शुक्रवारपासून सुरू करण्यात आल्या. शासनाच्या बसेस या जिल्हा अंतर्गत धावणार आहेत. परळी आगारात बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले. परळी-बीड अणि परळी-अंबाजोगाई अशा प्रत्येकी बारा फेर्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे.यासाठी एकूण आठ बसेस सज्ज करण्यात आल्या. होत्या अशी माहिती आगारप्रमुख  आर.बी.राजपुत  यांनी दिली. मात्र 'वाट पाहिन पण एसटीनेच जाईन 'असे नेहमी म्हटले जाते परंतु आज वाट पाहिन पण  प्रवासी घेउनच जाईन ' असे म्हणण्याची वे

कोरोना महामारीत परळीत युवकांचा घरोघर 'माधुकरी' गोळा करून गरजूंना अन्नदान यज्ञ !

इमेज
कोरोना महामारीत परळीत युवकांचा  घरोघर 'माधुकरी' गोळा करून गरजूंना अन्नदान यज्ञ  ! • _शिवनगरमधिल युवकांचा २५ दिवसांपासून उपक्रम_ • परळी वैजनाथ/ प्रतिनिधी....       कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागु करण्यात आलेल्या टाळाबंदीने अनेकांना अनेक अडचणी येत आहेत.त्याचप्रमाणे अडल्या नडलेल्यांना अडचणी येऊ नयेत यासाठीही अनेक प्रयत्नशिल हात पुढे येत गरजुंना सर्वोतोपरी मदत करत आहेत.अशाच प्रकारे गेल्या २५ दिवसांपासून मांगिर बाबा मित्र मंडळाचे श्रीनाथ विभूते, कृष्णा भास्कर व अन्य युवक गल्लीत प्रत्येक घरातून घरोघर 'माधुकरी' गोळा करून गरजूंना अन्नदानयज्ञ करण्याचा उपक्रम राबवताना दिसत आहेत. सर्वसामान्य घरांतील युवकांनी एकत्रित येत राबवलेला हा उपक्रम माणुसकीचे मुर्तीमंत उदाहरण ठरला आहे.        कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागु करण्यात आलेल्या टाळाबंदीच्या परिस्थितीत गरजुंपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीसाठी नागरीक,  संस्था पुढे येत आहेत.  कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागु करण्यात आलेल्या टाळाबंदीने  देश व राज्यातील हातावर पोट असलेल्या नागरिकांची  परिस्थिती अतिशय बिकट

परळीतील नव्या पिढीलाही वैद्यनाथाची ओढ

इमेज
परळीतील नव्या पिढीलाही वैद्यनाथाची ओढ : चित्रकार मैथिलीने  रेखाटले वैद्यनाथ मंदिरचे हुबेहुब पोस्टर चित्र ●वैद्यनाथ मंदिर : नवोदित शिल्पकार,  चित्रकारांसाठी उत्कृष्ट कलाकृती!● परळी वैजनाथ /रविंद्र जोशी. ....        देशभरातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी तीन ज्योतिर्लिंग मराठवाड्यात आहेत. या मध्ये परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळेच गावाला वैद्यनाथाची परळी किंवा परळी वैजनाथ हे नाव प्राप्त झाले आहे. परळीचे वैद्यनाथ मंदिर एक ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक समृद्ध वारसा आहे. त्याचबरोबर वास्तुरचनेचा उत्तम नमुना आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या मध्ये आणखी एक भर पडली असुन वैद्यनाथ मंदिर हे नवोदित शिल्पकार,  चित्रकारांसाठी उत्कृष्ट कलाकृती आहे. परळीतील नव्या पिढीची  चित्रकार मैथिलीने  वैद्यनाथ मंदिरचे हुबेहुब पोस्टर चित्र रेखाटले आहे. यावरुन कलाकृतींमध्ये रस असणारांनाही मोठे आकर्षण असल्याचे प्रत्ययाला आले.       बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग म्हणून वैद्यनाथ ओळखले जात

४० बालकांना वृक्षारोपण, गीतापाठ, संकिर्तनासह गोसेवेची प्रत्यक्ष घडवली अनुभुती

इमेज
परळी गीता परिवाराच्या वतीने रामरक्षा गोशाळेत क्षेत्रभेट! ● ४० बालकांना वृक्षारोपण,  गीतापाठ, संकिर्तनासह गोसेवेची प्रत्यक्ष घडवली अनुभुती ● परळी वैजनाथ /प्रतिनिधी. ...     प. पु. गोविंददेव गिरीजी महाराज  (किशोरजी व्यास ) यांच्या प्रेरणेने संचलित परळी गीता परिवाराच्या वतीने अंबाजोगाई रस्त्यावरील रामरक्षा गोशाळेत क्षेत्रभेट उपक्रम घेण्यात आला. यामध्ये ४० बालकांना गीतापाठ, संकिर्तनासह गोसेवेची प्रत्यक्ष अनुभुती घडवली.त्याचबरोबर या बालकांना निसर्गसानिध्य देत वृक्षारोपण करुन वृक्षसंवर्धन व संगोपनासाठी संस्कार रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला.       गीता परिवार परळी वैद्यनाथ च्या माध्यमातून संस्कारवर्ग व संस्कृतीरक्षक उपक्रम राबविण्यात येतात. या अनुषंगाने   अंबाजोगाई रस्त्यावरील रामरक्षा गोशाळेत क्षेत्रभेट उपक्रम घेण्यात आला. या मध्ये 40 बालक सहभागी झाले होते.बालकांना गीतापाठ, संकिर्तनासह गोसेवेची प्रत्यक्ष अनुभुती घडवली. मुलांच्या हस्ते गाईंना गुळ, पेंढ, चारा देण्यात आला. भगवद्गीता  12 वा आणि  15 वा अध्याय पाठ एकत्रितपणे घेण्यात आला तसेच संकीर्तन केले. यावेळी मुलांना निसर

परळीतील नव्या पिढीलाही वैद्यनाथाची ओढ

इमेज
परळीतील नव्या पिढीलाही वैद्यनाथाची ओढ : चित्रकार मैथिलीने  रेखाटले वैद्यनाथ मंदिरचे हुबेहुब पोस्टर चित्र ●वैद्यनाथ मंदिर : नवोदित शिल्पकार,  चित्रकारांसाठी उत्कृष्ट कलाकृती!● परळी वैजनाथ /रविंद्र जोशी. ....        देशभरातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी तीन ज्योतिर्लिंग मराठवाड्यात आहेत. या मध्ये परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळेच गावाला वैद्यनाथाची परळी किंवा परळी वैजनाथ हे नाव प्राप्त झाले आहे. परळीचे वैद्यनाथ मंदिर एक ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक समृद्ध वारसा आहे. त्याचबरोबर वास्तुरचनेचा उत्तम नमुना आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या मध्ये आणखी एक भर पडली असुन वैद्यनाथ मंदिर हे नवोदित शिल्पकार,  चित्रकारांसाठी उत्कृष्ट कलाकृती आहे. परळीतील नव्या पिढीची  चित्रकार मैथिलीने  वैद्यनाथ मंदिरचे हुबेहुब पोस्टर चित्र रेखाटले आहे. यावरुन कलाकृतींमध्ये रस असणारांनाही मोठे आकर्षण असल्याचे प्रत्ययाला आले.       बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग म्हणून वैद्यनाथ ओळखले

महाशिवरात्री विशेष लेख: वैद्यनाथ ज्योतिर्लिंग परळीचे साक्षात भूकैलास कलीयुगाचे

इमेज
वैद्यनाथ ज्योतिर्लिंग परळीचे साक्षात भूकैलास कलीयुगाचे ------------------------------------ [ॲड.दत्तात्रय आंधळे ]       श्रीक्षेत्र परळी वैजनाथ बाराज्योर्तिलिंगापैकी एक वैद्यनाथ या नावाने  प्रशिध्द आहे .येथे हिंदू धर्माचे प्राचीन पाच संप्रदाय परंपरेने आहेत आणि देव देवतेचा परिवार जणु माहेरघर असलेले पवित्र आणि पावन स्थान परळी होय.येथे १वैष्णव २शैव३शाक्त ४स्मार्त ५वैदिक संप्रदाय परंपरा आजतागायत जतन केलेले तीर्थक्षेत्र होय. .भारताच्या  नकाशात कन्याकुमारी ते उच्जैन दरम्यान एक मध्यरेषा ओढली तर ती परळी वैजनाथ क्षेत्रावरुन जाते .म्हणून परळीला मध्यरेखा पण म्हटले जाते.याविषयी एकमहान ज्योतिषाचार्य तथा गणितज्ञ  भास्कराचार्य [इ.स.११४४-१२२३]यांनी सिध्दांतशिरोमणी आणि करणकुतूहल हे ग्रंथ  लिहले आहेत.त्यांनी भारतवर्षाची मध्यरेखा कशी व कोणकोणत्या स्थानावरुन जाते हे वर्णित केलेले आहे. "पुरीरक्षशां देवकन्याsथ कांची/सितःपर्वतःपर्यली वत्सगुल्यम//पुरी चोज्जयिन्यांन्हया गर्गराटम/कुरुक्षेत्र मेरुर्भुवोर्मध्य रेखा//"भारताची मध्यरेखा राक्षसांचीनगरी लंका ,कन्याकुमारी,कांची,शैलपर्वतआणि परळीवरुन
माजलगाव येथे स्वानंद सुखनिवासी सद्गु रु जोग महाराज पुण्यशताब्दी निमित्त भागवतमर्मज्ञ ह.भ.प बाळु महाराज उखळीकर यांच्या सुमधूर वाणीतूनभागवत कथा ज्ञानयज्ञ माजलगाव /प्रतिनिधी.........      सुप्रसिद्ध भागवतकथा प्रवक्ते  भागवतमर्मज्ञ ह.भ.प बाळु महाराज उखळीकर यांच्या सुमधूर वाणीतून भागवतकथा ज्ञानयज्ञ आयोजन करण्यात आले आहे. माजलगाव येथे श्रीमद् भागवत कथेला आज दि. 8 रोजी उत्साहात प्रारंभ  झाला. यावेळी कथा श्रवणाचा भाविक मोठ्या संख्येने लाभ घेत आहेत.     माजलगाव येथे स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज पुण्यशताब्दी निमित्ताने शिवाजीनगर महिला भजनी मंडळाच्या वतीने दि. ८ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी  सप्ताहात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवतकथा प्रवक्ते  भागवतमर्मज्ञ ह.भ.प बाळु महाराज उखळीकर यांच्या सुमधूर वाणीतून भागवतकथा ज्ञानयज्ञ आयोजन करण्यात आले आहे. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज पुण्यशताब्दी निमित्त होत असलेल्या या सोहळ्यात विविध अध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दररोज दुपारी १ ते ५  या वेळेत भागवतमर्मज्ञ ह.भ.प बाळु महाराज उखळीकर यांच्या सुमधूर वाणीतून भागवतकथा निरूपण

● _कै.राजीवगांधी अनु.जाती जमाती निवासी मा.आश्रम शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात_ ●

*देशभक्तीने प्रेरीत शालेय विद्यार्थीच देशाच्या जडणघडणीचा पाया - शिवाजी मव्हाळे*  ● _कै.राजीवगांधी अनु.जाती जमाती निवासी मा.आश्रम शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात_ ● सोनपेठ / प्रतिनिधी. .......         देशभक्तीने प्रेरीत शालेय विद्यार्थीच देशाच्या जडणघडणीचा पाया असतात. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे लक्षात घेऊन प्रत्येकाने या प्रवाहात सामील झाले पाहिजे.शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हेच ध्येय असुन देशनिष्ठ विद्यार्थी घडावा यासाठी प्रयत्न असल्याचे प्रतिपादन कै. राजकुमार मव्हाळे ग्रामीण विकास सेवाभावी  संस्थेचे अध्यक्ष शिवाजी मव्हाळे यांनी स्वातंत्र्य दिन समारंभात केले.       खडका येथील कै. राजीवगांधी अनु.जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रम शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर केले. त्याचप्रमाणे देशभक्तीपर मनोगते व गीते सादर केली. प्रारंभी कै. राजकुमार मव्हाळे ग्रामीण विकास सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी मव्हाळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण व राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देण्यात आली.सामुहिक राष्ट्रगीताने
इमेज
*कु.समृद्धी मनोजराव जब्दे घवघवीत यश* परळी (प्रतिनिधी)                कु.समृद्धी  मनोजराव जब्दे हिने इयत्ता दहावी शालांत परिक्षेत 90टक्के गुण घेवुन घवघवीत यश संपादन केले आहे.          महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त (10 वी ) च्या परीक्षेत परळी येथील प्रतिष्ठित नागरिक मनोजराव जब्दे यांची कन्या कु.समृद्धी हिने घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल पालक,मित्र परिवार,शाळेचे शिक्षक व आप्तेष्टाकडुन अभिनंदन होत आहे.
इमेज
* लोकसभेतील 'विजयश्री'नंतर आता खा. डाॅ. प्रीतम मुंडेंचा मतदारसंघात आभार दौरा*  ● _८ ते ११ जुन दरम्यान पहिला टप्पा_ ● परळी वैजनाथ /प्रतिनिधी. ......          बीडच्या लोकसभा निवडणूकीबाबत राज्यभरात प्रचंड उत्सुकता होती. अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या आणि राज्याचे लक्ष लागलेल्या बीड लोकसभा मतदार संघांमध्ये अपेक्षित  'विजयश्री'नंतर आता खा. डाॅ. प्रीतम मुंडेंचा मतदारसंघात आभार दौरा काढणार आहेत. ८ ते ११ जुन दरम्यान या आभार दौऱ्याचा  पहिला टप्पा असणार आहे.          लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान बीडची राजकीय लढाई चांगलीच रंगली होती.या मध्ये मुंडे भगिनींना निर्विवाद विजयश्री मिळाली.राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री तथा बीड च्या पालकमंत्री असलेल्या ना. पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते ना. धनंजय मुंडे हे नेते आपापल्या पक्षाचे राज्य स्तरावर नेतृत्व करतात.त्यामुळे राजकीयदृष्टय़ा अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावली गेली.  भाजपच्या हाती असलेले एकहाती यश पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी ना. पंकजा मुंडे यांनी ज
इमेज
* मांडवा येथील शेतकरी दुष्काळी अनुदाना पासून वंचित*!  ● _अनुदान वाटप करण्याची मागणी अन्यथा आंदोलन_ ● परळी वै./प्रतिनिधी...        दुष्काळी परिस्थितीत होरपळून निघणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार कडूनही दुष्काळी अनुदाना पासून वंचित ठेवले जात आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळी अनुदान जमा केल्याच्या घोषणावर घोषणा देणाऱ्या सरकारचे पितळ परळी तालुक्यात उघडे पडले आहे.   तालुक्यातील मांडवा येथील  शेतकरी अध्यापही दुष्काळ अनुदान पासून वंचित असून . तात्काळ हे अनुदान खात्यावर जमा करावे आशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.       दुष्काळाच्या झळांमध्ये होर पळलेला मांडवा येथील शेतकरी आपले दुःख विसरून पेरणी करण्याची तयारी करताना दिसत आहे.पण सरकार कडून देण्यात येणारे दुष्काळी अनुदान  दत्तक बँक आँफ महाराष्ट्र शाखेतील खातेदार शेतकऱ्यांना आद्याप मिळाले नाही . शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणारे बि-बियाणे , खत खरेदी करण्यासाठी खाजगी सावकारकडे जाण्याची वेळ आली आहे.           सरकार कडून देण्यात येणारे दुष्काळी अनुदान 50-50% असा प्रकारे दोन टप्प्यात देण्यात येणार आहे.मांडवा गावाची दत्तक बँक आँफ महाराष्ट्र शाखेतील खा

परळी रेल्वे स्थानकात ट्राफिक ब्लॉक; विविध कामांसाठी काही गाड्या रद्द*

इमेज
*परळी रेल्वे स्थानकात ट्राफिक ब्लॉक;  विविध कामांसाठी काही गाड्या रद्द* छायाचित्र : जयराम गोंडे ,स्माईल फोटो स्टुडीओ  परळीवैजनाथ /प्रतिनिधी. ...         परळी रेल्वे स्थानकात ट्राफिकब्लॉक घेण्यात आला असून  विविध कामांसाठी काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या कामांची युद्धपातळीवर लगबग सुरू असल्याचे आज रेल्वे स्थानक परिसरात दिसून येत आहे. छायाचित्र :जयराम गोंडे, स्माईल फोटो स्टुडीओ परळीवैजनाथ         परळी रेल्वे स्थानकाजवळ  रेल्वे ने हाती घेतलेल्या नॉन-इंटर लॉक वर्किंग करिता 3 दिवस ट्राफिक ब्लॉक घेण्यात आल्या मुळे  काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही रेल्वे गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. गाडी संख्या 51522 पूर्णा ते परळी सवारी गाडी – दिनांक 8, 9 आणि 10 मे, 2019 रोजी रद्द करण्यात आली आहे. गाडी संख्या 51521 परळी ते पूर्णा सवारी गाडी – दिनांक 8, 9 आणि 10 मे, 2019 रोजी रद्द करण्यात आली आहे.गाडी संख्या 57554 आदिलाबाद ते परळी सवारी गाडी दिनांक 8, 9 आणि 10 मे, 2019 रोजी परभणी ते परळी दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.गाडी संख्या 57553 परळी ते आदिलाबाद सव

गित्ते भावंडांनी मिळवली गायन व वादनात विशेष योग्यता

इमेज
*कु.श्रेया व चि.आरव या  गित्ते भावंडांचे संगीत  परिक्षेत घवघवीत यश*   ● _गायन व वादनात मिळवली विशेष योग्यता_ ● परळी वैजनाथ /प्रतिनिधी. ...         संगीत विषयातील गायन परिक्षेत कु. श्रेया मधुकर गित्ते हिने आणि तबला वादन परीक्षेत चि.आरव मधुकर गित्ते या बहिण - भावांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विशेष बाब म्हणजे या परिक्षेत गित्ते भावंडांनी   गायन व वादनात विशेष योग्यता मिळवलीआहे.या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.         अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडल मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या नोव्हेंबर २०१८ या सत्राचा संगीत परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या मध्ये गायन या विषयात कु. श्रेया मधुकर गित्ते हिने परिक्षा प्रविष्ट केली होती. या परिक्षेत तीने घवघवीत यश संपादन केले. तिने पैकीच्या पैकी गुण संपादित करत विशेष योग्यता श्रेणी प्राप्त केली आहे. तर चि.आरव मधुकर गित्ते याने तबला या विषयात वादन परीक्षेत पैकीच्या पैकी गुण संपादित करत विशेष योग्यता श्रेणी प्राप्त केली आहे. त्यांना परळी येथील गुरुकृपा संगीत विद्यालयाचे शिक्षक श्रीकांत दहिफळे यांचे मार्गदर्शन लाभ
इमेज
बुधवारची एकादशी 'त्रीस्पृशा' एकादशी; धार्मिक दृष्ट्या दुर्मिळ योगायोग ! ● गीताजयंती,एकादशी, द्वादशी, त्रयोदशी युक्त वार● परळी वैजनाथ / रविंद्र जोशी.......           पंचागानुसार वार, तिथी , नक्षत्र आदींसह अन्य बाबींचा धार्मिक दृष्टीने विचार केला जातो. या मध्ये अनेक वेळा अनेक तिथी वृद्धी -क्षय होतो. परंतु यातून निर्माण होणारे तिथीबदल व योग याचे अत्यंत महत्त्व समजले जाते. अशाच प्रकारे अनेक वर्षांनंतर असा धार्मिकदृष्ट्या दुर्मिळ योग आजच्या बुधवार (दि. १९) रोजी आलेल्या एकादशीबाबतही आहे. ही  एकादशी 'त्रीस्पृशा' एकादशी आहे.गीताजयंती, एकादशी, द्वादशी,त्रयोदशीयुक्त असा एकत्रितपणे हा  वार असून अनेक वर्षानंतर असा योगायोग आल्याचे पंचाग अभ्यासक व अध्यात्मिक तज्ञांनी स्पष्ट केले आहे.

प्रा. व्ही. बी.देशपांडे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली! !!!!!

इमेज
* आज "बेटा" शब्द - नि:शब्द .........!*                                  -  ♦ प्रा. रविंद्र जोशी ♦       एक वेगळा बाज, दिमाखदार व शाही वर्तन जे काही असेल ते धडक - बेधडक मांडण्याची नैसर्गिक वृत्ती आणि परळीत कोणीही असो त्याला चार चांगले शब्द सांगण्याचा -सुनावण्याची अधिकारवाणी असलेले प्रा. व्ही.बी.देशपांडे यांनी अखेरचा निरोप घेतला. त्यांच्या विविध क्षेत्रातील सहभागाने ते सर्वपरिचित होतेच त्याहीपेक्षा वडीलकीच्या नात्याला परिपूर्ण जपणारे व्यक्तीमत्व होते. प्रत्येकाला आपलेपणाची जाणीव करून देणारा " बेटा" हा शब्द आज त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला आठवल्याशिवाय राहणार नाही. एक प्रकारे त्यांच्या जीवनशैलीत अविभाज्य बनलेला हा शब्द होता. आदरणीय सरांच्या जाण्याने जणू  "बेटा" शब्द - नि:शब्द झाला आहे असे वाटते. सरांना भावपूर्ण श्रद्धांजली! !!!!!

हिंदू -मुस्लिम एकतेचे प्रणेते डॉ.मौलाना अबुल कलाम आजाद - प्रा.टी. पी.मुंडे

इमेज
हिंदू -मुस्लिम एकतेचे प्रणेते डॉ.मौलाना अबुल कलाम आजाद - प्रा.टी. पी.मुंडे परळी (प्रतिनिधी)          भारताचे माजी पहिले शिक्षण मंत्री डॉ. मौलाना अबुल कलाम आजाद हे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रणेते होते असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य तथा प्रदेश सरचिटणीस प्रा. टी.पी .मुंडे (सर )यांनी केले       परळीतील संपर्क कार्यालयांमध्ये डॉ.मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी करण्यात आली डॉ. मौलाना अबुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या प्रतिमेला हार घालण्यात आला यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत मुंडे ज्येष्ठ नेते फारुख भाई ,महेमुद भाई ,बाबा शेख , इलियास भाई काँग्रेसचे अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष जम्मू सेठ, शहराध्यक्ष बबलू सय्यद साजिद, गफार भाई बागवान ,शेख फैय्याज ,मतीन मणियार, शेख सिकंदर, शेख जावेद, मुईज नवाब आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते        पुढे बोलताना प्रा .टी.पी .मुंडे (सर )म्हणाले की डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद यांची जीवन तरुणांना प्रेरणा देणारे असून त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये अतिशय मोलाची भूमिका बजावली आहे त्यांच्यामुळेच आज देश

धनंयज मुंडेंनी मांडल्या मुख्यमंत्र्यांसमोर बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांच्या व्यथा

इमेज
शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या धनंयज मुंडेंनी मांडल्या  मुख्यमंत्र्यांसमोर बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांच्या व्यथा बीड दि.12.......... मुख्यमंत्री महोदय यावर्षी 1972 वर्षापेक्षाही भिषण दुष्काळ आहे, तुम्ही कागदावर दुष्काळ जाहिर केला असला तरी, उपाययोजनांची अंमलबजावणी मात्र होत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना खरोखरच आधार द्यायचा असेल तर हेक्टरी 50 हजार रूपये तातडीने मदत द्या अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंयज मुंडे यंानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.  बीड जिल्ह्यातील दुष्काळी आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री आज जिल्ह्यात आले होते, मागील 8 दिवसांपासून दिवाळीचा सण साजरा न करता शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणुन घेणार्‍या धनंजय मुंडे यांनी शेतकर्‍यांच्या या व्यथा आणि वस्तुस्थिती या बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणुन दिली. या बैठकीत प्रस्तावित करताना जिल्हाधिकार्‍यांनी बोंडअळीची नुकसान भरपाई, पिक विमा याचे शंभर वाटप व कर्जमाफीची 100 टक्के अंमलबजावणी झाल्याचे आकडे सादर केले. त्याचा धागा पकडत बोलताना श्री.मुंड

परळीतील पाणी प्रश्‍नाकडे धनंजय मुंडेंनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष

इमेज
परळीतील पाणी प्रश्‍नाकडे धनंजय मुंडेंनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष पुस व पट्टीवडगाव पाणी पुरवठा योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी बीड दि.12.......... परळी वैजनाथ शहराला पाणी पुरवठा करणार्‍या वाण धरणात केवळ 17 टक्के पाणी साठा राहिल्याने परळी शहराला आगामी काळात मोठ्या पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे, त्यासाठी संपुर्ण पाणी साठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याची मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करून परळीच्या पाणी प्रश्‍नाकडे त्यांचे लक्ष वेधले. त्याचबरोबर पुस व 20 खेडी व पट्टीवडगाव व 9 खेडी पाणी पुरवठा योजनेचे वीज बील माफ करून या योजना पुन्हा सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली.      बीड जिल्ह्याच्या दुष्काळी आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीडमध्ये आले असता ना.मुंडे यांनी परळी विधानसभा मतदार संघातील पाणी प्रश्‍नाकडे त्यांचे लक्ष वेधले. वाण धरणावर परळी शहरासह नागापूर, आस्वलांबा, दौनापूर, टोकवाडी डाबी या पाच गावांच्या पाणी पुरवठा योजना आहेत. तसेच वैद्यनाथ कारखान्याला येथुनच पाणी पुरवठा होतो. सद्या धरणात
इमेज
मुख्यमंत्री दौरा: सकारात्मक पाउल... ! बीड जिल्ह्यासाठी 24 कोटींच्या निधीची तरतूद बीड /प्रतिनिधी ........               बीडमध्ये भीषण दुष्काळ असून त्यासाठी 24 कोटींच्या निधीची तरतूद केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच सध्या खरीप हंगामावर संकट असल्याचेही म्हटले. बीडमध्ये दुष्काळ दौर्‍यादरम्यान घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.             बीडमध्ये दुष्काळ असून अन्न्याधान्याच्या नियोजनाचे आदेश प्रशासनाला दिल्याचे त्यांनी सांगितले. जिथे जिथे पाणी नसेल तिथे चारा छावण्या सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाण्यासाठी एकूण 2162 योजना मान्य केल्या असून बीडसाठी 24 कोटींच्या निधीची तरतूद केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्री दौरा : दुष्काळी परिस्थितीत पदरात काही पडणार का?

इमेज
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातून भयावह दुष्काळी परिस्थितीत काही तरी पदरी पडण्याचा आशावाद! ● शैक्षणिक शुल्क पूर्णतः माफ करावे व हेक्टरी अधिकाधिक मदत देण्याची गरज ● परळी वैजनाथ /रविंद्र जोशी ............           संपुर्ण मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात गंभीर दुष्काळ आहे.यावेळचा अभूतपूर्व दुष्काळ असल्याने सर्वच समाजघटक या भयावह परिस्थितीत होरपळून निघणार आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रमुख नेतेमंडळी दुष्काळ पहाणी दौरा करत आहेत.बीडच्या पालकमंत्री ना.पंकजा मुंडे, खासदार डाॅ. प्रितम मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी परळी तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती दौरा करून पाहिली आहे.आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दि.१२ रोजी बीड दौऱ्यावर येत आहेत.मुख्यमंत्र्यां च्या दौऱ्यातून भयावह दुष्काळी परिस्थितीत काही तरी पदरी पडण्याचा आशावाद व्यक्त होत आहे.          राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत राज्य सरकारने केलेल्या पहिल्या पाहणीच्या आधारे प्राप्त  अहवालानुसार गंभीर दुष्काळ असल्याचे निदर्शनास आले.या मध्ये बीड जिल्हयातील सर्वच तालुक्यांचा समावेश आहे. मात्र दुष्काळी भा

*परळीत रविवारी श्रीगुरु संत सोपानकाका महाराज यांचा ७१ वा पुण्यतिथी महोत्सव*

इमेज
*परळीत रविवारी श्रीगुरु संत सोपानकाका महाराज यांचा  ७१ वा पुण्यतिथी महोत्सव* ● कीर्तने व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन● परळी वैजनाथ । प्रतिनिधी. ..       परळी पंचक्रोशीतील महान संत श्रीगुरु संत सोपानकाका महाराज यांचा  ७१ वा पुण्यतिथी महोत्सव रविवार दि. ११ रोजी आहे. त्यानिमित्ताने परळीत  मान्यवर कीर्तनकारांची कीर्तने व विविध पारंपरिक धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. वारकरी संप्रदायातील व उखळीकर भजनी फडावरील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.       श्रीगुरु संत सोपानकाका महाराज मंदिर येथे आज रविवार दि. ११ रोजी  ७१ वा पुण्यतिथी महोत्सव संपन्न होणार आहे. या महोत्सवात सकाळी ११ ते १ जगमित्रनागा मंदिर येथे हभप ज्ञानेश्वर महाराज उखळीकर यांचे पूजेचे किर्तन होणार आहे. दुपारी २ ते ४ संत सोपानकाका महाराज मंदिर येथे महामंडलेश्वर स्वामी भागवतानंदजी महाराज कैलास आश्रम वेरूळ यांचे तर रात्री ९ते११ हभप परमेश्वर महाराज जायभाये आळंदी यांचे किर्तन होणार आहे. तसेच विविध धार्मिक कार्यक्रम दिवसभरात होणार आहेत. तरी या कार्यक्रमाल