● _कै.राजीवगांधी अनु.जाती जमाती निवासी मा.आश्रम शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात_ ●



*देशभक्तीने प्रेरीत शालेय विद्यार्थीच देशाच्या जडणघडणीचा पाया - शिवाजी मव्हाळे* 


● _कै.राजीवगांधी अनु.जाती जमाती निवासी मा.आश्रम शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात_ ●

सोनपेठ / प्रतिनिधी. .......
        देशभक्तीने प्रेरीत शालेय विद्यार्थीच देशाच्या जडणघडणीचा पाया असतात. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे लक्षात घेऊन प्रत्येकाने या प्रवाहात सामील झाले पाहिजे.शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हेच ध्येय असुन देशनिष्ठ विद्यार्थी घडावा यासाठी प्रयत्न असल्याचे प्रतिपादन कै. राजकुमार मव्हाळे ग्रामीण विकास सेवाभावी  संस्थेचे अध्यक्ष शिवाजी मव्हाळे यांनी स्वातंत्र्य दिन समारंभात केले. 

     खडका येथील कै. राजीवगांधी अनु.जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रम शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर केले. त्याचप्रमाणे देशभक्तीपर मनोगते व गीते सादर केली. प्रारंभी कै. राजकुमार मव्हाळे ग्रामीण विकास सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी मव्हाळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण व राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देण्यात आली.सामुहिक राष्ट्रगीताने उपस्थित सर्वांनी राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली.  शाळेच्या भव्य दिव्य परिसराला देशभक्तीपर प्रतिकांनी विविध प्रकारे सजविण्यात आले होते. या वेळी झालेल्या स्वातंत्र्य दिन समारंभात व्यासपीठावर कै. राजकुमार मव्हाळे ग्रामीण विकास सेवाभावी  संस्थेचे अध्यक्ष शिवाजी मव्हाळे यांच्यासह संस्थेचे कोषाध्यक्ष ज्ञानोबा मव्हाळे, शाळेचे मुख्याध्यापक डि.एस.सोनकांबळे, वस्तीगृह अधिक्षक डी. एम. माने, महिला वस्तीगृह अधिक्षिका सौ.आम्रपाली मव्हाळे आदी उपस्थित होते.
        पुढे बोलताना शिवाजी मव्हाळे यांनी सांगितले की, देश पारतंत्र्यात होता तेंव्हा अनेकांनी आपल्या जीवाची बाजी लावून प्रसंगी बलिदान देउन स्वातंत्र्य मिळवले. आज आपण सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून वाटचाल करीत आहोत. आपला देश अधिकाधिक विकासाच्या मार्गाने पुढे जात असताना येणाऱ्या पिढ्या देशभक्तीने प्रेरीत निर्माण होणे गरजेचे आहे. देशभक्तीने प्रेरीत शालेय विद्यार्थीच देशाच्या जडणघडणीचा पाया असतात त्यामुळे शालेय विद्यार्थी सर्वांगीण घडला पाहिजे असे त्यांनी सांगितले.यावेळी कार्यक्रमास पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
           कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर मनोगत  शाळेचे मुख्याध्यापक डि.एस.सोनकांबळे यांनी केले.सुत्रसंचलन सहशिक्षक जालमिले यांनी तर आभार प्रदर्शन सहशिक्षक जोशी यांनी केले. कार्यक्रमाला पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !