४० बालकांना वृक्षारोपण, गीतापाठ, संकिर्तनासह गोसेवेची प्रत्यक्ष घडवली अनुभुती



परळी गीता परिवाराच्या वतीने रामरक्षा गोशाळेत क्षेत्रभेट!


● ४० बालकांना वृक्षारोपण,  गीतापाठ, संकिर्तनासह गोसेवेची प्रत्यक्ष घडवली अनुभुती ●

परळी वैजनाथ /प्रतिनिधी. ...
    प. पु. गोविंददेव गिरीजी महाराज  (किशोरजी व्यास ) यांच्या प्रेरणेने संचलित परळी गीता परिवाराच्या वतीने अंबाजोगाई रस्त्यावरील रामरक्षा गोशाळेत क्षेत्रभेट उपक्रम घेण्यात आला. यामध्ये ४० बालकांना गीतापाठ, संकिर्तनासह गोसेवेची प्रत्यक्ष अनुभुती घडवली.त्याचबरोबर या बालकांना निसर्गसानिध्य देत वृक्षारोपण करुन वृक्षसंवर्धन व संगोपनासाठी संस्कार रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला.


     गीता परिवार परळी वैद्यनाथ च्या माध्यमातून संस्कारवर्ग व संस्कृतीरक्षक उपक्रम राबविण्यात येतात. या अनुषंगाने   अंबाजोगाई रस्त्यावरील रामरक्षा गोशाळेत क्षेत्रभेट उपक्रम घेण्यात आला. या मध्ये 40 बालक सहभागी झाले होते.बालकांना गीतापाठ, संकिर्तनासह गोसेवेची प्रत्यक्ष अनुभुती घडवली. मुलांच्या हस्ते गाईंना गुळ, पेंढ, चारा देण्यात आला. भगवद्गीता  12 वा आणि  15 वा अध्याय पाठ एकत्रितपणे घेण्यात आला तसेच संकीर्तन केले. यावेळी मुलांना निसर्गसानिध्य देत वृक्षारोपण करुन वृक्षसंवर्धन व संगोपनासाठी संस्कार रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला.


      कार्यक्रम  यशस्वी करण्यासाठी  गीता परिवारच्या सदस्या सौ. राजकन्या मंत्री,  सौ.श्वेता काबरा यांच्यासह गोपाल लटोरिया, सौ.उर्मिला झंवर ,सौ.अर्चना सोनी यांचा विषेश सहयोग मिळाला. आशिष काबरा,  शाम मंत्री यांनी जाण्या -येण्याची व्यवस्था  तसेच पेंड, गुळ आदी सहयोग दिला. यावेळी  राम रक्षा गोशाळेचे संस्थापक गोपाल कोठारी, सौ.कोठारी, रतन  कोठारी  व गोशाळेचे सहकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !