समाजभुषण स्व. सुवालालजी वाकेकर पुरस्कारांची घोषणा



समाजभुषण स्व. सुवालालजी वाकेकर पुरस्कारांची घोषणा

पालकमंत्री ना.धनंजय मुंडे, उद्योगपती रमेश फिरोदीया, ज्येष्ठ साहित्यीक प्रा.डॉ.दासू वैद्य  पुरस्कारांचे मानकरी

सार्वजनिक कार्यक्रमावरील निर्बंध शिथील होताच होणार कार्यक्रम

परळी (प्रतिनिधी-)
समाजभुषण स्व. सुवालालजी वाकेकर (ललवाणी) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मारवाडी युवा मंचच्या वतीने देण्यात येणार्या  राज्यस्तरीय पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. राज्याचे सामाजिक न्याय तथा विशेष सहाय्यमंत्री  तथा नाथ प्रतिष्ठाणचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे (राज्य भुषण), उद्योगपती रमेश फिरोदीया (समाज भुषण) व प्रसिद्ध साहित्यीक प्रा.डॉ.दासू वैद्य (साहित्य भुषण) यांना स्व. सुवालालजी वाकेकर पुस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध असून हे निर्बंध शिथील होताच कार्यक्रमाची तारिख जाहीर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून रामाणाचार्य रामराव महाराज ढोक व प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध कवि  अशोक नायगावकर उपस्थित राहणार असल्याचे मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, कार्याध्यक्ष विजय वाकेकर, सचिव जयपाल लाहोटी व पुरस्कार निवड समितीने एका पत्रकाद्वारे केली आहे.
मारवाडी युवा मंचच्या वतीने समाजभुषण स्व. सुवालालजी वाकेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ राज्यस्तरीय विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. पुरस्कारांचे हे 16 वे वर्ष असून कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या लॉकडाऊन असल्याने स्व. सुवालालजी वाकेकर यांच्या 27 जून या तिथीचे औचित्य साधून आज पुरस्कार कार्यक्रमाची औपचारिक घोषणा मारवाडी युवा मंचच्या वतीने करण्यात आली.
समाजभुषण स्व. सुवालालजी वाकेकर स्मृती पुरस्कारासाठी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना. धनंजय मुंडे (राज्य भुषण), उद्योगपती रमेश फिरोदीया (समाज भुषण) व प्रसिद्ध साहित्यीक प्रा.डॉ.दासू वैद्य (साहित्य भुषण) पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ना.धनंजय मुंडे यांनी अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाणच्या माध्यमातून सामुदायीक विवाह सोहळा, विविध महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्तचे महोत्सव तसेच कोरोना कालावधीत संपुर्ण मतदारसंघात गरजूंना अन्नधान्यांचे केलेले वाटप महत्वाचे असून त्यांचा राज्य भुषण पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
रमेश कनकमलजी फिरोदीया हे  अहमदनगर येथील असून ते चार्टर्ड अकाऊंटंट आहेत. उद्योग, व्यवसाय आणि समाजकारणात त्यांचे मोठे योगदान असून नगर येथील आनंद ऋषी हॉस्पीटल, ब्लड बँक व भक्त निवासच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान आहे. या योगदानाबद्दल त्यांचा समाजभुषण पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. तिसरा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यीक तथा बालकवि प्रा.डॉ.दासू वैद्य यांना जाहीर करण्यात आला आहे. प्रा. दासू वैद्य यांचे बाल साहित्य अत्यंत प्रसिद्ध असून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे विभाग प्रमुख कार्यरत आहेत. अनेक चित्रपटासाठी त्यांनी गीते लिहीली असून दुरदर्शनवरही त्यांचे कार्यक्रम प्रक्षेपीत झालेले आहेत.
दरम्यान, सध्या अनलॉक-1 असून अद्याप शासनाने सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी दिलेली नाही. केवळ पुण्यतिथीचे औचित्य साधून आज पुरस्कार प्राप्त व्यक्तीमत्वांची नावे जाहीर करत असल्याचे मारवाडी युवा मंचच्या वतीने सांगण्यात आले. सदरच्या कार्यक्रमाची वेळेनुसार तारिख जाहीर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून रामाणाचार्य, प्रवचनकार रामराव महाराज ढोक उपस्थित राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यीक अशोक नायगावकर यांना निमंत्रीत करण्यात आल्याचे मारवाडी युवा मंचच्या वतीने अध्यक्ष चंदुलाल बियाणी, कार्याध्यक्ष विजय वाकेकर, सचिव जयपाल लाहोटी, धरमचंद बडेरा, सतिश सारडा, व पुरस्कार निवड समितीचे सदस्य प्रा. मधु जामकर, प्रा.कपुरचंद पोकर्णा, प्रा. शांती लाहोटी, अरुण पवार यांनी कळविले आहे.


चौकट-
अशोक नायगावकर 27 जूनला लाईव्ह
समाजभुषण स्व. सुवालालजी वाकेकर यांची 27 जून रोजी पुण्यतिथी असून जाहीर कार्यक्रम होणार नसल्याने ज्येष्ठ साहित्यीक अशोक नायगावकर दै.मराठवाडा साथी व झक्कास मराठी फेसबुक कार्यक्रमात लाईव्ह सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम रात्री 8 वा. होत असून आपण लिंकद्वारे यामध्ये सहभागी होऊ शकता. आई वडिल हा नायगावकर यांचा लाईव्हचा विषय आहे.

25 हजार वह्यांचे वाटप
स्व.सुवालालजी वाकेकर प्रतिष्ठानच्या वतीने परळी शहर व तालुक्यातील विविध शाळेत गरीब विद्यार्थ्यांना सुमारे २५ हजार वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. शाळा सुरू होताच प्रत्येक शाळेत जावून वह्यांचे वाटप यंत्रणेमार्फत केले जाणार असल्याचे डॉ.प्रकाश वाकेकर यांनी सांगितले. मागिल १५ वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटपाचा उपक्रम राबविला जातो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !