*लोकसभेतील 'विजयश्री'नंतर आता खा. डाॅ. प्रीतम मुंडेंचा मतदारसंघात आभार दौरा* 


_८ ते ११ जुन दरम्यान पहिला टप्पा_ ●

परळी वैजनाथ /प्रतिनिधी. ......
         बीडच्या लोकसभा निवडणूकीबाबत राज्यभरात प्रचंड उत्सुकता होती. अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या आणि राज्याचे लक्ष लागलेल्या बीड लोकसभा मतदार संघांमध्ये अपेक्षित  'विजयश्री'नंतर आता खा. डाॅ. प्रीतम मुंडेंचा मतदारसंघात आभार दौरा काढणार आहेत. ८ ते ११ जुन दरम्यान या आभार दौऱ्याचा  पहिला टप्पा असणार आहे.
         लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान बीडची राजकीय लढाई चांगलीच रंगली होती.या मध्ये मुंडे भगिनींना निर्विवाद विजयश्री मिळाली.राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री तथा बीड च्या पालकमंत्री असलेल्या ना. पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते ना. धनंजय मुंडे हे नेते आपापल्या पक्षाचे राज्य स्तरावर नेतृत्व करतात.त्यामुळे राजकीयदृष्टय़ा अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावली गेली.  भाजपच्या हाती असलेले एकहाती यश पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी ना. पंकजा मुंडे यांनी जोरदार प्रयत्न केला. यामध्ये त्यांना निर्विवाद यश मिळाले. डाॅ. प्रीतम मुंडे या एक लाख ६८ हजाराने विजयी झाल्या असून त्यांनी लोकसभेत दिवंगत लोकनेते  गोपीनाथ मुंडे यांना मिळालेल्या मतापेक्षाही अधिकची मते घेतलेली आहेत. या लोकसभेच्या निकालातून विधानसभा निकालांचे आडाखे बांधले जात असुन डाॅ. प्रितम मुंडे यांच्या विजयाने भाजप  कार्यकर्त्यांचे निश्चितच मनोबल वाढले आहे.
       लोकसभा निवडणुकीतील अपेक्षित  'विजयश्री'नंतर आता खा. डाॅ. प्रीतम मुंडेंचा मतदारसंघात आभार दौरा काढणार आहेत. ८ ते ११ जुन दरम्यान या आभार दौऱ्याचा  पहिला टप्पा असणार आहे.या निमित्ताने पुन्हा एकदा संपूर्ण जिल्हा ढवळून काढणार असून अगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदारांचा हा आभार दौरा महत्त्वामहत्त्वाचा ठरणारा आहे. चार दिवसाच्या या दौऱ्यात बीड, परळी व अंबाजोगाई तालुक्यातील गावांचा समावेश असून या आभार दौऱ्याबरोबरच जिल्ह्य़ातील  लग्न समारंभ, अन्य प्रासंगिक कार्यक्रम असा जनसंपर्काचा व्यस्त हा दौरा असणार आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार