माजलगाव येथे स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज पुण्यशताब्दी निमित्त

भागवतमर्मज्ञ ह.भ.प बाळु महाराज उखळीकर यांच्या सुमधूर वाणीतूनभागवत कथा ज्ञानयज्ञ

माजलगाव /प्रतिनिधी.........
     सुप्रसिद्ध भागवतकथा प्रवक्ते  भागवतमर्मज्ञ ह.भ.प बाळु महाराज उखळीकर यांच्या सुमधूर वाणीतून भागवतकथा ज्ञानयज्ञ आयोजन करण्यात आले आहे. माजलगाव येथे श्रीमद् भागवत कथेला आज दि. 8 रोजी उत्साहात प्रारंभ  झाला. यावेळी कथा श्रवणाचा भाविक मोठ्या संख्येने लाभ घेत आहेत.
    माजलगाव येथे स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज पुण्यशताब्दी निमित्ताने शिवाजीनगर महिला भजनी मंडळाच्या वतीने दि. ८ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी  सप्ताहात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवतकथा प्रवक्ते  भागवतमर्मज्ञ ह.भ.प बाळु महाराज उखळीकर यांच्या सुमधूर वाणीतून भागवतकथा ज्ञानयज्ञ आयोजन करण्यात आले आहे. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज पुण्यशताब्दी निमित्त होत असलेल्या या सोहळ्यात विविध अध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दररोज दुपारी १ ते ५  या वेळेत भागवतमर्मज्ञ ह.भ.प बाळु महाराज उखळीकर यांच्या सुमधूर वाणीतून भागवतकथा निरूपण होणार आहे.
    या सोहळ्यात ह.भ.प. महारुद्र महाराज पवार, ह.भ.प. भागवत महाराज शिंदे, ह.भ.प. भगवानबाबा पात्रुडकर, ह.भ.प. कृष्णदास महाराज सताळकर, ह.भ.प. सिताराम महाराज रोडगे, ह.भ.प. जनार्दनदास शिंदे ह.भ.प. शिवानंद महाराज शास्री, यांची किर्तनसेवा होणार आहे.  ह.भ.प. महंत एकनाथ महाराज माने यांच्या काल्याच्या किर्तनाने सोहळ्याचा समरोप होणार आहे. या कार्यक्रमाला माजलगाव पंचक्रोशीतील गुणीजन गायक, वादक, भजनी मंडळी, भाविक उपस्थित राहणार आहेत. दरम्यान या भागवतकथा ज्ञानयज्ञाला उत्साहात प्रारंभ झाला असुन सप्ताहभर हा सोहळा होणार आहे.
     तरी भाविकांनी या अध्यात्मिक पर्वणीचा व कथा श्रावणाचा लाभ घ्यावा असे आवाहन  सोहळ्याचे आयोजक शिवाजी नगर महिला भजनी मंडळ यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार