*मांडवा येथील शेतकरी दुष्काळी अनुदाना पासून वंचित*!

 ● _अनुदान वाटप करण्याची मागणी अन्यथा आंदोलन_ ●

परळी वै./प्रतिनिधी...
       दुष्काळी परिस्थितीत होरपळून निघणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार कडूनही दुष्काळी अनुदाना पासून वंचित ठेवले जात आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळी अनुदान जमा केल्याच्या घोषणावर घोषणा देणाऱ्या सरकारचे पितळ परळी तालुक्यात उघडे पडले आहे.   तालुक्यातील मांडवा येथील  शेतकरी अध्यापही दुष्काळ अनुदान पासून वंचित असून . तात्काळ हे अनुदान खात्यावर जमा करावे आशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
      दुष्काळाच्या झळांमध्ये होर पळलेला मांडवा येथील शेतकरी आपले दुःख विसरून पेरणी करण्याची तयारी करताना दिसत आहे.पण सरकार कडून देण्यात येणारे दुष्काळी अनुदान  दत्तक बँक आँफ महाराष्ट्र शाखेतील खातेदार शेतकऱ्यांना आद्याप मिळाले नाही . शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणारे बि-बियाणे , खत खरेदी करण्यासाठी खाजगी सावकारकडे जाण्याची वेळ आली आहे.
          सरकार कडून देण्यात येणारे दुष्काळी अनुदान 50-50% असा प्रकारे दोन टप्प्यात देण्यात येणार आहे.मांडवा गावाची दत्तक बँक आँफ महाराष्ट्र शाखेतील खातेदार शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी तहसील प्रशासन कडून 50% अनुदान वाटप करण्यासाठी एक यादी बँके कडे चेकसह यादी देण्यात आली आहे. तर आणखी एक 50% अनुदानची यादी तहसील प्रशानकडे आहे. बँकेकडे देण्यात आलेली यादी व पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार यासाठी शेतकरी बँकेत ये-जा करत आहेत . बँकेच्या वतीने रोज आज किंवा उद्या जमा करू असे टोलवा टोलवीचे उत्तरे दिली जात आहेत.पेरणी साठी लागणारे बि-बियाणे ,खत खरेदी साठी तर लवकर पैसे द्यावेत अन्यथा अंदोलन करण्याचा इशाराही मांडवा गावातील शेतकऱ्यांनी दिला आहे.

*@@@@*
          सध्या पेरणी तोंडावर आली आहे. अगोदरच शेतकरी अर्थिक विवंचनेत आहे. त्यातच दुष्काळी अनुदान येईल व बुडत्याला काडीचा आधार मिळेल असे वाटत होते मात्र अद्याप हे अनुदान प्राप्त झाले नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. बँकेने व संबंधितांनी याकडे लक्ष देऊन न्याय द्यावा.

      *- मोहन साखरे*
         ग्रा. प. सदस्य तथा शेतकरी,मांडवा ता. परळी वैजनाथ. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार