५८ दिवसांनंतर निघण्यासाठी सज्ज 'लालपरी' वाट पाहून पाहून थांबली !

*परळी आगारात दिवसभरात आले केवळ दोन प्रवासी*


परळी वैजनाथ, प्रतिनिधी:-
       कोरोनामुळे ठप्प झालेली अर्थव्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.त्याचाच एक भाग म्हणून परिवहन महामंडळाची लालपरी शुक्रवार दि.22 मे पासून धावणार यासाठी परळी आगारात  8 गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र सकाळपासून कोणीही प्रवासी बसस्थानकावर फिरकलेच नाही.दिवसभरात केवळ दोन प्रवासी आले. त्यामुळे परळी आगारातून बसच्या नियोजित फेर्या झाल्या नाहीत.
         दोन महिन्यांपासून बसून असलेल्या महामंडळाच्या बसेस शुक्रवारपासून सुरू करण्यात आल्या. शासनाच्या बसेस या जिल्हा अंतर्गत धावणार आहेत. परळी आगारात बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले. परळी-बीड अणि परळी-अंबाजोगाई अशा प्रत्येकी बारा फेर्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे.यासाठी एकूण आठ बसेस सज्ज करण्यात आल्या. होत्या अशी माहिती आगारप्रमुख  आर.बी.राजपुत  यांनी दिली. मात्र 'वाट पाहिन पण एसटीनेच जाईन 'असे नेहमी म्हटले जाते परंतु आज वाट पाहिन पण  प्रवासी घेउनच जाईन ' असे म्हणण्याची वेळ एसटीवर आल्याचे दिसून आले.सध्या कोरोनाची नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतलेली असुन घराबाहेर पडणे लोक टाळताना दिसत आहेत. टाळाबंदीचे काटेकोर पालन करण्याकडे लोकांचा कल वाढला असून प्रवासाला बाहेर कोणीही पडत नसल्याचे दिसून आले.परळी आगारात दुपारपर्यंत केवळ दोन प्रवासी बसस्थानकावर आले.त्यामुळे ५८ दिवसांनंतर निघण्यासाठी सज्ज झालेली 'लालपरी' वाट पाहून पाहून थांबल्याचे चित्र पहायला मिळाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !