इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

कोरोना महामारीत परळीत युवकांचा घरोघर 'माधुकरी' गोळा करून गरजूंना अन्नदान यज्ञ !

कोरोना महामारीत परळीत युवकांचा  घरोघर 'माधुकरी' गोळा करून गरजूंना अन्नदान यज्ञ  !


• _शिवनगरमधिल युवकांचा २५ दिवसांपासून उपक्रम_ •

परळी वैजनाथ/ प्रतिनिधी....
      कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागु करण्यात आलेल्या टाळाबंदीने अनेकांना अनेक अडचणी येत आहेत.त्याचप्रमाणे अडल्या नडलेल्यांना अडचणी येऊ नयेत यासाठीही अनेक प्रयत्नशिल हात पुढे येत गरजुंना सर्वोतोपरी मदत करत आहेत.अशाच प्रकारे गेल्या २५ दिवसांपासून मांगिर बाबा मित्र मंडळाचे श्रीनाथ विभूते, कृष्णा भास्कर व अन्य युवक गल्लीत प्रत्येक घरातून घरोघर 'माधुकरी' गोळा करून गरजूंना अन्नदानयज्ञ करण्याचा उपक्रम राबवताना दिसत आहेत. सर्वसामान्य घरांतील युवकांनी एकत्रित येत राबवलेला हा उपक्रम माणुसकीचे मुर्तीमंत उदाहरण ठरला आहे.
       कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागु करण्यात आलेल्या टाळाबंदीच्या परिस्थितीत गरजुंपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीसाठी नागरीक,  संस्था पुढे येत आहेत.  कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागु करण्यात आलेल्या टाळाबंदीने  देश व राज्यातील हातावर पोट असलेल्या नागरिकांची  परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. रोजच्या जीवनावश्यक साधनसामग्री बाबत नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या परिस्थितीमध्ये अनेक निराश्रित, निराधार, भिक्षेकरी व विविध ठिकाणच्या अडकून पडलेल्या आधार नसलेल्या लोकांना जेवण मिळत नाही हे लक्षात घेऊन या अनुषंगाने शिवनगर (वडार काँलनी) येथील मांगिर बाबा मित्र मंडळाचे श्रीनाथ विभूते, कृष्णा भास्कर व अन्य युवक पुढे आले व   तत्परतेने सामाजिक कर्तव्य लक्षात घेऊन या लोकांना जेवण देण्यासाठी सरसावले.
        या अतिशय बिकट व कठीण परिस्थितीत एकजुटीने प्रत्येकाने पुढे येत आपल्या गल्लीतूनच अन्न पदार्थ गोळा करून भुकेलेल्या लोकांची दोन वेळची सोय करण्याचे ठरवले. गेल्या पंचवीस दिवसांपासून हा उपक्रम अखंडपणे सुरू झाला आहे.शिवनगर (वडार काँलनी) येथील मांगिर बाबा मित्र मंडळाचे श्रीनाथ विभूते, कृष्णा भास्कर , बळीराम घोगरे,दिलीप सोळंके, नवनाथ विभूते,आकाश कूंडकर, विशाल तोरडमल, राम शाहाणे, गोविंद भास्कर,चंद्रकांत वाघमारे, विशाल गवते, शिव नगर,(वडार काँलनी) व सर्व शिव नगर रहिवाशी यांचे सहकार्य  लाभले आहे.दररोज हे युवक घरोघरी जाऊन पोळ्या,भाकरी, भात , भाजी एकत्र गोळा करून गरजूंना वाटप करतात. सर्वसामान्य घरांतील युवकांनी एकत्रित येत राबवलेला गल्लीतील प्रत्येक घरातून 'माधुकरी' गोळा करून गरजूंना अन्नदानयज्ञ करण्याचा उपक्रम  हा उपक्रम माणुसकीचे मुर्तीमंत उदाहरण ठरला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....