परळी रेल्वे स्थानकात ट्राफिक ब्लॉक; विविध कामांसाठी काही गाड्या रद्द*

*परळी रेल्वे स्थानकात ट्राफिक ब्लॉक;  विविध कामांसाठी काही गाड्या रद्द*
छायाचित्र : जयराम गोंडे ,स्माईल फोटो स्टुडीओ 


परळीवैजनाथ /प्रतिनिधी. ...

        परळी रेल्वे स्थानकात ट्राफिकब्लॉक घेण्यात आला असून  विविध कामांसाठी काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या कामांची युद्धपातळीवर लगबग सुरू असल्याचे आज रेल्वे स्थानक परिसरात दिसून येत आहे.
छायाचित्र :जयराम गोंडे, स्माईल फोटो स्टुडीओ परळीवैजनाथ 


       परळी रेल्वे स्थानकाजवळ  रेल्वे ने हाती घेतलेल्या नॉन-इंटर लॉक वर्किंग करिता 3 दिवस ट्राफिक ब्लॉक घेण्यात आल्या मुळे  काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही रेल्वे गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. गाडी संख्या 51522 पूर्णा ते परळी सवारी गाडी – दिनांक 8, 9 आणि 10 मे, 2019 रोजी रद्द करण्यात आली आहे. गाडी संख्या 51521 परळी ते पूर्णा सवारी गाडी – दिनांक 8, 9 आणि 10 मे, 2019 रोजी रद्द करण्यात आली आहे.गाडी संख्या 57554 आदिलाबाद ते परळी सवारी गाडी दिनांक 8, 9 आणि 10 मे, 2019 रोजी परभणी ते परळी दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.गाडी संख्या 57553 परळी ते आदिलाबाद सवारी गाडी दिनांक 9 आणि 10 मे, 2019 रोजी परळी ते परभणी दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. गाडी संख्या 57540 परळी ते अकोला सवारी गाडी दिनांक 8, 9 आणि 10 मे, 2019 रोजी परळी ते परभणी दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.गाडी संख्या 57539 अकोला ते परळी सवारी गाडी दिनांक 8 आणि 9 मे, 2019 रोजी परभणी ते परळी दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार