परळीतील नव्या पिढीलाही वैद्यनाथाची ओढ



परळीतील नव्या पिढीलाही वैद्यनाथाची ओढ : चित्रकार मैथिलीने  रेखाटले वैद्यनाथ मंदिरचे हुबेहुब पोस्टर चित्र


●वैद्यनाथ मंदिर : नवोदित शिल्पकार,  चित्रकारांसाठी उत्कृष्ट कलाकृती!●


परळी वैजनाथ /रविंद्र जोशी. ....
       देशभरातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी तीन ज्योतिर्लिंग मराठवाड्यात आहेत. या मध्ये परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळेच गावाला वैद्यनाथाची परळी किंवा परळी वैजनाथ हे नाव प्राप्त झाले आहे. परळीचे वैद्यनाथ मंदिर एक ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक समृद्ध वारसा आहे. त्याचबरोबर वास्तुरचनेचा उत्तम नमुना आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या मध्ये आणखी एक भर पडली असुन वैद्यनाथ मंदिर हे नवोदित शिल्पकार,  चित्रकारांसाठी उत्कृष्ट कलाकृती आहे. परळीतील नव्या पिढीची  चित्रकार मैथिलीने  वैद्यनाथ मंदिरचे हुबेहुब पोस्टर चित्र रेखाटले आहे. यावरुन कलाकृतींमध्ये रस असणारांनाही मोठे आकर्षण असल्याचे प्रत्ययाला आले.

      बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग म्हणून वैद्यनाथ ओळखले जाते. परळी शहराच्या पश्चिमेला मेरू पर्वताच्या पायथ्याशी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे प्राचीन मंदिर वसलेले आहे. या शिवपिठाचे वैशिष्ट्य म्हणजे याठिकाणी शंकराचा निवास हा सहकुटुंब आहे. वैद्यनाथाचे मुळ मंदिर हे यादवकालिन आहे. बाराव्या शतकाच्या प्रारंभी हे मंदिर बांधले गेले असावे, असे मानले जाते. त्यानंतर शालिवाहन शक १६९९ ला इंदोरचे राजे मल्हारराव होळकर यांच्या सूनबाई व खंडेराव होळकर यांच्या पत्नी साध्वी अहिल्याबाई होळकर यांनी मंदिर जिर्णोद्धाराचे काम सुरू केले. याचा उल्लेख मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात असलेल्या शिलालेखात करण्यात आल्याचे दिसून येते.
      वैद्यनाथ मंदिराचे बांधकाम हे हेमाडपंथी आहे. या मंदिराच्या दगडी शिखरावर विविध देवतांच्या मूर्ती आहेत. मुख्य मंदिराला पाच दरवाजे आहेत. पूर्वेकडील दरवाजा महाद्वार म्हणून ओळखला जातो. या वरील दगडी कोरीव काम, शिल्प व भक्कम बांधकाम सर्वांचे लक्ष वेधून घेते. चैत्र पोर्णिमा व अश्विन पोर्णिमा या दिवशी सूर्याची पहिली किरणे याच प्रवेशद्वारातून वैद्यनाथाच्या पिंडीवर पडतात. या महाद्वारावर त्रिकाल चौघडा करण्यात येतो. या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर विस्तीर्ण, उंच व प्रशस्त असा सागवानी लाकडाचा बिनखांबी सभा मंडप आहे. नानासाहेब देशपांडे यांच्या कार्यकाळात  १८८५ च्या सुमारास हे काम करण्यात आले आहे. या मंडपाच्या भव्यतेने मंदिराची शोभा वाढली आहे. या मंडपाखाली आठ फूट लांब व त्यापेक्षा कमी रुंद असा दगडी चबुतरा असून त्यावर चार कोरीव दगडी खांब आहेत. या खांबावर दगडी मंडप उभारलेला आहे. या मंडपात नंदीच्या चार व गणेशाची एक मुर्ती आहेत. आत आल्यावर विशाल गर्भगृह आहे. या गर्भगृहात प्रवेश करताना गणेश व पार्वतीचे दर्शन होते. या ठिकाणी शाळिग्रामची दिव्य पिंड आहे.
    या मंदिराच्या परिसरात ओवर्या, शिवमंदिरे, ध्यान मंदिर, वीरभद्र पितळी विशाल मुर्ती, नारद मंदिर, गायत्री मंदिर आहे. मंदिरालगत भव्य दगडी दीपमाळेचा दीपस्तंभ आहे. याच्या पायथ्याशी अहिल्याबाई होळकर यांचा अर्धाकृती पुतळा बसवण्यात आलेला आहे. मार्च १९८५ ला देवल कमिटीने हा पुतळा बसवला आहे. वैद्यनाथ मंदिर हा एक ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक वारसा आहे.
     या ठिकाणची प्रत्येक बाब ही धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, शिल्पकला या सर्वच दृष्टीने महत्त्वाची ठरते. तसेच नवोदित रेखाचित्रकार, वास्तुरचनाकार, अभियंते,धर्मअभ्यासक, यांच्यासाठी ही हा अनमोल ठेवा आहे. चित्रकारांना तर वैद्यनाथ मंदिर ही अतिशय आकर्षणाची बाब आहे. यापूर्वी अनेक चित्रकारांनी वेगवेगळ्या दृष्टीने आपापली कलाकृती रेखाटलेली आहे. परंतु काल महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर परळीतील एका नवोदित चित्रकार कु. मैथिली लोंढे हिने साकारलेले वैद्यनाथ मंदिर कळसाचे हुबेहुब पोस्टर चित्र कौतुकास पात्र ठरले तसेच सोशल मिडीयावर प्रतिकात्मक वैद्यनाथ मंदिर म्हणून मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाल्याचे दिसून आले. त्यामुळे नवोदित चित्रकारांनाही विशेषतः परळीतील नव्या पिढीच्या मुलामुलींनाही वैद्यनाथाची ओढ जन्मतःच कशी असते हे अधोरेखित झाले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !