Video News: अनंत इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वोपयोगी उपक्रम

अनंत इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वोपयोगी उपक्रम*
 • *_वृक्षारोपण, वृक्षभेट, सॅनिटायझर,मास्क व अन्नधान्य किटचे वितरण_*

अनंत इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वोपयोगी उपक्रम*
 • *_वृक्षारोपण, वृक्षभेट, सॅनिटायझर,मास्क व अन्नधान्य किटचे वितरण_*

*
परळी वैजनाथ: प्रतिनिधी....
     राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर सरचिटणीस अनंत इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त परळी शहरात सर्वोपयोगी उपक्रम राबवण्यात आले.अनाठायी खर्च व सवंग प्रसिद्धी च्या उपक्रमांना फाटा देत वृक्षारोपण, ५०० वृक्षभेट,  सॅनिटायझर, मास्क व अन्नधान्य किटचे वितरण करण्यात आले. 
      जग सध्या कोरोना महामारीच्या महाभयंकर संकटाशी सामना करत आहे.या पार्श्वभूमीवर अगदी सुरुवाती पासून कोरोना प्रतिबंधक मोहीमेत अग्रेसर राहिलेल्या व सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात पुढाकार घेणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर सरचिटणीस अनंत इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय,सामाजिक व विविध स्तरातील नागरिकांनी शुभेच्छा दिल्या. मित्र मंडळाच्या वतीने अनंत इंगळे यांच्या वाढदिवसा निमित्त परळी शहरात सर्वोपयोगी उपक्रम राबवण्यात आले. नागरीकांना  सुरक्षिततेसाठी व निर्जंतुकीकरणासाठी 100ml सॅनिटीझर, मास्क व शुभेच्छा द्यायला आलेल्याना 500 वृक्षभेट देण्यात आले. त्याचप्रमाणे आनंदराई व स्व.पंडितअण्णा मुंडे भोजनालय समोर मोंढ्यात वृक्षारोपण करण्यात आले.२५० गरजूंना अन्नधान्य किटचे वितरण करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपणारा व कोरोना प्रतिबंधक मोहीमेत योगदान देणारा उपक्रम वाढदिवसाच्या निमित्ताने राबवण्यात आला. यावेळी अनंत इंगळे मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार