पोस्ट्स

MB NEWS : Letest news परळीत २८ रिपोर्ट पाॅझिटिव्ह

MB NEWS/माझी बातमी :- बीड शहरातील व्यवसायिकांची सहा तपासणी केंद्रांवर अॅन्टीजन टेस्ट--मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार*

इमेज
 * बीड शहरातील व्यवसायिकांची सहा तपासणी केंद्रांवर अॅन्टीजन टेस्ट--मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार* *संबंधिताना देण्यात आलेल्या वेळी आणि दिलेल्या तपासणी केंद्रावरच आपली तपासणी करून घ्यावी  बीड,(जिमाका) दि. ७:--बीड शहरात व्यवसायिक,कर्मचारी वर्ग,कामगार व इतर यांची कोविड-१९  संदर्भात अॅन्टीजन तपासणीसाठी जिल्हा आरोग्य विभागाने  विशेष मोहिम हाती घेतली असून सहा अॅन्टीजन तपासणी केंद्र कार्यन्चित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी आरोग्य यंत्रणेस दिले आहेत.  शहरातील दुकानदार व व्यवसायिकांनी त्यांना देण्यात आलेल्या वेळी आणि दिलेल्या तपासणी केंद्रावरच उपस्थित राहून आपली तपासणी करून घ्यावी यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत प्रत्येक तपासणी केंद्रावर एका तासा मध्ये साधारणतः 50 व्यक्तींची अॅन्टीजन तपासणी करण्यात येणार असून त्यासाठी बीड शहरातील व्यवसायिक आणि  तपासणी करण्यासाठी येण्याच्या वेळा त्यांना कळविण्यात आलेले आहेत यामध्ये ८ ते 10 ऑगस्ट २०२० दरम्यान सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तपासणी केली जाणार असून त्याचे तपशीलवार वेळापत्रक प्रसिद्धीस

MB NEWS/माझी बातमी:- कोविड रुग्णालय बीड येथे सेवा देण्यास पुढे आलेले खाजगी वैद्यकिय व्यायसायीकांंच्या सेवा पुढील 15 दिवसांसाठी अधिगृहित* जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश

इमेज
कोविड रुग्णालय बीड येथे सेवा देण्यास पुढे आलेले खाजगी वैद्यकिय व्यायसायीकांंच्या सेवा पुढील 15 दिवसांसाठी अधिगृहित  जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश बीड, दि. ७--बीड शहरातील कोविड रुग्णांची संख्या दिवसें दिवस मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे खाजगी वैद्यकिय व्यावसायिक यांची आयएमए संघटना बीड शाखा यांच्या सहकार्याने खाजगी वैद्यकिय व्यावसायिक यांच्या सेवा उपलब्ध होणार असून जिल्हा कोविड रुग्णालय, बीड येथे पुढील 15 दिवसांसाठी हे डॉक्टर्स  रुग्णसेवेसाठी नियोजनबद्ध पद्धतीने पूर्णवेळ उपस्थित राहतील  यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेश पारीत केले आहेत. यामुळे कोविड रुग्णालय बीड येथे सेवा देण्यास पुढे आलेले खाजगी वैद्यकिय व्यायसायीकयांच्या सेवा पुढील 15 दिवसांसाठी अधिगृहित केलेल्या असून खाजगी वैद्यकिय व्यावसायीक तेथे सेवा देतील  कोव्हीड-19 विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजनेच्या अनुषंगाने सदर कार्यवाही केली जात आहे  ००००

MB NEWS/माझी बातमी:- *पल्लवी फुलारी शिक्षक पात्रता परीक्षेत पात्र*

इमेज
 * सौ.पल्लवी फुलारी शिक्षक पात्रता परीक्षेत पात्र* परळी वैजनाथ/ प्रतिनिधी...    येथील पल्लवी सुधीर फुलारी शिक्षक पात्रता परीक्षेत पात्र झाल्या आहेत. शिक्षकांसाठी घेण्यात येणार्या पात्रता परीक्षेत त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.      महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ मध्ये पल्लवी सुधीर फुलारी यांनी इंग्रजी /सामाजिकशास्त्रे या विषयाची परीक्षा दिली होती.यामध्ये ५५.४१ टक्के गुण मिळवून घवघवीत यश मिळवले आहे.त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

MB NEWS :जिल्ह्यात येणार्‍यांना संस्थात्मक विलगीकरण प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे निर्देश जारी* *जिल्हयामध्ये प्रवेश करण्यासाठी16 चेक पोस्ट निश्चित

इमेज
*जिल्ह्यात येणार्‍यांना संस्थात्मक विलगीकरण प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे निर्देश जारी* *जिल्हयामध्ये प्रवेश करण्यासाठी16 चेक पोस्ट निश्चित  बीड,  दि. ४::-बाहेरच्या जिल्हयामधून  बीड जिल्ह्यात येणार्‍या व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणच्या शहरी व ग्रामीण भागातील प्रक्रियेसाठीचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जारी केले आहेत  तसेच दररोज जिल्हयाबाहेर जाऊन येणे आवश्यक आहे अशा व्यक्तींसाठी दैनंदिन प्रवासासाठी  ई-पास काढून आणि अॅटिजेन टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे या विलगीकरण प्रक्रियेसाठीच्या निर्देशानुसार   ग्रामीण भागात बाहेरच्या जिल्हयामधून येणारी प्रत्येक व्यक्ती गावाच्या जिल्हा परिषद शाळेत Institutional Quarantine करण्यात येईल. या व्यक्तीसाठी शाळेत  पाणी, स्वच्छता इ. या सर्व सुविधा पुरविण्याची  जबाबदारी ग्रामपंचायतची असेल, जेवणाची व्यवस्था शक्यतोवर त्या व्यक्तीच्या कुटूंबाद्वारेच करण्यातय येईल . गावामध्ये बाहेर जिल्हयातून येणारा प्रत्येक व्यक्ती कोणाच्याही संपर्कात न येता थेट या Institutional Quarantine केंद्रामध्ये जाईल याची खात्री गावचे सरपंच, तलाठी, ग्रामसेव

MB NEWS: परळीत आज पुन्हा १४ रिपोर्ट पाॅझिटिव्ह !

इमेज
परळीत आज पुन्हा १४ रिपोर्ट पाॅझिटिव्ह ! परळी वैजनाथ/प्रतिनिधी...     कोरोना साखळी खंडीत करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय सुरु आहे मात्र ही साखळी खंडीत होतांना दिसत नाही.त्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.आज दि.४ रोजी आलेल्या रिपोर्ट मध्ये १४ रिपोर्ट पाॅझिटिव्ह आले आहेत.     दि.03-08-20 रोजी घेतलेले स्वॕब64 होते.ते रिपोर्ट हाती आले असून त्यापैकी १४ जण पाॅझिटिव्ह आहेत.तर५० रिपोर्ट निगेटिव्ह आहेत.आज वाढलेल्या संख्येने अॅक्टीव कोरोनाबाधितांची संख्या आता १५१ ईतकी झाली आहे. --------------------------------------------

MB NEWS: बीडचे माजी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयाचे उपसचिव म्हणून नियुक्ती.

इमेज
बीडचे माजी जिल्हाधिकारी  नवलकिशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयाचे उपसचिव म्हणून नियुक्ती. नवी दिल्ली-.          पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नवल किशोर राम हे २००८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून ते मूळचे बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील आहेत. नुकताच त्यांचा देशातील ५० सुपरफाईन जिल्हाधिकाऱ्यांच्या यादीत समावेश झाला होता. एका संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार नवल किशोर राम यांची या यादीत निवड करण्यात आली होती. पुणे जिल्हाधिकारी पद सांभाळण्यापूर्वी त्यांनी औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले होते.२०१८ मध्ये नवल किशोर राम यांनी पुण्याच्या जिल्हाधिकारीपदाचा पदभार स्वीकारला होता. त्यांनी यवतमाळ जिल्हापरिषदेचे सीईओ, जिल्हाधिकारी बीड, औरंगाबाद अशा पदांवरही काम केले होते. 

MB NEWS : अयोध्या राममंदिर शिलान्यास:परळीत लाडू प्रसाद वाटप कार्यक्रम

इमेज
अयोध्या राममंदिर शिलान्यास:परळीत लाडू प्रसाद वाटप कार्यक्रम परळी वैजनाथ/प्रतिनिधी...            5 ऑगस्ट रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्र यांचे भव्य मंदिर निर्माण शिलान्यास होणार असून त्यानिमित्ताने  मोतीचूर लाडूचे वाटप करून आनंदोत्सव साजरा करणार असून सर्व श्रीराम भक्तांनी दुपारी 12 वाजता संकट मोचन हनुमान मंदिर मोंढा येथे यावे असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चा परळी-वैजनाथ यांनी केले आहे.

MB NEWS: युपीएससीत मंदार पत्कीसह बीडच्या विद्यार्थ्यांची प्रशंसनीय कामगिरी - पंकजाताई मुंडे यांनी केले अभिनंदन*

इमेज
*युपीएससीत मंदार पत्कीसह बीडच्या विद्यार्थ्यांची प्रशंसनीय कामगिरी - पंकजाताई मुंडे यांनी केले अभिनंदन* *गुणवतांच्या कामगिरीमुळे बीडचा देशात गौरव* बीड दि. ०४ ------- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत बीड जिल्हयातील पाच विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केल्याबद्दल पंकजाताई मुंडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या या कामगिरीमुळे बीडचा देशात गौरव झाला आहे अशा शब्दात त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचा निकाल आज घोषित झाला, यात बीड जिल्ह्यातील मंदार जयंत पत्की देशातून २२ वा, तर प्रसन्न रामेश्वर लोध ५२४ वा, वैभव विकास वाघमारे ७७१ वा, जयंत मकले याने अंधत्वावर मात करत १४३ वा क्रमांक तर डाॅ.नेहा किर्दक हिनेही ३८३ रॅंकसह घवघवीत यश मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. या दैदिप्यमान यशाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन ! या पाचही जणांनी हे अभूतपूर्व असे यश संपादन करून बीड जिल्हयाचे नांव देशात उज्ज्वल केले आहे, याचा सर्व जिल्हावासियांना अभिमान आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांना अभिप्रेत असणारी समाजातील वंचित, पिडित घटकांची सेवा त

MB NEWS:पोलीस कर्मचारी शंकर कळसाने यांच्या निधनाने शोकभावना .

इमेज
*परळीत काही वर्षांपूर्वी नोकरी केलेले व सर्वपरिचित पोलीस कर्मचारी शंकर कळसाने यांच्या निधनाने शोकभावना  परळी वैजनाथ..... पाच वर्षा पूर्वी परळी ग्रामीण ला नेमणुकीस असलेले व सध्या पोलिस स्टेशन आष्टी जिल्हा बीड येथे असलेले पोलीस नाईक शंकर कळसाने यांचे आज निधन झालं आहे.त्यांच्या निधनाने शोकभावना व्यक्त होत आहेत.      काही दिवसांपूर्वी त्यांचा अपघात झाला होता त्यांच्या वर  अहमदनगर येथे  असताना उपचार सुरू होते.त्यांच्या निधनाबद्दल परळीत शोकभावना व्यक्त होत आहे.

MB NEWS:वैद्यनाथ विद्यालयाच्या सेवानिवृत्त शिक्षिका वैशाली बेंबळकर यांचे निधन

इमेज
वैद्यनाथ विद्यालयाच्या सेवानिवृत्त शिक्षिका वैशाली बेंबळकर यांचे निधन ---------------- परळी वैजनाथ, दि.3 (प्रतिनिधी)ः- येथील वैद्यनाथ विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षिका व साने गुरूजी कथामालेच्या कार्यकर्त्या वैशाली प्रभाकरराव बेंबळकर (वय 70) यांचे कोरोना संसर्गामुळे पुणे येथे उपचारादरम्यान सोमवारी (दि.3) सायंकाळी निधन झाले. त्यांचे शिक्षण सोलापूर येथे झाले होते. 1971 साली शहरातील वैद्यनाथ विद्यालयात सहशिक्षिका म्हणून त्या रूजू झाल्या. इतिहास, भूगोल हे विषय त्यांनी शाळेत शिकवले. विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून त्यांची ओळख होती. शहरात चालणार्‍या साने गुरूजी कथामालेतही त्यांनी सहभाग नोंदविला होता. 2008 साली त्या सेवानिवृत्त झाल्या होत्या. त्यांचे पती प्रभाकरराव बेंबळकर त्याच शाळेत शिक्षक म्हणून सेवेत होते. त्यांचेही 2006 साली निधन झाले आहे. सध्या वैशाली बेंबळकर पुणे येथे मुलाकडे स्थायिक झाल्या होत्या. गेल्या काही दिवसापूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे पुण्यातील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार चालू असतानाच सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांचे निधन झा

MB NEWS:जिल्ह्यात कोविड उपचारांसाठी रुग्णालयांमध्ये उपलब्ध बेडची माहिती नागरिकांना देण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन--जिल्हाधिकारी राहुल रेखावार

इमेज
जिल्ह्यात कोविड उपचारांसाठी रुग्णालयांमध्ये उपलब्ध बेडची माहिती नागरिकांना देण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन--जिल्हाधिकारी राहुल रेखावार * बीड, दि. २७:-- जिल्ह्यातील खाजगी रुग्णालय आणि शासकीय कोविड रुग्णालयांमध्ये उपलब्ध असणार्‍या बेडची माहिती नागरिकांना देण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत असून  सदर कक्ष २४ तास कार्यरत राहणार आहे. नागरिकांनी कोणत्या्ही रुग्णालयात दाखल होण्यासाठी काहीही अडचण येत असल्यास याबाबत माहिती साठी नियंत्रण कक्षात संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे त्यासाठी नियंत्रण कक्ष प्रमुख म्हणून जिल्ह्या रुग्णालयाचे डॉ सचिन आंधळकर आहेत. कक्षात नियुक्त शिक्षकांना याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यांचे नाव , शाळेचे नाव आणि मोबाईल क्रमांक आदी माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MB NEWS:उद्धवज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त वृक्ष आमचे संगोपन तुमचे मोहीम;भारतीय विद्यार्थी सेनेचा उपक्रम

इमेज
उद्धवज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त वृक्ष आमचे संगोपन तुमचे  मोहीम;भारतीय विद्यार्थी सेनेचा उपक्रम परळी वै.(प्रतिनिधी) शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त वृक्ष आमचे संगोपन तुमचे हि मोहीम भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने राबवण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येत असून या निमित्त शिवसेना मराठवाडा संपर्क नेते चंद्रकांत खैरे,बीड जिल्हा संपर्क प्रमुख आनंद जाधव,भारतीय विद्यार्थी सेना/युवा सेना कार्यकारणी सदस्य अंकित प्रभु शिवसेना बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा उपप्रमुख अभयकुमार ठक्कर,भारतीय विद्यार्थी सेना बीड जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे यांच्या उपस्थितीत भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने वृक्ष आमचे संगोपन तुमचे या मोहीमेची सुरुवात परळी शहरातील विद्यालयाच्या शिक्षक आर.जी.निला सर,बंडू आघाव सर, ए.एन.जाधव सर, प्रा.जगदिश कावरे सर यांना वृक्ष भेट देऊन आणि जिरगे नगर या ठिकाणी वृक्षा रोपण कर

MB NEWS:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाईत शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख शिवाजी कुलकर्णीयांच्या वतीने छत्र्यांचे वाटप

इमेज
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाईत शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख शिवाजी कुलकर्णीयांच्या वतीने छत्र्यांचे वाटप परळी वैजनाथ, (प्रतिनिधी) ः- राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे  यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाई येथील शिवसेनेच्या वतीने छत्र्या वाटप करण्यात आल्या. शहरातील हनुमान नगर येथील स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारक  कार्यालयात राज्याचे मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाईत शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रम राबविण्यात आले होते. यावेळी अंबाजोगाई शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख शिवाजी (दादा) कुलकर्णी यांच्या वतीने सोमवारी (दि.27) छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे राजाभाऊ लोमटे, झुंजारनेताचे पत्रकार अनंत कुलकर्णी, दीपक कुलकर्णी, मुकूंद कुलकर्णी, अशोक खेडे, मदन परदेशी, जालींदर आपेट, रमेश टेकाळे, सिकंदर कातरे, शंकर भिसे, आकाश भिसे, संतोष काळे, सतीश क्षीरसागर, अमोल पौळे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मराठवाडा संपर्क प्रमुख विश्वनाथ देसाई,

MB NEWS:सेवासप्ताहातील विविध स्पर्धांचा निकाल जाहीर; लवकरच पारितोषिक वितरण -बाजीराव भैय्या धर्माधिकारी*

इमेज
_उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे वाढदिवसानिमित्त आयोजित_ *सेवासप्ताहातील विविध स्पर्धांचा निकाल जाहीर; लवकरच पारितोषिक वितरण -बाजीराव भैय्या धर्माधिकारी* •  *_परळीतील पहिल्या वहिल्या मेगाआॅनलाईन स्पर्धांना संबंध महाराष्ट्रातून उत्स्फुर्त सहभाग_* • परळी वैजनाथ/ प्रतिनिधी...       राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार  व सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ते 22 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या  विविध आॅनलाईन स्पर्धांचा निकाल  घोषित करण्यात आला आहे. या स्पर्धांना स्पर्धकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला त्यामुळे परिक्षकांसाठी निकाल अव्हानात्मक ठरला.लवकरच विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिली आहे.       सेवा सप्ताह काळात विविध अभिनव आॅनलाईन स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. प्रथमच आयोजित ऑनलाईन स्पर्धांना भरभरून प्रतिसाद मिळाला.यामध्ये परळी पंचक्रोशीतील विविध ठिकाणांचे फोटो फेसबूक माध्यमातून प्रकाशित करण्

MB NEWS: बीड जिल्ह्यात आतापर्यंतची विक्रमी शासकीय कापूस खरेदी

इमेज
बीड जिल्ह्यात आतापर्यंतची विक्रमी शासकीय कापूस खरेदी *पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली २३ जुलै पर्यंत मुदतवाढ आणि प्रक्रिया* *जिल्ह्यातील एकूण ८० हजार ४९९ शेतकऱ्यांचा  २१ लाख २३ हजार ६६४ क्विंटल कापूस खरेदी* बीड , दि. २६::-जिल्ह्यात 2019-20 मध्ये आतापर्यंतची विक्रमी ८० हजार ४९९ शेतकऱ्यांच्या २१ लाख २३ हजार ६६४ क्विंटल कापूसाची खरेदी करण्यात आली आहे. कोरोना विषाणू संसर्ग कालावधीत शेतकर्‍यांच्या सुरक्षेच्या कारणांमुळे काळजी घेऊन पावसाळा सुरु झाल्या नंतर देखील वाढीव मुदत देण्यात आली होती बीड जिल्ह्याची कापूस खरेदी प्रक्रिया  23 जुलै 2020 रोजी मुदतीअखेर पूर्ण करण्यात आली आहे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे  यांच्या मार्गदर्शन आणि निर्देशानुसार जिल्ह्यात जास्त संख्येने ग्रेडर नियुक्त करण्यात आले आणि खरेदी प्रक्रिया करण्यात आली कृषी उत्पन्न बाजार समितीकडे 24 हजार 921 शेतकऱ्यांनी  नोंदणी केली होती. तसेच नोंदणी पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना 1 ते 3 जून 2020 या कालावधीत नोंदणीची संधी देण्यात आली होती. त्या काला

शेत,शिवार आणि शेतकरी यांच्या जीवनात समृद्धी निर्माण करणारे मुख्यमंत्री वसंतराव नाईक-शिवाजीराव मव्हाळे

इमेज
 शेत,शिवार आणि शेतकरी यांच्या जीवनात समृद्धी निर्माण करणारे मुख्यमंत्री वसंतराव नाईक-शिवाजीराव मव्हाळे • *_कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे वसंतराव नाईक जयंती साजरी_* • सोनपेठ (प्रतिनिधी).....      कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे हरित क्रांतीचे प्रणेते   वसंतराव नाईक जयंती यांची जयंती साजरी करण्यात आली.      हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या निमित्ताने राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे, सरपंच रामप्रसाद यादव, पोलीस पाटील वैजनाथराव यादव, मुख्याध्यापक डी.एल. सोनकांबळे,वसतिगृह अधिक्षक डी.एम.माने आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत वसंतराव नाईक   प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे यांनी सांगितले की, कृषी क्षेत्रातील खर्या अर्थाने क्रांती घडवून शेत,शिवार आणि शेतकरी यांच्या जीवनात समृद्धी निर्माण करणारे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी वसंतराव ना

Video News: गुन्हे मागे घ्या परळी पत्रकार संघाचे निवेदन

इमेज
गुन्हे मागे घ्या परळी पत्रकार संघाचे निवेदन परळी (प्रतिनिधी) औरंगाबाद येथे कोरोना संदर्भात सत्य लिखाण करत प्रशासनाच्या चुका चव्हाट्यावर मांडल्यामुळेआपले अपयश झाकण्यासाठी प्रशासनाने  दिव्य मराठीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रशासकीय यंत्रणेचा परळी  पत्रकार संघाच्या वतिने निषेध करण्यात येवुन हे गुन्हे त्वरीत मागे घ्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे  केली आहे. औरंगाबाद महानगर भागात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असताना या पार्श्वभुमीवर प्रशासनाचा निष्काळजीपणा व बेजबाबदारपणा बाबत दैनिक दिव्य मराठीने सत्य परिस्थिती मांडल्यानंतर प्रशासनाने वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करण्याच्या हेतूने व आपली अकार्यक्षमता झाकण्यासाठी चुकीच्या पद्धतीने दैनिकाचे संपादक, प्रकाशक व वार्ताहरावरच गुन्हे दाखल केले आहेत.प्रशासनाच्या या मुजोरपणाचा जाहीर निषेध करीत दैनिका विरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे पोलिस प्रशासनाने तात्काळ मागे घेण्यात यावी व या कार्यपद्धतीत दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत तहसिलदार यांना निवेदन दिले.या निवेदनावर पत्रकार संघाचे तालुका

समाजभुषण स्व. सुवालालजी वाकेकर पुरस्कारांची घोषणा

इमेज
समाजभुषण स्व. सुवालालजी वाकेकर पुरस्कारांची घोषणा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे, उद्योगपती रमेश फिरोदीया, ज्येष्ठ साहित्यीक प्रा.डॉ.दासू वैद्य  पुरस्कारांचे मानकरी सार्वजनिक कार्यक्रमावरील निर्बंध शिथील होताच होणार कार्यक्रम परळी (प्रतिनिधी-) समाजभुषण स्व. सुवालालजी वाकेकर (ललवाणी) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मारवाडी युवा मंचच्या वतीने देण्यात येणार्या  राज्यस्तरीय पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. राज्याचे सामाजिक न्याय तथा विशेष सहाय्यमंत्री  तथा नाथ प्रतिष्ठाणचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे (राज्य भुषण), उद्योगपती रमेश फिरोदीया (समाज भुषण) व प्रसिद्ध साहित्यीक प्रा.डॉ.दासू वैद्य (साहित्य भुषण) यांना स्व. सुवालालजी वाकेकर पुस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध असून हे निर्बंध शिथील होताच कार्यक्रमाची तारिख जाहीर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून रामाणाचार्य रामराव महाराज ढोक व प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध कवि  अशोक नायगावकर उपस्थित राहणार असल्याचे मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, कार

कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी

इमेज
कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी सोनपेठ (प्रतिनिधी).....      कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे राजे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.  आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे, गणेश हांडे, राजाभाऊ निळे या मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे यांनी सांगितले की, सामाजिक न्यायाची खरोखर भुमिका घेत खर्या अर्थाने घेणारे राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांची कास धरून वाटचाल केली पाहिजे.त्यांचे विचारच सामाजिक न्याय व हक्क मिळवून देणारे असल्याचे सांगितले.   प्रास्ताविक मुख्याध्यापक सोनकांबळे यांनी केले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डी.एल.सोनकांबळे, वसतिगृह अधिक्षक डी.एम.माने, शिक्षकवृंद, कर्मचारी उपस्थित होते. ***†**************************************       

Video News: अनंत इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वोपयोगी उपक्रम

इमेज
अनंत इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वोपयोगी उपक्रम*  • *_वृक्षारोपण, वृक्षभेट, सॅनिटायझर,मास्क व अन्नधान्य किटचे वितरण_* अनंत इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वोपयोगी उपक्रम*  • *_वृक्षारोपण, वृक्षभेट, सॅनिटायझर,मास्क व अन्नधान्य किटचे वितरण_* * परळी वैजनाथ: प्रतिनिधी....      राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर सरचिटणीस अनंत इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त परळी शहरात सर्वोपयोगी उपक्रम राबवण्यात आले.अनाठायी खर्च व सवंग प्रसिद्धी च्या उपक्रमांना फाटा देत वृक्षारोपण, ५०० वृक्षभेट,  सॅनिटायझर, मास्क व अन्नधान्य किटचे वितरण करण्यात आले.        जग सध्या कोरोना महामारीच्या महाभयंकर संकटाशी सामना करत आहे.या पार्श्वभूमीवर अगदी सुरुवाती पासून कोरोना प्रतिबंधक मोहीमेत अग्रेसर राहिलेल्या व सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात पुढाकार घेणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर सरचिटणीस अनंत इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय,सामाजिक व विविध स्तरातील नागरिकांनी शुभेच्छा दिल्या. मित्र मंडळाच्या वतीने अनंत इंगळे यांच्या वाढदिवसा निमित्त परळी शहरात सर्वोपयोगी उपक्रम राबवण्यात आले. नागर

पंकजाताई मुंडे यांनी केले आवाहन....मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करा, घरात फोटोसमोर दोन दिवे लावा, पुण्यतिथीला गोपीनाथ गडावर गर्दी नको

इमेज
*लोकनेत्याच्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर पंकजाताई मुंडे यांनी केले आवाहन* *मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करा, घरात फोटोसमोर दोन दिवे लावा, पुण्यतिथीला गोपीनाथ गडावर गर्दी नको * परळी वैजनाथदि. २९---- लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीला मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करायचा आणि घरातच फोटोसमोर दोन दिवे लावून त्यांना अभिवादन करायचं, असं आवाहन  पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे. ३ जून रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम गोपीनाथ गडावरच होईल, मात्र कार्यक्रम लाईव्ह असेल, कोणीही गडावर गर्दी करु नये, अशी सूचना पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.  ३ जून हा दिवस उजाडलाच नाही पाहिजे, असं वाटत असल्याची फेसबुक पोस्ट पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.   ३ जून रोजी लोकनेते गोपीनाथराव  मुंडे यांचा सहावा पुण्यस्मरण दिवस आहे. हा दिवस ‘संघर्ष दिन’ म्हणून मुंडे समर्थक साजरा करतात. परंतु सध्या कोरोनामुळे राज्यासह बीड जिल्ह्यातही लॉकडाऊन आहे. शिवाय गर्दीच्या सर्वच कार्यक्रमावर बंदी आहे. गोपीनाथ गडावर सध्या पद्धतीने मोजक्या लोकांमध्ये गोपीनाथराव मुंडे यांची पुण्यतिथी कार्
इमेज
५८ दिवसांनंतर निघण्यासाठी सज्ज 'लालपरी' वाट पाहून पाहून थांबली ! *परळी आगारात दिवसभरात आले केवळ दोन प्रवासी* परळी वैजनाथ, प्रतिनिधी:-        कोरोनामुळे ठप्प झालेली अर्थव्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.त्याचाच एक भाग म्हणून परिवहन महामंडळाची लालपरी शुक्रवार दि.22 मे पासून धावणार यासाठी परळी आगारात  8 गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र सकाळपासून कोणीही प्रवासी बसस्थानकावर फिरकलेच नाही.दिवसभरात केवळ दोन प्रवासी आले. त्यामुळे परळी आगारातून बसच्या नियोजित फेर्या झाल्या नाहीत.          दोन महिन्यांपासून बसून असलेल्या महामंडळाच्या बसेस शुक्रवारपासून सुरू करण्यात आल्या. शासनाच्या बसेस या जिल्हा अंतर्गत धावणार आहेत. परळी आगारात बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले. परळी-बीड अणि परळी-अंबाजोगाई अशा प्रत्येकी बारा फेर्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे.यासाठी एकूण आठ बसेस सज्ज करण्यात आल्या. होत्या अशी माहिती आगारप्रमुख  आर.बी.राजपुत  यांनी दिली. मात्र 'वाट पाहिन पण एसटीनेच जाईन 'असे नेहमी म्हटले जाते परंतु आज वाट पाहिन पण  प्रवासी घेउनच जाईन ' असे म्हणण्याची वे

कोरोना महामारीत परळीत युवकांचा घरोघर 'माधुकरी' गोळा करून गरजूंना अन्नदान यज्ञ !

इमेज
कोरोना महामारीत परळीत युवकांचा  घरोघर 'माधुकरी' गोळा करून गरजूंना अन्नदान यज्ञ  ! • _शिवनगरमधिल युवकांचा २५ दिवसांपासून उपक्रम_ • परळी वैजनाथ/ प्रतिनिधी....       कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागु करण्यात आलेल्या टाळाबंदीने अनेकांना अनेक अडचणी येत आहेत.त्याचप्रमाणे अडल्या नडलेल्यांना अडचणी येऊ नयेत यासाठीही अनेक प्रयत्नशिल हात पुढे येत गरजुंना सर्वोतोपरी मदत करत आहेत.अशाच प्रकारे गेल्या २५ दिवसांपासून मांगिर बाबा मित्र मंडळाचे श्रीनाथ विभूते, कृष्णा भास्कर व अन्य युवक गल्लीत प्रत्येक घरातून घरोघर 'माधुकरी' गोळा करून गरजूंना अन्नदानयज्ञ करण्याचा उपक्रम राबवताना दिसत आहेत. सर्वसामान्य घरांतील युवकांनी एकत्रित येत राबवलेला हा उपक्रम माणुसकीचे मुर्तीमंत उदाहरण ठरला आहे.        कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागु करण्यात आलेल्या टाळाबंदीच्या परिस्थितीत गरजुंपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीसाठी नागरीक,  संस्था पुढे येत आहेत.  कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागु करण्यात आलेल्या टाळाबंदीने  देश व राज्यातील हातावर पोट असलेल्या नागरिकांची  परिस्थिती अतिशय बिकट

परळीतील नव्या पिढीलाही वैद्यनाथाची ओढ

इमेज
परळीतील नव्या पिढीलाही वैद्यनाथाची ओढ : चित्रकार मैथिलीने  रेखाटले वैद्यनाथ मंदिरचे हुबेहुब पोस्टर चित्र ●वैद्यनाथ मंदिर : नवोदित शिल्पकार,  चित्रकारांसाठी उत्कृष्ट कलाकृती!● परळी वैजनाथ /रविंद्र जोशी. ....        देशभरातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी तीन ज्योतिर्लिंग मराठवाड्यात आहेत. या मध्ये परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळेच गावाला वैद्यनाथाची परळी किंवा परळी वैजनाथ हे नाव प्राप्त झाले आहे. परळीचे वैद्यनाथ मंदिर एक ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक समृद्ध वारसा आहे. त्याचबरोबर वास्तुरचनेचा उत्तम नमुना आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या मध्ये आणखी एक भर पडली असुन वैद्यनाथ मंदिर हे नवोदित शिल्पकार,  चित्रकारांसाठी उत्कृष्ट कलाकृती आहे. परळीतील नव्या पिढीची  चित्रकार मैथिलीने  वैद्यनाथ मंदिरचे हुबेहुब पोस्टर चित्र रेखाटले आहे. यावरुन कलाकृतींमध्ये रस असणारांनाही मोठे आकर्षण असल्याचे प्रत्ययाला आले.       बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग म्हणून वैद्यनाथ ओळखले जात