युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाईत शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख शिवाजी कुलकर्णीयांच्या वतीने छत्र्यांचे वाटप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाईत शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख शिवाजी कुलकर्णीयांच्या वतीने छत्र्यांचे वाटप
परळी वैजनाथ, (प्रतिनिधी) ः- राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे  यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाई येथील शिवसेनेच्या वतीने छत्र्या वाटप करण्यात आल्या.

शहरातील हनुमान नगर येथील स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारक  कार्यालयात राज्याचे मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाईत शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रम राबविण्यात आले होते. यावेळी अंबाजोगाई शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख शिवाजी (दादा) कुलकर्णी यांच्या वतीने सोमवारी (दि.27) छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे राजाभाऊ लोमटे, झुंजारनेताचे पत्रकार अनंत कुलकर्णी, दीपक कुलकर्णी, मुकूंद कुलकर्णी, अशोक खेडे, मदन परदेशी, जालींदर आपेट, रमेश टेकाळे, सिकंदर कातरे, शंकर भिसे, आकाश भिसे, संतोष काळे, सतीश क्षीरसागर, अमोल पौळे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मराठवाडा संपर्क प्रमुख विश्वनाथ देसाई, मराठवाडा संपर्क चंद्रकांत खैरे, संपर्क प्रमुख आनंत जाधव, उपजिल्हा प्रमुख सचिन मुळूक, जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांच्या आदेशावरुन शिवाजी कुलकर्णी यांनी अंबाजोगाई येथे विविध  कार्यक्रम राबविले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या