युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS:जिल्ह्यात कोविड उपचारांसाठी रुग्णालयांमध्ये उपलब्ध बेडची माहिती नागरिकांना देण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन--जिल्हाधिकारी राहुल रेखावार

जिल्ह्यात कोविड उपचारांसाठी रुग्णालयांमध्ये उपलब्ध बेडची माहिती नागरिकांना देण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन--जिल्हाधिकारी राहुल रेखावार
*


बीड, दि. २७:-- जिल्ह्यातील खाजगी रुग्णालय आणि शासकीय कोविड रुग्णालयांमध्ये उपलब्ध असणार्‍या बेडची माहिती नागरिकांना देण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत असून  सदर कक्ष २४ तास कार्यरत राहणार आहे. नागरिकांनी कोणत्या्ही रुग्णालयात दाखल होण्यासाठी काहीही अडचण येत असल्यास याबाबत माहिती साठी नियंत्रण कक्षात संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे

त्यासाठी नियंत्रण कक्ष प्रमुख म्हणून जिल्ह्या रुग्णालयाचे डॉ सचिन आंधळकर आहेत. कक्षात नियुक्त शिक्षकांना याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यांचे नाव , शाळेचे नाव आणि मोबाईल क्रमांक आदी माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या