MB NEWS:वैद्यनाथ विद्यालयाच्या सेवानिवृत्त शिक्षिका वैशाली बेंबळकर यांचे निधन

वैद्यनाथ विद्यालयाच्या सेवानिवृत्त शिक्षिका वैशाली बेंबळकर यांचे निधन

----------------
परळी वैजनाथ, दि.3 (प्रतिनिधी)ः-
येथील वैद्यनाथ विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षिका व साने गुरूजी कथामालेच्या कार्यकर्त्या वैशाली प्रभाकरराव बेंबळकर (वय 70) यांचे कोरोना संसर्गामुळे पुणे येथे उपचारादरम्यान सोमवारी (दि.3) सायंकाळी निधन झाले.
त्यांचे शिक्षण सोलापूर येथे झाले होते. 1971 साली शहरातील वैद्यनाथ विद्यालयात सहशिक्षिका म्हणून त्या रूजू झाल्या. इतिहास, भूगोल हे विषय त्यांनी शाळेत शिकवले. विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून त्यांची ओळख होती. शहरात चालणार्‍या साने गुरूजी कथामालेतही त्यांनी सहभाग नोंदविला होता. 2008 साली त्या सेवानिवृत्त झाल्या होत्या. त्यांचे पती प्रभाकरराव बेंबळकर त्याच शाळेत शिक्षक म्हणून सेवेत होते. त्यांचेही 2006 साली निधन झाले आहे. सध्या वैशाली बेंबळकर पुणे येथे मुलाकडे स्थायिक झाल्या होत्या. गेल्या काही दिवसापूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे पुण्यातील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार चालू असतानाच सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात राहूल हा मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल मराठवाडा शिक्षक संघाने तीव्र दुःख व्यक्त केले असून विद्यार्थीप्रिय शिक्षिका हरवल्या या शब्दात मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष पी.एस.घाडगे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. बेंबळकर परिवारावर कोसळललेल्या दुःखात MB NEWS  सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !