इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS: बीडचे माजी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयाचे उपसचिव म्हणून नियुक्ती.

बीडचे माजी जिल्हाधिकारी  नवलकिशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयाचे उपसचिव म्हणून नियुक्ती.
नवी दिल्ली-.
         पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नवल किशोर राम हे २००८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून ते मूळचे बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील आहेत. नुकताच त्यांचा देशातील ५० सुपरफाईन जिल्हाधिकाऱ्यांच्या यादीत समावेश झाला होता. एका संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार नवल किशोर राम यांची या यादीत निवड करण्यात आली होती. पुणे जिल्हाधिकारी पद सांभाळण्यापूर्वी त्यांनी औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले होते.२०१८ मध्ये नवल किशोर राम यांनी पुण्याच्या जिल्हाधिकारीपदाचा पदभार स्वीकारला होता. त्यांनी यवतमाळ जिल्हापरिषदेचे सीईओ, जिल्हाधिकारी बीड, औरंगाबाद अशा पदांवरही काम केले होते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!