MB NEWS: युपीएससीत मंदार पत्कीसह बीडच्या विद्यार्थ्यांची प्रशंसनीय कामगिरी - पंकजाताई मुंडे यांनी केले अभिनंदन*




*युपीएससीत मंदार पत्कीसह बीडच्या विद्यार्थ्यांची प्रशंसनीय कामगिरी - पंकजाताई मुंडे यांनी केले अभिनंदन*

*गुणवतांच्या कामगिरीमुळे बीडचा देशात गौरव*

बीड दि. ०४ ------- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत बीड जिल्हयातील पाच विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केल्याबद्दल पंकजाताई मुंडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या या कामगिरीमुळे बीडचा देशात गौरव झाला आहे अशा शब्दात त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

 केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचा निकाल आज घोषित झाला, यात बीड जिल्ह्यातील मंदार जयंत पत्की देशातून २२ वा, तर प्रसन्न रामेश्वर लोध ५२४ वा, वैभव विकास वाघमारे ७७१ वा, जयंत मकले याने अंधत्वावर मात करत १४३ वा क्रमांक तर डाॅ.नेहा किर्दक हिनेही ३८३ रॅंकसह घवघवीत यश मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. या दैदिप्यमान यशाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन ! या पाचही जणांनी हे अभूतपूर्व असे यश संपादन करून बीड जिल्हयाचे नांव देशात उज्ज्वल केले आहे, याचा सर्व जिल्हावासियांना अभिमान आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांना अभिप्रेत असणारी समाजातील वंचित, पिडित घटकांची सेवा त्यांच्या हातून निश्चित घडेल असा विश्वास मला आहे.
 त्यांच्या भावी वाटचालीस माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा असे पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे.
••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार