इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS/माझी बातमी:- कोविड रुग्णालय बीड येथे सेवा देण्यास पुढे आलेले खाजगी वैद्यकिय व्यायसायीकांंच्या सेवा पुढील 15 दिवसांसाठी अधिगृहित* जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश



कोविड रुग्णालय बीड येथे सेवा देण्यास पुढे आलेले खाजगी वैद्यकिय व्यायसायीकांंच्या सेवा पुढील 15 दिवसांसाठी अधिगृहित 

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश



बीड, दि. ७--बीड शहरातील कोविड रुग्णांची संख्या दिवसें दिवस मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे खाजगी वैद्यकिय व्यावसायिक यांची आयएमए संघटना बीड शाखा यांच्या सहकार्याने खाजगी वैद्यकिय व्यावसायिक यांच्या सेवा उपलब्ध होणार असून जिल्हा कोविड रुग्णालय, बीड येथे पुढील 15 दिवसांसाठी हे डॉक्टर्स  रुग्णसेवेसाठी नियोजनबद्ध पद्धतीने पूर्णवेळ उपस्थित राहतील 


यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेश पारीत केले आहेत. यामुळे कोविड रुग्णालय बीड येथे सेवा देण्यास पुढे आलेले खाजगी वैद्यकिय व्यायसायीकयांच्या सेवा पुढील 15 दिवसांसाठी अधिगृहित केलेल्या असून खाजगी वैद्यकिय व्यावसायीक तेथे सेवा देतील


 कोव्हीड-19 विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजनेच्या अनुषंगाने सदर कार्यवाही केली जात आहे 


००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!