मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाईत शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख शिवाजी कुलकर्णीयांच्या वतीने छत्र्यांचे वाटप परळी वैजनाथ, (प्रतिनिधी) ः- राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाई येथील शिवसेनेच्या वतीने छत्र्या वाटप करण्यात आल्या. शहरातील हनुमान नगर येथील स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारक कार्यालयात राज्याचे मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाईत शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रम राबविण्यात आले होते. यावेळी अंबाजोगाई शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख शिवाजी (दादा) कुलकर्णी यांच्या वतीने सोमवारी (दि.27) छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे राजाभाऊ लोमटे, झुंजारनेताचे पत्रकार अनंत कुलकर्णी, दीपक कुलकर्णी, मुकूंद कुलकर्णी, अशोक खेडे, मदन परदेशी, जालींदर आपेट, रमेश टेकाळे, सिकंदर कातरे, शंकर भिसे, आकाश भिसे, संतोष काळे, सतीश क्षीरसागर, अमोल पौळे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मराठवाडा संपर्क प्रमुख विश्वनाथ देसाई,