युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS /माझी बातमी :वंचित बहुजन आघाडी परळी च्या वतिने लॉकडाऊन विरोधात डफली बजाओ आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्याना पोलिसानी घेतले ताब्यात

 वंचित बहुजन आघाडी परळी च्या वतिने लॉकडाऊन विरोधात डफली बजाओ आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्याना पोलिसानी घेतले ताब्यात 


परळी वैजनाथ ---(प्रतिनिधी)

  सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे रिक्षा,हातगाडे व रोजंदारी करणार्या नागरीकांवर उपासमारीची वेळ आली असुन हा लॉकडाऊन तात्काळ हटवावा यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडीच्या वतिने परळी येथे डफली बजाओ आंदोलन करण्यात पुर्वीच  संभाजी नगर पोलीसानी दोन तर  शहर पोलिसानी तेरा जनाना ताब्यात घेतले आहे. आज सकाळी सात  वाजता  पोलिसांनी आंदोलनकर्ते गौतम साळवे,संजय गवळी यांना ताब्यात घेतले.

 सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे गोरगरीबांचे हाल होत असुन लॉकडाऊन लागु करुनही कोरोना चा फैलाव होतच आहे.यामुळे हा लॉकडाऊन उठवून आरोग्य यंत्रणा सक्षम करावी व शासनाने कोरोना फैलाव रोखण्यासाठी इतर उपाययोजना कराव्यात यासाठी अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेवरून वंचित बहुजन आघाडीच्या परळी तालुका व शहर पदाधिकार्यांनी आज दि.12 ऑगस्ट रोजी डफली बजाओ आंदोलन करण्यात आले यावेळी गौतम साळवे व संजय गवळी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.यावेळी संभाजी नगर पी.एस.आस मरळ.जमादार भताणे.बाबासाहेब आचार्य व इतर पोलिस कमचार्यानी  ताब्यात घेतले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या