पोस्ट्स

MB NEWS:समाजमाध्यमांमध्ये_माझ्या_विरुध्द_होणारे_आरोप #पूर्णपणे_खोटे_बदनामी_आणि_ब्लॅकमेल_करणारे - धनंजय मुंडे यांनी केला खुलासा

इमेज
 # समाजमाध्यमांमध्ये_माझ्या_विरुध्द_होणारे_आरोप #पूर्णपणे_खोटे_बदनामी_आणि_ब्लॅकमेल_करणारे - धनंजय मुंडे यांनी केला खुलासा कालपासून समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया व सोशल मिडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. सदर प्रकरणी रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने (या रेणु शर्मा या करुणा शर्मा यांच्या सख्या लहान बहीण आहेत)  स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही  तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो . हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे असून या प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती खालील प्रमाणे आहे.  करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे क

MB NEWS: *भंडा-यातील घटनेने मन सुन्न झाले* *; सरकारने प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी - पंकजाताई मुंडे*

इमेज
 *भंडा-यातील घटनेने मन सुन्न झाले* *; सरकारने प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी - पंकजाताई मुंडे* बीड दि. ०९ ----- भंडारा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेल्या अग्नितांडवात नवजात शिशूंच्या मृत्यूने मन सुन्न झाले, सरकारने या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.    यासंदर्भात एक ट्विट करून पंकजाताई मुंडे यांनी नवजात बालकांच्या कुटुंबियांविषयी आपल्या सहवेदना व्यक्त केल्या आहेत. "भंडा-यातील अग्नितांडवात नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने मन सुन्न झाले. या घटनेने चिमुकल्यांच्या माता पित्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, त्यांच्या कुटंबियांप्रति मी शोक व्यक्त करते. सरकारने या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी" असे ट्विट त्यांनी केले आहे. ••••

MB NEWS: *दत्तात्रय काळे रिपोर्टर ऑफ द इअर पुरस्काराने सन्मानित* *कराड हॉस्पिटलच्या वतीने पुरस्काराची अखंडित परंपरा कायम*

इमेज
 *दत्तात्रय काळे रिपोर्टर ऑफ द इअर पुरस्काराने सन्मानित*  *कराड हॉस्पिटलच्या वतीने पुरस्काराची अखंडित परंपरा कायम*  परळी,( प्रतिनिधी):- परळीच्या वृत्तपत्र क्षेत्रात मागील वर्षभरात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा कराड हॉस्पिटलच्या वतीने गौरव करण्यात येतो. 2021 वर्षीचा "रिपोर्टर ऑफ द इअर" हा पुरस्कार दै.मराठवाडा साथीचे वृत्तसंपादक दत्तात्रय काळे यांना प्रदान करण्यात आला आहे. दर्पण दिनाच्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कराड हॉस्पिटल येथे या विशेष पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कराड हॉस्पिटलचे संचालक डॉ. बालासाहेब कराड व डॉ.शालिनीताई कराड यांच्यासह मान्यवर पत्रकारांची उपस्थिती होती. 2020 हे वर्ष सर्वांसाठीच खडतर असे वर्ष होते. सर्वच क्षेत्रांसह पत्रकारिता क्षेत्रालाही कोरोना महामारीने निर्माण झालेल्या परिस्थितीने फटका बसला होता. या संपूर्ण काळात सकारात्मक लेखनाने वाचकांच्या मनात आत्मविश्वस निर्माण करणे, समाजाच्या गरजेच्या बातम्यांना प्रसिद्धीच्या झोतात आणणे याबरोबरच वैचारिक आणि बौद्धिक लेखनाला चालना देऊन सामाजिक

MB NEWS: *पत्रकारीतेत येणार्‍या नव्या पिढीने व्यासंग वाढवावा-प्रशांत जोशी* *अखिल भारतीय पत्रकार परिषद मुंबई शाखा परळीच्या वतीने दर्पनदिन साजरा*

इमेज
 *पत्रकारीतेत येणार्‍या नव्या पिढीने व्यासंग वाढवावा-प्रशांत जोशी* *अखिल भारतीय पत्रकार परिषद मुंबई शाखा परळीच्या वतीने दर्पनदिन साजरा* परळी,(प्रतिनिधी):-पत्रकारितेत येणार्‍या नव्या पिढीने व्यासंग वाढवावा सर्व सामान्यांच्या समस्या अग्रक्रमाने मांडून बदलत्या परिस्थितीची आव्हाने स्विकारावीत असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार प्रशांत जोशी यांनी केले.   अखिल भारतीय पत्रकार परिषद मुंबई शाखा परळीच्या वतीने दि.6 जानेवारी 2021 रोजी दै.न्याय टाईम्स कार्यालयात दर्पनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्री.जोशी बोलत होते. यावेळी जेष्ठ पत्रकार ओमप्रकाश बुरांडे, ता.समन्वय धनंजय आरबुने, जेष्ट पत्रकार ह.भ.प.विश्वास महाराज पांडे, संपादक बालकिशन सोनी, दत्तात्रय काळे, स्वानंद पाटील, महादेव शिंदे, प्रा.प्रविण फुटके, जगदीश शिंदे, प्रा.राजु कोकलगावे, अनंत कुलकर्णी, दिगांबर देशमुख,आत्मलिंग शेटे, श्रीराम लांडगे, नरसिंग बापु अन्नलदास यांच्यासह इतर पत्रकार बांधव उपस्थित होते.  यावेळी प्रशांत जोशी यांनी पत्रकारीतेपुढील आव्हाने याविषयी विचार मांडले. इतर मध्ययमंचा प्रभाव वाढला तरी प्रिंट मिडीयाचे महत्व आजही कायम असल्

MB NEWS:सोशल मीडियाला पत्रकारांनी मित्र बनवावे –महेश कुलकर्णी समाजहिताच्या विषयांना पत्रकारांनी प्राधान्य द्यावे –शंकरअप्पा मोगरकर परळी पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन साजरा

इमेज
  सोशल मीडियाला पत्रकारांनी मित्र बनवावे –महेश कुलकर्णी   समाजहिताच्या विषयांना पत्रकारांनी प्राधान्य द्यावे –शंकरअप्पा मोगरकर   परळी पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन साजरा   परळी । प्रतिनिधी समाजाच्या जडण-घडणीमध्ये पत्रकारीतेचा वाटा खूप मोठा आणि मोलाचा आहे. मागील काळात पत्रकारीतेवर अनेक संकटं आली परंतू त्यावरही मात करीत करीत पत्रकारांनी आपली समृध्द वाटचाल सुरूच ठेवली आहे. अलिकडच्या काळात वृत्तपत्र माध्यमांना सोशल मीडियाशी खूप मोठा संघर्ष करावा लागत आहे. परंतू बदलच्या काळाबरोबर पत्रकारांनी बदलून घेवून सोशल मीडियाला आपला मित्र बनवले पाहीजे असे मत लोकमतच्या सोलापूर आवृत्तीचे वरिष्ठ उपसंपादक महेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले. मराठवाडा साथी पीसीएन न्युजच्या कार्यालयात परळी पत्रकार संघाच्या वतीने दर्पन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परळी शहर आणि तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित दर्पन दिन कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून लोकमतच्या सोलापूर आवृत्तीचे वरिष्ठ उपसंपादक महेश कुलकर्णी, दै.मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी, जेष्ठ पत्रकार शंकरअप्पा मोगरकर, नगरसेवक गोपाळ आंधळे यां

MB NEWS:सौ.सुमन माधवराव देशमुख ( चिखलबीडकर ) यांच निधन. -----------------------------------

इमेज
सौ.सुमन माधवराव देशमुख ( चिखलबीडकर ) यांच निधन. ----------------------------------    परळी वैजनाथ येथील सरस्वती विद्यालयाच्या सेवानिवृत्त शिक्षिका सौ.सुमन माधवराव देशमुख यांच आज दिनांक 05 जानेवारी 2021 रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास अल्पशा आजारानं दु;खद निधन झालं.त्या पंच्याहत्तर वर्षांच्या होत्या.     त्यांच्या माघारी पती माधवराव देशमुख,कन्या सुनीता मंठेकर,मुलगा तुकाराम देशमुख,जावाई,सून,आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.जालना येथील जे.ई.एस.महाविद्यालयाचे दिवंगत प्रा.कै.भगवान काळे आणि आकाशवाणी औरंगाबाद केंद्राचे सेवानिवृत्त निवेदक तसंच लेखक,साहित्यिक अनंत काळे यांच्या त्या भगिनी होत.     अत्यंत मनमिळावू आणि विद्यार्थिप्रिय व्यक्तीमत्व असलेल्या सुमन देशमुख यांना आदर्श शिक्षिका म्हणूनही गौरवण्यात आलं होतं.            *****

MB NEWS:परळी पत्रकार संघाच्या वतीने साजरा होणार दर्पण दिन महत्वपूर्ण विषयांवर होणार चर्चा; आवर्जून उपस्थित राहण्याचे पदाधिकाऱ्यांचे आवाहन

इमेज
  परळी पत्रकार संघाच्या वतीने साजरा होणार दर्पण दिन   महत्वपूर्ण विषयांवर होणार चर्चा; आवर्जून उपस्थित राहण्याचे पदाधिकाऱ्यांचे आवाहन   परळी । प्रतिनिधी परळी शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन कर्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाडा साथी पीसीएन न्युज कार्यालयात सकाळी ११ वाजता दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन कार्यक्रम होणार असून, कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन शहराध्यक्ष संभाजी मुंडे, तालुकाध्यक्ष अनंत गित्ते, कार्याध्यक्ष धिरज जंगले यांनी केले आहे. दरवर्षी परळी शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन 06 जानेवारी रोजी उत्साहात साजरा करण्यात येतो. याही वर्षी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने कार्यक्रम होणार आहे. मराठवाडा साथी पीसीएन न्युज कार्यालयात सकाळी ११ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमात पत्रकार संघाच्या आगामी धोरण व कार्याबद्दल तसेच अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात येणार असून, शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन शहराध्यक्ष स

MB NEWS:परळी पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर शहराध्यक्ष प्रल्हाद कंडुकटले, तालुका अध्यक्ष बाबा शेख तर कार्याध्यक्षपदी रानबा गायकवाड

इमेज
  परळी पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर  शहराध्यक्ष प्रल्हाद कंडुकटले, तालुका अध्यक्ष बाबा शेख तर कार्याध्यक्षपदी रानबा गायकवाड  परळी (प्रतिनिधी) : परळी शहर व तालुका पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी नुकतीच निवडण्यात आली. शहराध्यक्ष पदी दैनिक दिव्य लोकप्रभाचे, दै.हिंद जागृती प्रतिनिधी प्रल्हाद कंडुकटले, तालुका अध्यक्षपदी दैनिक जंगचे तालुका प्रतिनिधी बाबा शेख तर कार्याध्यक्षपदी दैनिक सम्राटचे प्रतिनिधी व परळी बुलेटिनचे संपादक रानबा गायकवाड यांची निवड करण्यात आली. जेष्ठ पत्रकार दिलीप भद्दर(दै.लोकाशा) यांच्या अध्यक्षतेखाली व दै.दिव्य अग्नी चे संपादक प्रकाश सूर्यकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारिणी निवडण्यात आली.        उर्वरित कार्यकारिणीत शहर उपाध्यक्ष माणिक कोकाटे (दै.आनंद नागरी), सचिव प्रकाश वर्मा, तालुका उपाध्यक्ष बालाजी ढगे (दै.बीड नेता), तालुका सचिव शेख मुकर्रम (दै.सिटीझन) तर सल्लागार प्रा.प्रवीण फुटके (दै.सकाळ), स्वानंद पाटील (दै.सामना), प्रेमनाथ कदम (दै.सूर्योदय), बालकिशन सोनी (दै.न्याय टाइम्स), ओमप्रकाश बुरांडे (दै.एकमत), जगदीश शिंदे (दै.गावकरी), भगवान साकसमुद्रे (जागृती न्

MB NEWS:जास्तीत जास्त ग्राहकांनी बिल दुरूस्ती मेळाव्याचा लाभ घ्यावा –चंदुलाल बियाणी

इमेज
  जास्तीत जास्त ग्राहकांनी बिल दुरूस्ती मेळाव्याचा लाभ घ्यावा –चंदुलाल बियाणी परळी (प्रतिनिधी) गेल्या अनेक दिवसांपासून परळी शहर व तालुक्यातील विजग्राहकांच्या बिलाबाबतच्या तक्रारी निकाली काढण्याचा विचार विजवितरण कंपनीने पुढे आणला असून, राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बिड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या ०६ जानेवारी ते ०८ जानेवारी या कालावधीत बिल दुरूस्ती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी होऊन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा नगरसेवक चंदुलाल बियाणी यांनी केले आहे. दि.०६ जानेवारी ते ०८ जानेवारी दरम्यान परळी उपविभागातील विजग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी बिल दुरूस्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतचे कार्यालयीन आदेश वरिष्ठ पातळीवरून काढण्यात आले असून, या तीन दिवसांत जास्तीत जास्त तक्रारींचा निवाडा करण्याचे आदेश पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. या मेळाव्यात विजबिलांबाबतच्या तक्रारी समजून घेवून त्यांचे निराकरण करण्यात येणार असल्याची मा

MB NEWS: *माणसाला ऊर्जा देणाऱ्या निसर्गाला जपा.- गणेश आघाव* *पोरी शाळेत निघाल्या या गीताचे शानदार कार्यक्रमात लॉन्चिंग*

इमेज
 *माणसाला ऊर्जा देणाऱ्या निसर्गाला जपा.- गणेश आघाव* *पोरी शाळेत निघाल्या या गीताचे शानदार कार्यक्रमात लॉन्चिंग* परळी प्रतिनिधी -: आपल्या अवतीभोवती असणाऱ्या निसर्गातून माणसाला ऊर्जा मिळते, त्या ऊर्जेला आपण जपले पाहिजे अन्यथा असमतोल निर्माण होतो ,असे साहित्य अकादमी पुरस्कार नामांकन प्राप्त कवी गणेश आघाव यांनी प्रतिपादन केले आहे. तर अरुण पवार यांनी कविता आणि गीतांमधून लाखो लोकांपर्यंत पोहोचता येते असे उद्घाटन पर भाषणात बोलताना सांगितले.   परळी येथील शिवछत्रपती विद्यालयात पोरी शाळेत निघाल्या या गीताचे लॉन्चिंग करण्यात आले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शिवछत्रपती विद्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख चेनलवाडसाहेब हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. राजकुमार यल्लावाड ,कवी अनंत मुंडे ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड कवी केशव कुकडे, रघुनाथ आंधळे, शिवछत्रपती विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रकाश पाटील आदी उपस्थित होते .   गीतकार गणेश आघाव यांनी लिहिलेले पोरी शाळेत निघाल्या हे गीत आजवर बत्तीस भाषेत भाषांतरीत झालेलं आहे.हे गीत आता व

MB NEWS: न्यू हायस्कूल कॉलेज येथे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

इमेज
 न्यू हायस्कूल कॉलेज येथे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन  प्रतिनिधी, परळी (वै.) :   शहरातील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय येथे ता.३ जानेवारी रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती 'महिला शिक्षण दिन' म्हणून अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली.     यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी न्यू हायस्कूल कॉलेजचे प्राचार्य एन.एच.शेंडगे, पर्यवेक्षक एस.पी. देशमुख, उपप्राचार्य सुनील लोमटे, श्री अजय सोळंके, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.अंकुश वाघमारे, प्रा. डॉ. सुनील चव्हाण, देशमुख मॅडम, सय्यद मॅडमसह प्राध्यापक व कर्मचारी वृंद व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.

MB NEWS: *लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी*

इमेज
 *लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी*   परळी वैजनाथ दि.०४ (प्रतिनिधी)             येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त "महिला शिक्षीका दिन" उत्साहात साजरा करण्यात आला.                राणी लक्ष्मीबाई टाँवर चौक परिसरात असलेल्या लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. विनोद जगतकर, तर प्रा.डॉ. प्रविण दिग्रसकर, प्रा.नव्हाडे, प्रा.पि.एम.फुटके उपस्थित होते. सुरुवातीला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना प्रा. डॉ. जगतकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला. तसेच सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांचा त्याग इतर सर्व समाजकार्य करणाऱ्या समाजसुधारकां पेक्षा जास्त आहे. फुले दामपत्य जर समाजसुधारनेत आले नसते तर ते उद्योजक झाले असते.असे ही श्री.जगतकर यांनी सांगितले. गायत्री

MB NEWS: *डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव दिलिपराव भरड यांची महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेश व परीनियम तपासणी समितीवर निवड; परळीत ह्रद्य सत्कार*

इमेज
 *डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव दिलिपराव भरड यांची महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेश व परीनियम तपासणी समितीवर निवड; परळीत ह्रद्य सत्कार* परळी वैजनाथ,प्रतिनिधी....        डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव दिलिपराव भरड यांची महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेश व परीनियमांची तपासणी समितीवर नुकतीच निवड झाली आहे.या निवडीबद्दल त्यांचा परळीत सत्कार करण्यात आला.          डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव श्री.दिलिपराव भरड यांची महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेश व परीनियमांची तपासणी समितीवर सदस्य म्हणून निवड झाली. श्री.भरड हे परळी मध्ये एका लग्न समारंभास आलेड असताना त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी परळीचे माजी नगराध्यक्ष, नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, कै. ल.दे.देशमुख महिला महाविद्यालयाचे अध्यक्ष संजय देशमुख,ज्येष्ठ नेते प्रकाश जोशी,श्रीकांत मांडे,अजय जोशी, जितेंद्र नव्हाडे,चारुदत्त करमाळकर,शैलेन्द्र आर्विकर आदि उपस्थित होते.

MB NEWS:अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन: "परळीचे मांझी" केशवराव कुरुडे पोहचले पंच्याहत्तरीत !

इमेज
  अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन: "परळीचे मांझी" केशवराव कुरुडे पोहचले पंच्याहत्तरीत ! केशवराव कुरुडे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अभिष्टचिंतन  गौरव परळी वैजनाथ ता.०२ (प्रतिनिधी).....         लोकांच्या सुखासाठी दगडधोंडा वेचून सुखमय रस्ता निर्माण करणारे परळीतील केशवराव कुरुडे हे जेष्ठ नागरिक  "परळीचे दशरथ मांझी"  म्हणून ओळखले जात आहेत. सकाळी व संध्याकाळी फिरायला जाणार्या आबालवृद्धांना खाचखळग्याची डोंगरी पाऊलवाट स्वत: श्रमदानातून  रस्त्यात रुपांतरीत करण्याचे काम त्यांनी उभे केले आहे. सर्व परिचित"परळीचे मांझी" केशवराव कुरुडे वयाच्या पंच्याहत्तरीत पोहचले आहेत.केशवराव कुरुडे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त  त्यांचा नुकताचअभिष्टचिंतन  गौरव करण्यात आला.            येथील कृषी विभागातील सेवानिवृत्त ट्रेसर केशवराव कुरुडे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त (वय ७५) मित्र मंडळाच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला. केशवराव कुरुडे हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून सर्वदुर परिचित आहेत.शहरातील सुर्वेश्वर नगर परिसरातील रहिवासी कृषी विभागातील सेवानिवृत्त ट्रेसर, सामाजिक

MB NEWS: *एमबीबीस पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या अर्थसहाय्य योजनेचा लाभ घ्यावा - अजय मुंडे*

इमेज
 *एमबीबीस पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या अर्थसहाय्य योजनेचा लाभ घ्यावा - अजय मुंडे* परळी (प्रतिनिधी) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने एमबीबीएस शिक्षणाच्या प्रवेशास पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना २५ हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची योजना सुरू केली आहे. परळी तालुक्यासह बीड जिल्ह्यातल्या पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे यांनी केले आहे.  समाज कल्याण समितीचे सभापती कल्याण आबुज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्हा परिषद बीड अंतर्गत जिल्हा परिषदेच्या स्वनिधी मधून २०२०-२१ मध्ये एमबीबीएस प्रवेशास पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून २५ हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा अत्यंत स्तुत्य निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल, परळीसह बीड जिल्ह्यातील पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जगमित्र ऑफिस व अजय मुंडे या

MB NEWS:भाजपाचे नेते राजेश गिते यांच्या वतीने नवनियुक्त संभाजीनगरचे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश चाटे यांचा सत्कार

इमेज
  भाजपाचे नेते राजेश गिते यांच्या वतीने नवनियुक्त संभाजीनगरचे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश चाटे यांचा सत्कार परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-भाजपाचे नेते तथा हरिसुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश गित्ते यांच्या वतीने शहरातील संभाजीनगर पोलिस निरीक्षक सुरेश चाटे यांचा सत्कार करण्यात आला आहे.                  शहरातील संभाजीनगरचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांची अंबाजोगाई येथे बदली झाली होती. त्यांच्या जागी बीड येथून आलेले नवनियुक्त पोलिस निरीक्षक सुरेश चाटे यांनी पदभार स्विकारला आहे. पोलिस निरीक्षक सुरेश चाटे यांचा आज दि.01 जानेवारी रोजी भाजपाचे नेते राजेश गित्ते यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राजेश गित्ते यांच्यासह नंदनजचे सरपंच अनिल गुट्टे, मिरवटचे सरपंच धुराजी साबळे, मिरवट चेअरमन भरतराव इंगळे ,मिरवट उपसरपंच रामेश्वर इंगळे आदि उपस्थित होते.

MB NEWS:आता एमपीएससी परीक्षेला कमाल संधीची मर्यादा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्यांसाठी मोठी घोषणा …….!

इमेज
  आता एमपीएससी परीक्षेला कमाल संधीची मर्यादा  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्यांसाठी मोठी घोषणा …….!   मुंबई दि.30 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विभिन्न शासकीय पदांसाठी सुयोग्य उमेदवारांच्या शिफारशी संदर्भात राबविण्यात येणा-या निवड प्रक्रियामध्ये वेळोवेळी करावयाच्या विविध सुधारणात्मक उपाययोजनां पैकी एक म्हणजे स्पर्धा परीक्षांस बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न / संधीची संख्या मर्यादित करणे बाबत आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे.         याबाबत सविस्तर माहिती अशी की, आयोगामार्फत आयोजित होणाऱ्या विभिन्न स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारांस संधीची कमाल मर्यादा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आली असून खुला (अराखीव) उमेदवारांस कमाल सहा संधी उपलब्ध राहतील. तर अनुसुचित जमाती व अनुसुचित जाती प्रवर्गातील उमेदवारांस कमाल संधीची मर्यादा लागू राहणार आहे.         तसेच उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारांस कमाल नऊ संधी उपलब्ध राहतील.                तर उमेदवारांची संधीची संख्या पुढील प्रमाणे लागू राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामध्ये उमेदवाराने पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास, ही संबंधित

MB NEWS:उज्जैनच्या दौर्‍यात पंकजाताई मुंडे पोहोचल्या थेट बुथ कार्यकर्त्यांच्या घरी* *ज्योतिर्लिंग महाकालेश्वरचे घेतले दर्शन ; भाजपा कार्यालयातही साधला संवाद*

इमेज
 * उज्जैनच्या दौर्‍यात पंकजाताई मुंडे पोहोचल्या थेट बुथ कार्यकर्त्यांच्या घरी* *ज्योतिर्लिंग महाकालेश्वरचे घेतले दर्शन ; भाजपा कार्यालयातही साधला संवाद* उज्जैन(म.प्र.) दि.३० ---- भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा मध्यप्रदेशच्या सह प्रभारी पंकजाताई मुंडे यांचा मध्यप्रदेश दौरा सर्वार्थाने यशस्वी ठरला. सोमवारी त्यांनी उज्जैन येथे ज्योतिर्लिंग महाकालेश्वरचे दर्शन घेतले आणि त्यानंतर अचानक थेट एका बुथ कार्यकर्त्यांच्या घरी पोहोचल्या, त्यांच्या येण्याने कार्यकर्त्यांत मोठा उत्साह संचारला होता. बुथ कार्यकर्त्याच्या स्वागताने माझ्या दौर्‍याचे सार्थक झाले असे त्या यावेळी म्हणाल्या.    पंकजाताई मुंडे यांनी सोमवारी  उज्जैन येथील ज्योतिर्लिंग महाकालेश्वर चे दर्शन घेतले, याठिकाणी पूजा व आरतीमध्ये अर्धा तास सहभाग घेतला, त्यानंतर संघटनात्मक दृष्टीने मजबुत मानल्या जाणा-या शहरातील स्थानिक बुथ कार्यकर्ता गजेंद्र आरोण्या व मंडल अध्यक्ष अजय तिवारी यांच्या घरी भेट दिली. याठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. मंगलनाथ येथेही त्यांनी दर्शन घेतले. *कार्यकर्त्यांशी संवाद* -----------------------------

MB NEWS- Video:बलात्कारी युवा प्रदेश अध्यक्ष ला अटक करा :परळीत भाजपा युवा मोर्चाची निदर्शने*

इमेज
 * बलात्कारी युवा प्रदेश अध्यक्ष ला अटक करा :परळीत भाजपा युवा मोर्चाची निदर्शने* *महाविकास आघाडी सरकार च्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा* परळी वैजनाथ, प्रतिनिधी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष यांनी संभाजीनगर युवती ला नौकरी चे अमिष दाखवुन बलात्कार केला या आघाडी सरकारच्या स्थापने पासून कोविड सेंटर मध्ये सुद्धा बलात्कारा च्या घटना घडल्या आहेत स्वतः गृहमंत्री यांच्या मतदारसंघात सुद्धा महिले वर अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अश्या प्रकारच्या गुन्ह्या मुळे महाराष्ट्र मध्ये कायदा व सुव्यवस्था आहे का नाही हा प्रश्न निर्माण होत आहे!महाराष्ट्र चे गृहमंत्री कुठे आहेत हा प्रश्न जनता विचारत आहे! युवतीवर बलात्कार केला याप्रकरणी गुन्हा नोंद होऊन ही महाविकास आघाडी सरकार व गृहमंत्री मूग गिळून गप्प आहेत यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा परळी च्या वतीने मा.तहसीलदार, तहसील कार्यालय परळी येथे निवेदन देण्यात आले या वेळी उपस्थित भाजपा युवा मोर्चा बीड जिल्हा अध्यक्ष निळकंठ चाटे,डॉ शालिनीताई कराड,नगरसेवक पवन मुंडे सर,यु मो प्रदेश सचिव ॲड.अरुण पाठक,बाळासाहेब फड,योगेश पांडकर,सतीश फड,सुशील हरंगुळ

MB Newsसंभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीच्या परळी वै. तालुकाध्यक्षपदी शिवश्री नामदेव भालेराव यांची निवड*

इमेज
 * संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीच्या परळी वै. तालुकाध्यक्षपदी शिवश्री नामदेव भालेराव यांची निवड* परळी (प्रतिनिधी) *संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीच्या परळी-वैद्यनाथ तालुका अध्यक्षपदी शिवश्री नामदेव भालेराव यांची निवड संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज यांच्या हस्ते व संभाजी ब्रिगेड परळी शहराध्यक्ष शिवश्री सेवकराम जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आली* नामदेव भालेराव यांच्या कार्याची दखल घेत संभाजी ब्रिगेड तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे कार्य तसेच शैक्षणिक दृष्ट्या विद्यार्थांना येणाऱ्या अडचणी सोडवण्याच्या साठी  संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीच्या परळी तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. या निवडी प्रसंगी *संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष शिवश्री सेवकराम जाधव, सामाजिक कार्यकर्ते शिवश्री अरुण दादा सपाटे, शिवश्री पवन माने शिवश्री गणेश वाळके* आदी उपस्थित होते सर्व थरातून संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी *शिवश्री नामदेव भालेराव* यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन व कौतुक होत आहे.

MB NEWS:तिर्थक्षेञ श्री.काळभैरव देवस्थान याञा उत्सव साधेपणाने होणार साजरा* *शारीरिक अंतर ठेवून दर्शन व पाच मानकरी यांच्या उपस्थिती पालखी सोहळा*

इमेज
 * तिर्थक्षेञ श्री.काळभैरव देवस्थान याञा उत्सव साधेपणाने होणार साजरा*  *शारीरिक अंतर ठेवून दर्शन व पाच मानकरी यांच्या उपस्थिती पालखी सोहळा* परळी वै.प्रतिनिधी दि.26.... तालुक्यातील मौजे मांडवा येथील तिर्थक्षेञ श्री.काळभैरव देवस्थानचा परंपरीक याञा उत्सव या वर्षी कोव्हिड १९ मुळे अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय मांडवा ग्रामस्थांनी घेतला आहे,याञे निमित्ताने होणारी धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत तसेच कुस्त्यांच्या दंगली भरविण्यात येणार नसल्याचे देखील ग्रामस्थांनी जाहीर केले आहे. दर वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला परंपरागत पध्दतीने मोठ्या उत्साहाने साजरा होणारा  तिर्थक्षेञ श्री.काळभैरव देवस्थानचा तिन दिवसीय याञा उत्सव करण्यात येतो. येथे दर्शनासाठी कर्नाटक, आंध्रप्रदेश येथील मथुरा लभाण समाजाचे भक्त हजारोच्या संख्येने तिन दिवसीय मुक्कामी येत असतात.मोठ्या प्रमाणात खेळण्याची दुकाने तसेच विविध धार्मिक कार्यक्रम ,महापुजा व पालखी मिरवणूक काढण्यात येत असते तसेच कुसत्यांच्या दंगली भारवण्यात येतात. या वर्षी कोव्हीड १९ मुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र शासना कडून न

MB NEWS:पत्रकार अनंत कुलकर्णी यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कार जाहीर

इमेज
  पत्रकार अनंत कुलकर्णी यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती  पुरस्कार जाहीर  परळी (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती परिषद परिषदेच्या वतिने देण्यात येणारा राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवाकार्य पुरस्कार परळी येथील झुंजार नेताचे पत्रकार अनंत कुलकर्णी यांना जाहीर झाला असुन या पुरस्काराचे येरमाळा ता.कळंब येथे दि.31 डिसेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात येणार आहे.    राज्यात मागील अनेक वर्षांपासून व्यसनमुक्त चळवळ सक्षम व्हावी या चळवळीतुन एक दिवस व्यसनमुक्त राष्ट्र,सशक्त राष्ट्र घडो या राष्ट्रहिताच्या ध्येयाने महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती परिषद कार्यरत आहे.व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी या कार्यक्रमात अनेक संस्था,व्यक्ति, पत्रकार इतर काम करत आहेत.सदर लोकांनी केलेल्या कार्याची दखल घेत परिषदेच्या वतीने आयोजक डॉ.संदिप तांबारे उस्मानाबाद ,अजय शेरकर बीड हे राज्यातील नामवंत व्यक्तीनां राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कार देऊन गौरवित असतात.यावर्षीच्या पुरस्कारासाठी दैनिक झुंजार नेता च्या माध्यमातून व्यसनमुक्त साठी लेख, परळी ग्रामीण भागात सामाजिक भागातील युवकांना व्यसनापासुन दुर ठेवण्यासाठी सत

MB NEWS: *धनंजय मुंडे सात तास जनतेच्या दरबारात रमतात तेव्हा...*

इमेज
 *धनंजय मुंडे सात तास जनतेच्या दरबारात रमतात तेव्हा...* परळी (दि. २१) : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी एक दोन तास नव्हे तर तब्बल सात तास परळीत जनता दरबार घेतला. त्यांचा सात तास चाललेला जनता दरबार आलेल्या प्रत्येक व्यक्तीला भेटून त्यांची अडचण/प्रश्न/समस्या समजून घेत ती जिथल्या तिथे सोडवण्याचा प्रयत्न करणे हे त्यांचे वैशिष्ट्य अधोरेखित करणारा ठरला! विधान परिषद निवडणूक आचार संहिता संपल्यानंतर परळीत ना. मुंडे यांचा हा पहिलाच जनता दरबार असावा; तसे तर माणसं भेटतील तिथेच जनता दरबार आणि तिथून काम मार्गी लावणे हे त्यांच्या जनता दरबाराचे दुसरे वैशिष्ट्य म्हणता येईल! परळी येथील जगमित्र कार्यालयात आज धनंजय मुंडे हजारो लोकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात रमले होते. वैयक्तिक कामे, वैयक्तिक अडचणी, सार्वजनिक कामे, विविध मागण्या यासह अगदी कौटुंबिक व गाव गाड्याच्या समस्या घेऊन देखील अनेक लोक ना. मुंडेंना भेटतात. आलेल्या प्रत्येकाचे समाधान करणे एवढ्या मोठ्या गर्दीत बऱ्याचदा शक्य होत नाही, परंतु आलेल्या प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेऊन त्यावर निश्चित कार्यवाही करणे व त्याच

MB NEWS:परळीतून श्रीराम जन्मभूमी निधी जास्तीत जास्त संकलन करण्याचा निर्धार !

इमेज
  परळीतून श्रीराम जन्मभूमी निधी जास्तीत जास्त संकलन करण्याचा निर्धार !  *शेकडो प्रभू श्रीराम भक्तांच्या उपस्थित निधी संकलन संदर्भात बैठक संपन्न.*  परळी वैजनाथ :- प्रभू श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र निधी संकलन अयोध्या अंतर्गत संपुर्ण देशभर दि १५ जानेवारी २०२१ ते १५ फेब्रुवारी या काळात निधी संकलन केले जाणार असून याच संदर्भात परळी वैजनाथ शहरामध्ये तालुका अभियान समिती स्थापन करण्यात आली असून या समितीतर्फे काल रविवार रोजी व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.                 या वेळी अभियान यशस्वी करण्याच्या उद्देशाने पुढील तयारी चे नियोजन करण्यात आले. यावेळी १९९२ कारसेवकांचा ह्रदय पुर्ण सत्कार या वेळी समिती तर्फे करण्यात आला. या मध्ये श्री प्रकाश डुबे, राजाभाऊ दहिवाळ, नरसिंग देशमुख, कमलाबाई मुंडे, सगुणाबाई कराड, शांताबाई टाक ईत्यादी उपस्थित होते. या वेळी डॉ प्रकाश डुबे, कमलाबाई मुंडे, राजाभाऊ दहिवाळ ईत्यादी कारसेवकांनी आपले १९९२ च्या आंदोलनातील अनुभव कथन केले. या वेळी अभियान समितीची, अभियान तालुका समितीची घोषणा करण्यात आली. या बैठकीस विविध क्षेत्रातील रामभक्त उपस्थित होते.अधिक माहिती सा

MB NEWS: *सामाजिक जाणिवेचा उपक्रम : परळी विकास मंचच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मुदतठेवीचे धनादेश सुपूर्द*

इमेज
 *सामाजिक जाणिवेचा उपक्रम : परळी विकास मंचच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मुदतठेवीचे धनादेश सुपूर्द* परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      परळी विकास मंचच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मुदतठेवीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.सामाजिक जाणिवेचा उपक्रम राबवत २०१५ मध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या नावे ३० हजार रुपये मुदतठेव करण्यात आली होती.ही मुदत संपल्यानंतर आज मुदतठेवीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.         शहरात अनेक पक्ष, संघटनेचे तरूण एकत्र येऊन राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून 12 जानेवारी 2012 रोजी परळीच्या सांस्कृतिक,सामाजिक व विकासाच्या जाणिवेतून अराजकीय संघटना परळी विकास मंचची स्थापना करण्यात आले.विकास मंचच्या माध्यमातुन शहरातील छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची पहिली मागणी केली होती .शहरात बस स्थानक ते श्यामाप्रसाद मुखर्जी उडानपुलावर होणारे अपघात पाहून शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा विषय बाह्यवळण ( बायपास)रस्त्याची पहिली मागणी विकास मंचाच्या माध्यमातून करण्यात आली. तो आता होण्याच्या मार