इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS: *लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी*

 *लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी*

 


परळी वैजनाथ दि.०४ (प्रतिनिधी)

            येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त "महिला शिक्षीका दिन" उत्साहात साजरा करण्यात आला.

               राणी लक्ष्मीबाई टाँवर चौक परिसरात असलेल्या लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. विनोद जगतकर, तर प्रा.डॉ. प्रविण दिग्रसकर, प्रा.नव्हाडे, प्रा.पि.एम.फुटके उपस्थित होते. सुरुवातीला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना प्रा. डॉ. जगतकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला. तसेच सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांचा त्याग इतर सर्व समाजकार्य करणाऱ्या समाजसुधारकां पेक्षा जास्त आहे. फुले दामपत्य जर समाजसुधारनेत आले नसते तर ते उद्योजक झाले असते.असे ही श्री.जगतकर यांनी सांगितले. गायत्री पुजारी व आफरिन शेख या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक प्रा.नव्हाडे, सूत्र संचालन गायत्री केंद्रे, कुरेशी इरम फातेमा यांनी तर आभार वैष्णवी घायाळ हिने मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या