MB NEWS: *माणसाला ऊर्जा देणाऱ्या निसर्गाला जपा.- गणेश आघाव* *पोरी शाळेत निघाल्या या गीताचे शानदार कार्यक्रमात लॉन्चिंग*

 *माणसाला ऊर्जा देणाऱ्या निसर्गाला जपा.- गणेश आघाव*



*पोरी शाळेत निघाल्या या गीताचे शानदार कार्यक्रमात लॉन्चिंग*


परळी प्रतिनिधी -: आपल्या अवतीभोवती असणाऱ्या निसर्गातून माणसाला ऊर्जा मिळते, त्या ऊर्जेला आपण जपले पाहिजे अन्यथा असमतोल निर्माण होतो ,असे साहित्य अकादमी पुरस्कार नामांकन प्राप्त कवी गणेश आघाव यांनी प्रतिपादन केले आहे. तर अरुण पवार यांनी कविता आणि गीतांमधून लाखो लोकांपर्यंत पोहोचता येते असे उद्घाटन पर भाषणात बोलताना सांगितले.

  परळी येथील शिवछत्रपती विद्यालयात पोरी शाळेत निघाल्या या गीताचे लॉन्चिंग करण्यात आले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शिवछत्रपती विद्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख चेनलवाडसाहेब हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. राजकुमार यल्लावाड ,कवी अनंत मुंडे ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड कवी केशव कुकडे, रघुनाथ आंधळे, शिवछत्रपती विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रकाश पाटील आदी उपस्थित होते .

  गीतकार गणेश आघाव यांनी लिहिलेले पोरी शाळेत निघाल्या हे गीत आजवर बत्तीस भाषेत भाषांतरीत झालेलं आहे.हे गीत आता व्हिडिओ स्वरुपात पहायला मिळणार आहे.परळी वै.येथीलच आदर्श शिक्षक , चित्रकार कवी सिद्धेश्वर इंगोले यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केले आहे तसेच रानबा गायकवाड यांनी दिग्दर्शन केले आहे.याप्रसंगी या गीताचे लॉन्चिंग करण्यात आले.या प्रसंगी गीतातील कलाकार व विद्यार्थीनी,तंत्रज्ञ यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.



         कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धेश्वर इंगोले , सूत्रसंचालन अशोक फड यांनी तर आभार सचिन कर्णर यांनी मानले. या कार्यक्रमास लक्ष्मण लाड ,आनंद व्हावळे ,दिवाकर जोशी, गणगोपलवाड पत्रकार विकास, वाघमारे ,विद्याधर शिरसाठ,विष्णू तोडकर, भाऊसाहेब सोळंके, सचिन खरात , बापुराव खोतपाटील संतोष मेंडके ,अंकुश चव्हाण, नाना रोडे ,इबितवार, आकाश देवरे ,महेश मुंडे आदी शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थी पालक मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !