MB NEWS:परळी पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर शहराध्यक्ष प्रल्हाद कंडुकटले, तालुका अध्यक्ष बाबा शेख तर कार्याध्यक्षपदी रानबा गायकवाड

 परळी पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर 

शहराध्यक्ष प्रल्हाद कंडुकटले, तालुका अध्यक्ष बाबा शेख तर कार्याध्यक्षपदी रानबा गायकवाड 



परळी (प्रतिनिधी) : परळी शहर व तालुका पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी नुकतीच निवडण्यात आली. शहराध्यक्ष पदी दैनिक दिव्य लोकप्रभाचे, दै.हिंद जागृती प्रतिनिधी प्रल्हाद कंडुकटले, तालुका अध्यक्षपदी दैनिक जंगचे तालुका प्रतिनिधी बाबा शेख तर कार्याध्यक्षपदी दैनिक सम्राटचे प्रतिनिधी व परळी बुलेटिनचे संपादक रानबा गायकवाड यांची निवड करण्यात आली. जेष्ठ पत्रकार दिलीप भद्दर(दै.लोकाशा) यांच्या अध्यक्षतेखाली व दै.दिव्य अग्नी चे संपादक प्रकाश सूर्यकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारिणी निवडण्यात आली. 

      उर्वरित कार्यकारिणीत शहर उपाध्यक्ष माणिक कोकाटे (दै.आनंद नागरी), सचिव प्रकाश वर्मा, तालुका उपाध्यक्ष बालाजी ढगे (दै.बीड नेता), तालुका सचिव शेख मुकर्रम (दै.सिटीझन) तर सल्लागार प्रा.प्रवीण फुटके (दै.सकाळ), स्वानंद पाटील (दै.सामना), प्रेमनाथ कदम (दै.सूर्योदय), बालकिशन सोनी (दै.न्याय टाइम्स), ओमप्रकाश बुरांडे (दै.एकमत), जगदीश शिंदे (दै.गावकरी), भगवान साकसमुद्रे (जागृती न्यूज चॅनेल व दृष्टीकोन बीड न्यूज) हे राहणार आहेत. 

      उर्वरित कार्यकारिणीत सदस्य प्रा.दशरथ रोडे(दै.जनसन्मान), समीर इनामदार (दै.लोकपत्र), अमोल सूर्यवंशी (माजलगाव टाइम्स), निवृत्ती खाटीक(संपादक), सुकेशिनी नाईकवाडे (दै.कार्यारंभ), विकास वाघमारे (दै.महाभारत), सचिन वंजारे (साप्ताहिक शिक्षणमार्ग), ब्रम्हानंद कांबळे (परळी बुलेटिन), सय्यद अफसर (ऐलान), नितीन ढाकणे, प्रकाश वर्मा, दीपक गित्ते, नवल वर्मा, शेख सोहेल (लोकरत्न), शेख रईस, शेख मुदस्सीर (सरकार एक्सप्रेस) आदी पत्रकार यावेळी उपस्थित होते. 

     दरम्यान ६ जानेवारी दर्पणदिन परळी पत्रकार भवन येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार असल्याचे नूतन पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !