MB NEWS:परळीतून श्रीराम जन्मभूमी निधी जास्तीत जास्त संकलन करण्याचा निर्धार !

 परळीतून श्रीराम जन्मभूमी निधी जास्तीत जास्त संकलन करण्याचा निर्धार ! 



*शेकडो प्रभू श्रीराम भक्तांच्या उपस्थित निधी संकलन संदर्भात बैठक संपन्न.* 


परळी वैजनाथ :- प्रभू श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र निधी संकलन अयोध्या अंतर्गत संपुर्ण देशभर दि १५ जानेवारी २०२१ ते १५ फेब्रुवारी या काळात निधी संकलन केले जाणार असून याच संदर्भात परळी वैजनाथ शहरामध्ये तालुका अभियान समिती स्थापन करण्यात आली असून या समितीतर्फे काल रविवार रोजी व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

               या वेळी अभियान यशस्वी करण्याच्या उद्देशाने पुढील तयारी चे नियोजन करण्यात आले.

यावेळी १९९२ कारसेवकांचा ह्रदय पुर्ण सत्कार या वेळी समिती तर्फे करण्यात आला. या मध्ये श्री प्रकाश डुबे, राजाभाऊ दहिवाळ, नरसिंग देशमुख, कमलाबाई मुंडे, सगुणाबाई कराड, शांताबाई टाक ईत्यादी उपस्थित होते. या वेळी डॉ प्रकाश डुबे, कमलाबाई मुंडे, राजाभाऊ दहिवाळ ईत्यादी कारसेवकांनी आपले १९९२ च्या आंदोलनातील अनुभव कथन केले. या वेळी अभियान समितीची, अभियान तालुका समितीची घोषणा करण्यात आली. या बैठकीस विविध क्षेत्रातील रामभक्त उपस्थित होते.अधिक माहिती साठी अभियान प्रमुख श्री दिनेश लोंढे 9975934730, प्रल्हाद बिडगर 9561617877 तालुका कार्यवाह यांना संपर्क करण्याचे आव्हान समिती तर्फे करण्यात आले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार