MB NEWS:तिर्थक्षेञ श्री.काळभैरव देवस्थान याञा उत्सव साधेपणाने होणार साजरा* *शारीरिक अंतर ठेवून दर्शन व पाच मानकरी यांच्या उपस्थिती पालखी सोहळा*

 *तिर्थक्षेञ श्री.काळभैरव देवस्थान याञा उत्सव साधेपणाने होणार साजरा*



 *शारीरिक अंतर ठेवून दर्शन व पाच मानकरी यांच्या उपस्थिती पालखी सोहळा*


परळी वै.प्रतिनिधी दि.26....


तालुक्यातील मौजे मांडवा येथील तिर्थक्षेञ श्री.काळभैरव देवस्थानचा परंपरीक याञा उत्सव या वर्षी कोव्हिड १९ मुळे अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय मांडवा ग्रामस्थांनी घेतला आहे,याञे निमित्ताने होणारी धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत तसेच कुस्त्यांच्या दंगली भरविण्यात येणार नसल्याचे देखील ग्रामस्थांनी जाहीर केले आहे.


दर वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला परंपरागत पध्दतीने मोठ्या उत्साहाने साजरा होणारा  तिर्थक्षेञ श्री.काळभैरव देवस्थानचा तिन दिवसीय याञा उत्सव करण्यात येतो. येथे दर्शनासाठी कर्नाटक, आंध्रप्रदेश येथील मथुरा लभाण समाजाचे भक्त हजारोच्या संख्येने तिन दिवसीय मुक्कामी येत असतात.मोठ्या प्रमाणात खेळण्याची दुकाने तसेच विविध धार्मिक कार्यक्रम ,महापुजा व पालखी मिरवणूक काढण्यात येत असते तसेच कुसत्यांच्या दंगली भारवण्यात येतात.


या वर्षी कोव्हीड १९ मुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र शासना कडून नागरिकांना आरोग्य विषयक सुचना व आदेश देण्यात आले आहेत. मा.जिल्हाधिकारी साहेब बीड व पोलिस प्रशासन ,आरोग्य विभाग यांनी दिलेल्या सुचनेचे पालन करून श्री.काळभैरव मंदिर परिसरात निरजंतुकीकरण करण्यात आले आहे.तसेच भक्तांनी दर्शन घेते वेळी तोंडाला मास्क बांधने बंधनकारक असणार आहे , हताला सँनेटाईजर वापरण्याचा सुचना देण्यात आली आहे. दर्शनासाठी गर्द होणार नाही व सुरक्षित शारीरिक अंतर ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.शासनाच्या सर्व नियमाच्या आधीन राहून याञा उत्सव साधेपणाणे विधीवध महापुजा करून करण्यात येईल व पालखी मिरवणूक पाच मानकरी यांच्या उपस्थिती संपन्न होईल, याञा उत्सवा निमित्ताने होणारे विविध धार्मिक कार्यक्रम रद्द केले आहेत.तसेच कुस्त्यांच्या दंगली रद्द करण्याचा निर्णय मांडवा ग्रामस्थांनी एका प्रसिद्धी पञकाद्वारे जाहीर केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !