MB NEWS:अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन: "परळीचे मांझी" केशवराव कुरुडे पोहचले पंच्याहत्तरीत !

 अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन: "परळीचे मांझी" केशवराव कुरुडे पोहचले पंच्याहत्तरीत !



केशवराव कुरुडे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अभिष्टचिंतन  गौरव


परळी वैजनाथ ता.०२ (प्रतिनिधी).....

        लोकांच्या सुखासाठी दगडधोंडा वेचून सुखमय रस्ता निर्माण करणारे परळीतील केशवराव कुरुडे हे जेष्ठ नागरिक  "परळीचे दशरथ मांझी"  म्हणून ओळखले जात आहेत. सकाळी व संध्याकाळी फिरायला जाणार्या आबालवृद्धांना खाचखळग्याची डोंगरी पाऊलवाट स्वत: श्रमदानातून  रस्त्यात रुपांतरीत करण्याचे काम त्यांनी उभे केले आहे. सर्व परिचित"परळीचे मांझी" केशवराव कुरुडे वयाच्या पंच्याहत्तरीत पोहचले आहेत.केशवराव कुरुडे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त  त्यांचा नुकताचअभिष्टचिंतन  गौरव करण्यात आला.


           येथील कृषी विभागातील सेवानिवृत्त ट्रेसर केशवराव कुरुडे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त (वय ७५) मित्र मंडळाच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला. केशवराव कुरुडे हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून सर्वदुर परिचित आहेत.शहरातील सुर्वेश्वर नगर परिसरातील रहिवासी कृषी विभागातील सेवानिवृत्त ट्रेसर, सामाजिक कार्यकर्ते केशवराव कुरुडे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मित्रमंडळीच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. श्री.कुरुडे चांगले चित्रकार, येथील कृषी विभागात अनेक वर्षे यशस्वी ट्रेसर म्हणून सेवा, गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत  करत असतात. सेवानिवृत्ती नंतर त्यांनी परळी परिसरातील डोंगरावर नागरिकांना माँर्निंग वाँकला जाण्या येण्यासाठी रस्ता नव्हता त्यांनी रोज थोडा थोडा करून स्वतः श्रमदान करुन रस्ता तयार केला. त्यांच्या या कार्यामुळे ते सर्वदूर परिचित आहेत. त्यांना ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मित्रमंडळीच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. इंदूरकर, श्री.साखरे , प्रा.अमर अलदे, प्रा.धायगुडे, प्रा.अवस्थी, इंजि.भगवान साकसमुद्रे, हनुमंत इंगळे, माजी सरपंच पांडुरंग इंगळे, प्रा. बोकण, प्रा.काळे, प्रा.दहिफळे, श्री.बेदरकर, श्री.आळशे, श्री.धवले, प्रा.डॉ. दयानंद कुरुडे, वासंती कुरुडे, पियचष कुरुडे, अवन्ती कुरुडे आदी मित्रमंडळी उपस्थित होते. यावेळी श्री.कुरुडे यांचा शाँल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !