MB NEWS: *पत्रकारीतेत येणार्‍या नव्या पिढीने व्यासंग वाढवावा-प्रशांत जोशी* *अखिल भारतीय पत्रकार परिषद मुंबई शाखा परळीच्या वतीने दर्पनदिन साजरा*

 *पत्रकारीतेत येणार्‍या नव्या पिढीने व्यासंग वाढवावा-प्रशांत जोशी*



*अखिल भारतीय पत्रकार परिषद मुंबई शाखा परळीच्या वतीने दर्पनदिन साजरा*

परळी,(प्रतिनिधी):-पत्रकारितेत येणार्‍या नव्या पिढीने व्यासंग वाढवावा सर्व सामान्यांच्या समस्या अग्रक्रमाने मांडून बदलत्या परिस्थितीची आव्हाने स्विकारावीत असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार प्रशांत जोशी यांनी केले.

  अखिल भारतीय पत्रकार परिषद मुंबई शाखा परळीच्या वतीने दि.6 जानेवारी 2021 रोजी दै.न्याय टाईम्स कार्यालयात दर्पनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्री.जोशी बोलत होते. यावेळी जेष्ठ पत्रकार ओमप्रकाश बुरांडे, ता.समन्वय धनंजय आरबुने, जेष्ट पत्रकार ह.भ.प.विश्वास महाराज पांडे, संपादक बालकिशन सोनी, दत्तात्रय काळे, स्वानंद पाटील, महादेव शिंदे, प्रा.प्रविण फुटके, जगदीश शिंदे, प्रा.राजु कोकलगावे, अनंत कुलकर्णी, दिगांबर देशमुख,आत्मलिंग शेटे, श्रीराम लांडगे, नरसिंग बापु अन्नलदास यांच्यासह इतर पत्रकार बांधव उपस्थित होते.

 यावेळी प्रशांत जोशी यांनी पत्रकारीतेपुढील आव्हाने याविषयी विचार मांडले. इतर मध्ययमंचा प्रभाव वाढला तरी प्रिंट मिडीयाचे महत्व आजही कायम असल्याचे ते म्हणाले. प्रस्ताविक जगदीश शिंदे यांनी केले. यावेळी श्री.बुरांडे,  श्री.काळे यांनी विचार मांडले. सुत्रसंचलन धनंजय आरबुने यांनी तर आभार प्रदर्शन बालकिशन सोनी यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार