इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS: *सामाजिक जाणिवेचा उपक्रम : परळी विकास मंचच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मुदतठेवीचे धनादेश सुपूर्द*

 *सामाजिक जाणिवेचा उपक्रम : परळी विकास मंचच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मुदतठेवीचे धनादेश सुपूर्द*



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

     परळी विकास मंचच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मुदतठेवीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.सामाजिक जाणिवेचा उपक्रम राबवत २०१५ मध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या नावे ३० हजार रुपये मुदतठेव करण्यात आली होती.ही मुदत संपल्यानंतर आज मुदतठेवीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.



        शहरात अनेक पक्ष, संघटनेचे तरूण एकत्र येऊन राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून 12 जानेवारी 2012 रोजी परळीच्या सांस्कृतिक,सामाजिक व विकासाच्या जाणिवेतून अराजकीय संघटना परळी विकास मंचची स्थापना करण्यात आले.विकास मंचच्या माध्यमातुन शहरातील छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची पहिली मागणी केली होती .शहरात बस स्थानक ते श्यामाप्रसाद मुखर्जी उडानपुलावर होणारे अपघात पाहून शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा विषय बाह्यवळण ( बायपास)रस्त्याची पहिली मागणी विकास मंचाच्या माध्यमातून करण्यात आली. तो आता होण्याच्या मार्गावर आहे.अशी अनेक प्रश्न उपस्थित करून परळीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पूरग्रस्तांना मदत, शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला नगदी स्वरूपात मदत व आज दोन कुटुंबातील लहान मुलींच्या नावावर कु. रोहिणी भगवान इचके टोकवाडी, मोहिनी गोविंद मुंडे पांगरी कॅम्प या पाल्यांना 30000/-रू ची राजस्थानी पतसंस्थेची एफ डी देण्यात आली FD करण्यात आली होती. त्याची मॅच्युरीटी पुर्ण झालेला धनादेश पत्रकार प्रा.रविंद्र जोशी व प्रा. प्रविण फुटके यांच्या हस्ते देण्यात आला.याप्रसंगी परळी विकास मंचचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या