MB NEWS:सौ.सुमन माधवराव देशमुख ( चिखलबीडकर ) यांच निधन. -----------------------------------


सौ.सुमन माधवराव देशमुख ( चिखलबीडकर ) यांच निधन.

----------------------------------



   परळी वैजनाथ येथील सरस्वती विद्यालयाच्या सेवानिवृत्त शिक्षिका सौ.सुमन माधवराव देशमुख यांच आज दिनांक 05 जानेवारी 2021 रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास अल्पशा आजारानं दु;खद निधन झालं.त्या पंच्याहत्तर वर्षांच्या होत्या.

    त्यांच्या माघारी पती माधवराव देशमुख,कन्या सुनीता मंठेकर,मुलगा तुकाराम देशमुख,जावाई,सून,आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.जालना येथील जे.ई.एस.महाविद्यालयाचे दिवंगत प्रा.कै.भगवान काळे आणि आकाशवाणी औरंगाबाद केंद्राचे सेवानिवृत्त निवेदक तसंच लेखक,साहित्यिक अनंत काळे यांच्या त्या भगिनी होत.

    अत्यंत मनमिळावू आणि विद्यार्थिप्रिय व्यक्तीमत्व असलेल्या सुमन देशमुख यांना आदर्श शिक्षिका म्हणूनही गौरवण्यात आलं होतं.

           *****

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार