MB NEWS:आता एमपीएससी परीक्षेला कमाल संधीची मर्यादा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्यांसाठी मोठी घोषणा …….!

 आता एमपीएससी परीक्षेला कमाल संधीची मर्यादा



 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्यांसाठी मोठी घोषणा …….!

 

मुंबई दि.30 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विभिन्न शासकीय पदांसाठी सुयोग्य उमेदवारांच्या शिफारशी संदर्भात राबविण्यात येणा-या निवड प्रक्रियामध्ये वेळोवेळी करावयाच्या विविध सुधारणात्मक उपाययोजनां पैकी एक म्हणजे स्पर्धा परीक्षांस बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न / संधीची संख्या मर्यादित करणे बाबत आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे.

        याबाबत सविस्तर माहिती अशी की, आयोगामार्फत आयोजित होणाऱ्या विभिन्न स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारांस संधीची कमाल मर्यादा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आली असून खुला (अराखीव) उमेदवारांस कमाल सहा संधी उपलब्ध राहतील. तर अनुसुचित जमाती व अनुसुचित जाती प्रवर्गातील उमेदवारांस कमाल संधीची मर्यादा लागू राहणार आहे.

        तसेच उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारांस कमाल नऊ संधी उपलब्ध राहतील.

               तर उमेदवारांची संधीची संख्या पुढील प्रमाणे लागू राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामध्ये उमेदवाराने पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास, ही संबंधित स्पर्धा परीक्षेची संधी समजली जाईल, एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास, त्याची ती संधी समजली जाईल, उमेदवार कोणत्याही कारणास्तव परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास तरीही त्याची परीक्षेस उपस्थिती संधी गणली जाईल.तर परीक्षेच्या कमाल संधीबाबतचा आयोगाचा प्रस्तुत निर्णय सन २०२१ मध्ये प्रसिध्द होणा-या जाहिरातीस अनुसरुन आयोजित परीक्षांपासून लागू करण्यात येईल अशी घोषणा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !