MB NEWS:उज्जैनच्या दौर्‍यात पंकजाताई मुंडे पोहोचल्या थेट बुथ कार्यकर्त्यांच्या घरी* *ज्योतिर्लिंग महाकालेश्वरचे घेतले दर्शन ; भाजपा कार्यालयातही साधला संवाद*

 *उज्जैनच्या दौर्‍यात पंकजाताई मुंडे पोहोचल्या थेट बुथ कार्यकर्त्यांच्या घरी*



*ज्योतिर्लिंग महाकालेश्वरचे घेतले दर्शन ; भाजपा कार्यालयातही साधला संवाद*



उज्जैन(म.प्र.) दि.३० ---- भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा मध्यप्रदेशच्या सह प्रभारी पंकजाताई मुंडे यांचा मध्यप्रदेश दौरा सर्वार्थाने यशस्वी ठरला. सोमवारी त्यांनी उज्जैन येथे ज्योतिर्लिंग महाकालेश्वरचे दर्शन घेतले आणि त्यानंतर अचानक थेट एका बुथ कार्यकर्त्यांच्या घरी पोहोचल्या, त्यांच्या येण्याने कार्यकर्त्यांत मोठा उत्साह संचारला होता. बुथ कार्यकर्त्याच्या स्वागताने माझ्या दौर्‍याचे सार्थक झाले असे त्या यावेळी म्हणाल्या.


   पंकजाताई मुंडे यांनी सोमवारी 

उज्जैन येथील ज्योतिर्लिंग महाकालेश्वर चे दर्शन घेतले, याठिकाणी पूजा व आरतीमध्ये अर्धा तास सहभाग घेतला, त्यानंतर संघटनात्मक दृष्टीने मजबुत मानल्या जाणा-या शहरातील स्थानिक बुथ कार्यकर्ता गजेंद्र आरोण्या व मंडल अध्यक्ष अजय तिवारी यांच्या घरी भेट दिली. याठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. मंगलनाथ येथेही त्यांनी दर्शन घेतले.



*कार्यकर्त्यांशी संवाद*

-----------------------------

पंकजाताई मुंडे यांनी लोकशक्ती भवन या भाजपच्या जिल्हा कार्यालयास भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. खासदार अनिल फिरोजिया, सुरेश गिरी, प्रदेश महामंत्री कविता पाटीदार, शहर जिल्हाध्यक्ष विवेक जोशी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बहादूरसिंह आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना पंकजाताई मुंडे यांनी ज्येष्ठ नेता स्व. कुशाभाऊ ठाकरे, स्व. सुंदरलाल पटवा यांची पुण्यतिथी व स्व. अरूण जेटली यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 



   भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा सर्वात महत्वाचा आहे, त्यामुळे महाकालेश्वर च्या दर्शनानंतर 'मेरा बुथ सबसे मजबुत' हा नारा सार्थकी करणा-या बुथ कार्यकर्त्यांचे पहिल्यांदा स्वागत केले. मध्यप्रदेशची सह प्रभारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजते. इथले संघटनात्मक काम खूप चांगले आहे, याचे श्रेय निश्चितच कार्यकर्त्यांचे आहे, मलाही यातून शिकायला मिळेल असे पंकजाताई यावेळी म्हणाल्या.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार