MB NEWS: *दत्तात्रय काळे रिपोर्टर ऑफ द इअर पुरस्काराने सन्मानित* *कराड हॉस्पिटलच्या वतीने पुरस्काराची अखंडित परंपरा कायम*

 *दत्तात्रय काळे रिपोर्टर ऑफ द इअर पुरस्काराने सन्मानित* 



*कराड हॉस्पिटलच्या वतीने पुरस्काराची अखंडित परंपरा कायम* 


परळी,( प्रतिनिधी):-

परळीच्या वृत्तपत्र क्षेत्रात मागील वर्षभरात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा कराड हॉस्पिटलच्या वतीने गौरव करण्यात येतो. 2021 वर्षीचा "रिपोर्टर ऑफ द इअर" हा पुरस्कार दै.मराठवाडा साथीचे वृत्तसंपादक दत्तात्रय काळे यांना प्रदान करण्यात आला आहे. दर्पण दिनाच्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कराड हॉस्पिटल येथे या विशेष पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कराड हॉस्पिटलचे संचालक डॉ. बालासाहेब कराड व डॉ.शालिनीताई कराड यांच्यासह मान्यवर पत्रकारांची उपस्थिती होती.

2020 हे वर्ष सर्वांसाठीच खडतर असे वर्ष होते. सर्वच क्षेत्रांसह पत्रकारिता क्षेत्रालाही कोरोना महामारीने निर्माण झालेल्या परिस्थितीने फटका बसला होता. या संपूर्ण काळात सकारात्मक लेखनाने वाचकांच्या मनात आत्मविश्वस निर्माण करणे, समाजाच्या गरजेच्या बातम्यांना प्रसिद्धीच्या झोतात आणणे याबरोबरच वैचारिक आणि बौद्धिक लेखनाला चालना देऊन सामाजिक सुधारणांचा विचार लोकांसमोर आणण्यासाठी दत्तात्रय काळे यांनी आपल्या लेखणीतून प्रयत्न केले आहेत. बतम्यांबरोबरच विशेष लेख, विशेष मान्यवर व्यक्तींच्या प्रेरणादायी मुलाखती आणि समाजाला सकारात्मक विचार देण्यासाठी फेसबुक लाईव्ह सारखे उपक्रम त्यांनी मागील लॉकडाऊनच्या कार्यकाळात राबवले आहेत. पत्रकारितेबरोबरच अनेक सामाजिक उपक्रमांतही त्यांचा आग्रही सहभाग असतो. याच कार्याची दखल घेत कराड हॉस्पिटलच्या वतीने दर्पण दिनानिमित्त देण्यात येणारा रिपोर्टर ऑफ द इअर हा 2021 चा पुरस्कार दत्तात्रय काळे यांना प्रदान करण्यात आला. कराड हॉस्पिटल येथे आयोजित कार्यक्रमास डॉ.बालासाहेब कराड, डॉ.शालिनीताई कराड यांच्यासह  ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाश बुरांडे, संपादक प्रकाश सूर्यकर प्रशांत जोशी, धनंजय आरबुने, मोहन व्हावळे, जगदीश शिंदे,अनंत कुलकर्णी, पत्रकार संघाचे शहराध्यक्ष संभाजी मुंडे व प्रल्हाद कंडुकटले, संपादक बालासाहेब फड, महादेव गीते यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !