MB NEWS:पत्रकार अनंत कुलकर्णी यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कार जाहीर

 पत्रकार अनंत कुलकर्णी यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती  पुरस्कार जाहीर 



परळी (प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती परिषद परिषदेच्या वतिने देण्यात येणारा राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवाकार्य पुरस्कार परळी येथील झुंजार नेताचे पत्रकार अनंत कुलकर्णी यांना जाहीर झाला असुन या पुरस्काराचे येरमाळा ता.कळंब येथे दि.31 डिसेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात येणार आहे.

   राज्यात मागील अनेक वर्षांपासून व्यसनमुक्त चळवळ सक्षम व्हावी या चळवळीतुन एक दिवस व्यसनमुक्त राष्ट्र,सशक्त राष्ट्र घडो या राष्ट्रहिताच्या ध्येयाने महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती परिषद कार्यरत आहे.व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी या कार्यक्रमात अनेक संस्था,व्यक्ति, पत्रकार इतर काम करत आहेत.सदर लोकांनी केलेल्या कार्याची दखल घेत परिषदेच्या वतीने आयोजक डॉ.संदिप तांबारे उस्मानाबाद ,अजय शेरकर बीड हे राज्यातील नामवंत व्यक्तीनां राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कार देऊन गौरवित असतात.यावर्षीच्या पुरस्कारासाठी दैनिक झुंजार नेता च्या माध्यमातून व्यसनमुक्त साठी लेख, परळी ग्रामीण भागात सामाजिक भागातील युवकांना व्यसनापासुन दुर ठेवण्यासाठी सतत कार्यशिल असणारे व समाजात सलोखा कायम रहावा यासाठी आपल्या वृत्तांकन व लेखाद्वारे जनजागृती करणारे परळी पत्रकार संघाचे माजी शहराध्यक्ष अनंत कुलकर्णी यांच्या या कार्याची दखल घेवुन या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सामाजीक क्षेत्रात सतत सहभाग असणारे अनंत कुलकर्णी यांना हा पुरस्कार जाहिर झाल्याने सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार