परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS- Video:बलात्कारी युवा प्रदेश अध्यक्ष ला अटक करा :परळीत भाजपा युवा मोर्चाची निदर्शने*

 *बलात्कारी युवा प्रदेश अध्यक्ष ला अटक करा :परळीत भाजपा युवा मोर्चाची निदर्शने*

*महाविकास आघाडी सरकार च्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा*

परळी वैजनाथ, प्रतिनिधी

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष यांनी संभाजीनगर युवती ला नौकरी चे अमिष दाखवुन बलात्कार केला या आघाडी सरकारच्या स्थापने पासून कोविड सेंटर मध्ये सुद्धा बलात्कारा च्या घटना घडल्या आहेत स्वतः गृहमंत्री यांच्या मतदारसंघात सुद्धा महिले वर अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अश्या प्रकारच्या गुन्ह्या मुळे महाराष्ट्र मध्ये कायदा व सुव्यवस्था आहे का नाही हा प्रश्न निर्माण होत आहे!महाराष्ट्र चे गृहमंत्री कुठे आहेत हा प्रश्न जनता विचारत आहे! युवतीवर बलात्कार केला याप्रकरणी गुन्हा नोंद होऊन ही महाविकास आघाडी सरकार व गृहमंत्री मूग गिळून गप्प आहेत यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा परळी च्या वतीने मा.तहसीलदार, तहसील कार्यालय परळी येथे निवेदन देण्यात आले या वेळी उपस्थित भाजपा युवा मोर्चा बीड जिल्हा अध्यक्ष निळकंठ चाटे,डॉ शालिनीताई कराड,नगरसेवक पवन मुंडे सर,यु मो प्रदेश सचिव ॲड.अरुण पाठक,बाळासाहेब फड,योगेश पांडकर,सतीश फड,सुशील हरंगुळे,गोविंद चौरे,पप्पु चव्हाण,दीपक गित्ते,शाम गित्ते,गोपी कांगणे,नीतीन मुंडे,जितेंद्र मस्के,आशिष कदरे,पवन तोड़करी,ज्ञानेश्वर मुंडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

                         Video



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!