युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS:भाजपाचे नेते राजेश गिते यांच्या वतीने नवनियुक्त संभाजीनगरचे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश चाटे यांचा सत्कार

 भाजपाचे नेते राजेश गिते यांच्या वतीने नवनियुक्त संभाजीनगरचे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश चाटे यांचा सत्कार




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-भाजपाचे नेते तथा हरिसुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश गित्ते यांच्या वतीने शहरातील संभाजीनगर पोलिस निरीक्षक सुरेश चाटे यांचा सत्कार करण्यात आला आहे. 

                शहरातील संभाजीनगरचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांची अंबाजोगाई येथे बदली झाली होती. त्यांच्या जागी बीड येथून आलेले नवनियुक्त पोलिस निरीक्षक सुरेश चाटे यांनी पदभार स्विकारला आहे. पोलिस निरीक्षक सुरेश चाटे यांचा आज दि.01 जानेवारी रोजी भाजपाचे नेते राजेश गित्ते यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राजेश गित्ते यांच्यासह नंदनजचे सरपंच अनिल गुट्टे, मिरवटचे सरपंच धुराजी साबळे, मिरवट चेअरमन भरतराव इंगळे ,मिरवट उपसरपंच रामेश्वर इंगळे आदि उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या